‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ (साधना प्रकाशन) हे पुस्तक वाचले. सुरेश द्वादशीवार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत
सदर पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, जीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर व इतर तत्कालीन नेत्यांचे जीवन, कार्य, स्वभाव, सामर्थ्य, मर्यादा व गांधीजींशी त्यांच्या असलेल्या संबंधांवर लेखकाने
प्रकाश टाकलेला आहे. अनेक ग्रंथ, पत्रव्यवहार, डायऱ्या यांचा अभ्यास करून, आवश्यक तेथे त्यातील संदर्भ दिलेले आहेत. या पुस्तकाच्या वाचनाने गांधींजीच्या संदर्भातील अनेक गैरसमज दूर होतील आणि ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी खर्ची घातले. भारतातील विविध जाती-धर्मांमध्ये शांतता, सौहार्द, बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी हौतात्म्य पत्करले. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा लोकलढा जगाच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या साम्राज्याविरूद्ध पुकारला व तो यशस्वी करून दाखविला, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल.
(२४/०६/२०१८)