Dr. Rahul Rajani

भारतातल्या कोरोनावाढीला जबाबदार कोण होतं?

घटनाक्रमाकडे जरा लक्ष द्या-

३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.

फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोकं एकत्र केले गेले.

१६ मार्चपर्यंत अख्या भारतातील शाळा, महाविद्यालये सुरू होती.

१९ मार्चला जनता कर्फ्युची घोषणा

२२ मार्चला जनता कर्फ्यूचा फार्स पार पडला.

२३ तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन सुरू होते.

२३ तारखेला मध्यप्रदेशात शपथ घेतली.
२४ तारखेला बहुमत सिद्ध केले.

मग २४ तारखेला संध्याकाळी ८ वा. घोषणा होऊन ४ तासानंतर रात्री १२ वाजेनंतर म्हणजे २५ तारखेला लॉकडाऊन चालू झाले.

(एका दिवसाच्या जनता कर्फ्यूसाठी ३ दिवस आधी घोषणा केली व २१ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी फक्त साडे तीन-चार तासांची मुदत दिली.)

त्याआधी २ महिन्यात जवळपास १५ लाख परदेशी भारतीय भारतात आले व मनसोक्त हिंडले.

जनता कर्फ्युचा फार्स मध्यप्रदेशातील सत्ता मिळविण्यासाठी वेळ मिळावा, म्हणूनच केला गेला होता.

मध्यप्रदेशातील सत्ता काबीज करण्याच्या नादात देशाचा भयंकर घात केला.

आता भारत किती वर्षे मागे फेकला जाईल, हे कोणीच सांगू शकत नाही.

केव्हा ना केव्हा बोलावेच लागेल.

(यात राजकारण शोधू नका, असा शहाजोगपणाचा सल्ला कुणी देऊ नका.)

Exit mobile version