Dr. Rahul Rajani

एक तप पूर्ण!

दि. १८ जुलै रोजी मला अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन १२ वर्षे पूर्ण झाली. कालच्याच दिवशी २००८ साली मी जळगावच्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात रुजू झालो होतो. त्यानंतर मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ज्युनियर रिसर्च फेलो व नंतर सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम केले. गेल्या साडे आठ वर्षांपासून जव्हार येथे अध्यापन करीत आहे.

गेल्या बारा वर्षात अनेक पुस्तकांच्या वाचनातून, सहवासात आलेले वरिष्ठ प्राध्यापक, नवीन मित्र, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्याकडून, अध्यापनातून, NSS मधून खूप शिकायला मिळाले. खूप लोकसंग्रह करता आला. शिकण्याचा, स्वत:ला समृद्ध करण्याचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे व शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार. आतापर्यंत साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार!

(ज्या दिवशी मी या क्षेत्रात पदार्पण केले, त्या दिवशी योगायोगाने गुरुपौर्णिमा होती.)

Exit mobile version