‘चिमण्या’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेखाचा आशय

        ‘चिमण्या’ हा ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील अतिशय लहानसा असा लेख आहे. या लेखातून लेखकाने चिमण्यांचे भावविश्वदेखील रेखाटलेले आहे. एखाद्याचे घर उद्ध्वस्त केल्यावर ते कायमस्वरूपी आपला राग धरतात, हे चिमण्यांच्या माध्यमातून लेखकाने स्वानुभवातून या ठिकाणी मांडलेले आहे. चिमण्यांचा स्वभाव हा या बाबतीत माणसांच्या स्वभावाशी मिळता-जुळता असतो, हे आपल्याला हा लेख वाचल्यावर लक्षात येते.

         लेखकाच्या घरात नेहमी चिमण्या यायच्या. पण लेखक आतापर्यंत त्यांना वैतागलेला नव्हता. या आधी त्या त्यांची घरटी Read More

मुलांशी प्रबोधनाच्या विषयांवर गप्पा

            माझ्या दहा वर्षाच्या व सात वर्षाच्या मुलाला मी आत्ताच (दि. ०७/०४/२०२३, सकाळी) जवळ घेऊन युरोपातील प्रबोधन युग समजावून सांगत होतो. ज्याची सुरुवात गॅलिलिओ यांनी ‘पृथ्वी सूर्याभोवती

Read More

बाहुलीचा मृत्यू –

बाहुलीचा मृत्यू

         ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील ‘बाहुलीचा मृत्यू’ हा लेख एका बत्तीस वर्षाच्या कुमारी मातेच्या मृत्यूनंतर लेखकाच्या झालेल्या मानसिक अवस्थेवर, तिच्याबद्दलच्या आठवणींवर आधारलेला आहे. लेखकाने तिचे नाव दिलेले नाही. तो फक्त ‘ती’ अशा सर्वनामाने तिचा उल्लेख करतो. लेखक तिच्यावर अंत्यसंस्कार करून परतलेला आहे आणि तेव्हा त्याच्या तिच्याबद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या लेखकाने या लेखात मांडल्या आहेत.

            गेल्या १२ वर्षांपासून लेखकाची व तिची भेट झालेली नव्हती. तिचा काही निरोप पण लेखकाला मिळालेला Read More

नवीन शैक्षणिक धोरण : काही बदल व परिणाम


आधी पदवी ही तीन वर्षांची असायची. म्हणजे एकदा प्रवेश घेतल्यावर तीन वर्ष पूर्ण करावेच लागायचे. मध्येच सोडले तर फक्त १२ वी शिक्षण गृहीत धरले जायचे. म्हणून मुलं किमान पदवी तरी पूर्ण करायचे. आता प्रत्येक वर्षी प्रमाणपत्र

Read More

मराठी व्याकरण – नमुना स्वरुपात १२० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

मराठी व्याकरण – नमुना स्वरुपात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरणावर नमुना स्वरुपात १२० प्रश्न खाली दिलेले आहेत. प्रश्न व पर्याय काळजीपूर्वक वाचा. मग योग्य  उत्तरे निवडा. तरीही लक्षात येत नसेल तर संकल्पना नीट समजून घ्या. मदतीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून व्याकरणावरील व्हिडीओ बघा.

– मराठी व्याकरण: https://www.youtube.com/playlist?list=PLkOQhRd-rhyNZdTRkdMwGRR4n1jsKKUJL

Read More

ब्लॉगलेखन

एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विविध समाजमाध्यमे यांचा वापर वाढलेला असून ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. आजच्या काळात ज्ञान, माहिती, मनोरंजन, जाहिरात आणि प्रबोधन हे घटक विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, त्यावर फक्त त्यांचीच Read More

‘माझं घर’ या नाटकातील दुय्यम व्यक्तिरेखा

               विभा, आई, उर्मिला यांच्या व्यतिरिक्त या नाटकात विभाची मुलगी राणी, नंदिता मुर्डेश्वर व विभाची आई मालती साळवी या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. राणी ही आठ-दहा वर्षाची लहान मुलगी आहे. ती शाळेत जाते. आई व वडिलांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाचा फटका तिला बसलेला आहे. ती आईकडे राहते, परंतु नंतर वडिलांचा सहवासदेखील तिला हवाहवासा वाटतो. त्यासाठी ती वडिलांचा पत्ता तिच्या शाळेतील मुलाच्या माध्यमातून  Read More

उर्मिला ‘माझं घर’ या नाटकातील व्यक्तिरेखा

           उर्मिला ही दिनेशची बहीण व विभाची नणंद आहे. ती एम. एस्सी झालेली असून कोल्हापूरला नोकरी करते. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली आहे. शिकून मुंबई सोडून लांब कोल्हापूरला नोकरीसाठी जाण्याच्या तिच्या निर्णयाला तिची आई व भावाचाही विरोध असतो. पण ती ठाम असते व तिच्या वहिनीचा म्हणजे विभाचा मात्र तिला पाठिंबा असतो. उर्मिलाचे विभाशी अतिशय घनिष्ठ संबंध असतात. ती विभाची नणंद असूनही तिच्याशी बहिणीप्रमाणे किंवा एखाद्या चांगल्या मैत्रिणीप्रमाणे वागत असते. तिचा भाऊ Read More

आई – ‘माझं घर’ या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा

         आई म्हणजे विभाची सासू व दिनेशची आई. ही एक वृद्ध विधवा स्त्री आहे. आधी ती गोरेगाव येथे राहायची. पण नंतर मुलगा व सून यांनी अंधेरीमध्ये फ्लॅट घेतल्यावर ती त्यांच्यासोबत तिथे राहू लागते. पण तरीही अनेकदा ती गोरेगावला जुन्या घरी जाते व तिथल्या बायकांमध्ये मिसळते. विभा ही त्यांची सून असली तरी दोघांमधील नाते हे आई व मुलीसारखेच आहे. विभा त्यांना आईच म्हणते. विभा त्यांची तब्येत, औषध, पथ्ये यांची खूप काळजी घेत असल्यामुळे त्या विभावर अवलंबून आहेत. विभा आधी दिनेश येईपर्यंत जेवणासाठी थांबायची, तेव्हा आईच तिला Read More

जयंत पवार यांच्या ‘माझं घर’ या नाटकातील विभाची व्यक्तिरेखा

            विभा ही ‘माझं घर’ या नाटकातील केंद्रवर्ती व्यक्तिरेखा आहे. संपूर्ण नाटक हे तिच्याभोवती फिरते. ती दिनेशची पत्नी आहे. ती मुंबईतील अंधेरी या उपनगरात एका उच्चभ्रू लोकांच्या भागात एका चांगल्या फर्निचर केलेल्या टू बेडरूम किचनच्या फ्लॅटमध्ये दिनेश, मुलगी व सासुसोबत राहते. त्या आधी ते गोरेगावात राहायचे. ती चर्चगेटला नोकरी करते. ती साधारणतः ३४-३५ वर्षांची असून तिच्या माहेरी पुरोगामी वातावरण होते. तिचे वडील नाना हे पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्य केले व ते भेदभाव मानत नसत. अशा वातावरणात तिचे बालपण व तारुण्य गेले. ती उच्चशिक्षित आहे. तिने कॉलेजचे शिक्षण घेतलेले आहे. कॉलेजमध्ये असताना तिला सतार खूप छान वाजवता यायची. ती गाणेही शिकलेली होती. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ती Read More

जयंत पवार – परिचय

            जयंत पवार हे मराठीतील प्रसिद्ध कथालेखक, पत्रकार, नाटककार आणि नाट्यसमीक्षक म्हणून परिचित आहेत. १९८०पासून त्यांनी नाट्यलेखनास सुरुवात केली. जयंत पवार यांची ‘वंश/ पाऊलखुणा’ (अभिनव प्रकाशन), ‘अधांतर’ (पॉप्युलर प्रकाशन), ‘काय डेंजर वारा सुटलाय’ (पॉप्युलर प्रकाशन), ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ (शब्द पब्लिकेशन), ‘लिअरने जगावंकी मरावं?’ (पंडित पब्लिकेशन) ‘माझं घर’ शब्दालय प्रकाशन) इ. नाटके प्रकाशित आहेत. त्यांनी एकांकिका लेखनही केलेले असून ‘नाद’ Read More

‘माझं घर’ नाटक : काही दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे

‘माझं घर’ नाटक : काही दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे

(४ पाने उत्तरे लिहिणे अपेक्षित)

प्रश्न : ‘माझं घर’ या नाटकातील दिनेश व विभा यांचे नातेसंबंधांचा सविस्तर आढावा घ्या.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘माझं घर’ या नाटकाबद्दल, जयंत पवार यांच्याबद्दल ५-७ ओळींमध्ये थोडक्यात माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर

Read More

देवबाभळी नाटक- काही प्रश्न व उत्तरे

प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील स्त्रियांची व्यक्तिचित्रे तुमच्या भाषेत सविस्तर लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकातील आवली व लखुबाई यांची व्यक्तिचित्रे लिहायची आहेत. पहिल्या दोन ओळींमध्ये ‘या नाटकात दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी एक आवली व दुसरी लखुबाई. त्यांच्याबद्दल आपण आता या ठिकाणी बघणार आहोत’, असे लिहून आधी पहिली व तिच्याबद्दल सविस्तर लिहून झाल्यावर दुसऱ्याबद्दल लिहायचे. प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल किमान दीड-दीड पाने लिहायला हवीत.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

अभ्यासासाठी पुस्तक – Read More

नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल (दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे)

वर्ग – प्रथम वर्ष कला

अभ्यासक्रम – नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न – नाटकाच्या घटकांचा सविस्तर परामर्श घ्या.

उत्तर –

  • प्रस्तावना : नाटकाबद्दल प्रास्ताविकेत ५-६ ओळी लिहा.
  • नंतर नाटकाचे घटक

सुरुवातीला नाटकाचे सर्व घटक खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायचे. नंतर जेवढे घटक विचारलेले आहेत तेवढे साडे तीन पानांमध्ये सविस्तर लिहायचे. एक एक घटक घ्यायचे व Read More

रोहित शर्मा याच्याकडे संघनायक म्हणून असलेले गुण

भारतीय संघाने या विश्वचषकात सलग १० विजय मिळवून आज न्युझीलंडला पराभूत करत अगदी थाटामाटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोणत्याही यशात कप्तानची भूमिका खूप महत्त्वाची असते. या विश्वचषकात सर्व खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण एक कप्तान म्हणून रोहित शर्मा याची भूमिका मला अतिशय महत्त्वाची वाटते. मागच्या विश्वचषकात त्याने ५ शतक केले होते. IPLमध्येही त्याने

Read More

SYBA, पेपर नं. ३ भाषा आणि बोलीअभ्यास (दीर्घोत्तरी प्रश्न, त्यात अपेक्षित मुद्दे)

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न- भाषा म्हणजे काय ते सांगून मानवी भाषेची कोणतीही सहा लक्षणे सोदाहरण (म्हणजे उदाहरणासह) लिहा.

उत्तर- Read More

रोमान याकबसन यांनी सांगितलेली भाषेची कार्ये

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (३-४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित

रोमान याकबसन यांनी सांगितलेली भाषेची कार्ये-

खालील प्रमाणे उत्तर लिहायचे – 

Read More

भाषेच्या व्याख्या व लक्षणे (दीर्घोत्तरी प्रश्न व नमुना उत्तर)

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (३-४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न- भाषा म्हणजे काय ते सांगून मानवी भाषेची कोणतीही सहा लक्षणे सोदाहरण (म्हणजे उदाहरणासह) लिहा.

  • प्रस्तावना : मानवी जीवनात भाषेचे महत्त्व, आवश्यकता याबद्दल ५-६ ओळी लिहा.
  • नंतर भाषा म्हणजे काय? – यात भाषेच्या ५-६ व्याख्या लिहा व त्या समजावून सांगा. म्हणजे एक व्याख्या लिहिली की तिच्याखाली तिचे स्पष्टीकरण, दुसरी व्याख्या व तिचे स्पष्टीकरण असे सविस्तर लिहा. (किमान दीड पाने)
  • नंतर भाषेची लक्षणे (लक्षणे व वैशिष्ट्ये एकच आहेत. लक्षणे म्हणजेच वैशिष्ट्ये)

सुरुवातीला भाषेची खालील सर्व लक्षणे खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायची. नंतर जेवढी लक्षणे विचारलेली आहेत तेवढी खालीलपैकी कोणतीही दीड पानांमध्ये सविस्तर लिहायची. एक एक लक्षण घ्यायचे व त्याच्याबद्दल लिहायचे.

  • ध्वन्यात्मकता/ चिन्हात्मकता
  • द्विस्तरीय रचना
  • यादृच्छिक 
  • अदलाबदल/ भूमिकांतर
  • प्रत्यक्षातीतता/ स्थलकालातीतता
  • सामाजिकता
  • सर्जनशीलता/ निर्मितीशीलता
  • परिवर्तनशीलता
  • सांस्कृतिक संक्रमण
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व लक्षणे म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

 

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख 

रूपिका, रूपिकांतर व रूपिम

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- रूपिका, रूपिकांतर व रूपिम या संकल्पना स्पष्ट करून रूपिमांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर – Read More

स्वन, स्वनिम, स्वनांतर – दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- स्वन, स्वनिम, स्वनांतर या संकल्पना स्पष्ट करून उच्चारण स्थानावर आधारलेले स्वनांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर –

Read More

‘ॲ व ऑ’ स्वरांचा वर्णमालेत समावेश का?

महाराष्ट्र शासनाने दि. १०/११/२०२२ रोजी ‘शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इ.साठी स्वीकारलेली देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्याबाबत’ अशा आशयाचे एक परिपत्रक काढून मराठी वर्णमाला अद्ययावत केली आहे. यानुसार ‘ॲ

Read More

विद्यार्थिधर्म म्हणजे काय?

मित्रांनो,

मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत

Read More

शिक्षणातून माझी झालेली वैचारिक जडणघडण

माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या

Read More

अवांतर वाचन : संकल्पना, स्वरूप व फायदे

मित्रांनो,
अवांतर वाचन करावे म्हणजे नेमके काय करावे, कसे करावे, काय वाचावे, केव्हा वाचावे, त्याचे फायदे काय आहेत, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तेव्हा हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.

अवांतर वाचन म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्या त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, तर गृहस्थ म्हणून आपल्या दैनंदिन नोकरी-व्यवसायाच्या कामाव्यतिरिक्त  वर्तमानपत्र, त्यातील महत्त्वाच्या

Read More

‘प्रतिपश्चंद्र’ कादंबरीमध्ये चित्रित शिवाजी महाराजांचे चरित्र

‘प्रतिपश्चंद्र’ ही डॉ. प्रकाश सुर्यकांत कोयाडे यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी असून या कादंबरीची पहिली आवृत्ती १ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झाली. गेल्या तीन वर्षात या कादंबरीच्या दहा आवृत्त्या संपलेल्या असून आता अकरावी आवृत्ती सुरू आहे. ‘प्रतिपश्चंद्र’ या शीर्षकावरूनच ही कादंबरी शिवाजी महाराजांशी संबंधित असल्याचे लक्षात येते. ही एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी असून या कादंबरीत तेरावे, सतरावे व एकविसावे शतक अशा ८०० वर्षातील कालखंडाची सांगड घालून लेखकाने कथानक रचलेले

Read More

उन्हाळ्याच्या सुट्ट्या- विद्यार्थ्यांसाठी हिताचे दोन शब्द

मित्रांनो,

आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. जवळपास दीड महिना महाविद्यालये, तासिका बंद राहतील. असे असले तरी या सर्व सुट्ट्या अशाच इकडे तिकडे भटकण्यात वाया घालवू नका. टाईमपास करू नका. हीच सवय लागेल. सवयी

Read More

मुलाखत लेखन – श्री. रवी बुधर यांची यांची मुलाखत (विषय : आदिवासी समाज, संस्कृती : परिचय’)

       मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.  

रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.

Read More

देवी (ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)

            ‘देवी’ हा ‘चर्चबेल’मधील चौथा लेख आहे. या लेखात देवी, देवींचे पती नारायणस्वामी, दीर दीनबंधू ह्या तीन व्यक्तिरेखा आहेत. देवींचे पती नारायणस्वामी यांचा गंगा नदीच्या काठावर वाडा असून ते गंगा नदीचे निस्सीम भक्त आहेत. “ते गंगाभक्त होते. गंगेशिवाय त्यांना वेगळे आयुष्यच नव्हते. गंगास्तोत्राचे अहोरात्र पठण आणि गंगोदकाचे (गंगेच्या पाण्याचे) सिंचन याच स्वामींच्या आयुष्याच्या प्रबळ प्रेरणा होत्या”, असे त्यांचे वर्णन लेखकाने केलेले आहे. ते दररोज संध्याकाळी पोथी वाचायचे. त्यांच्या Read More

कंदील (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील एक लेख)

          ‘कंदील’ हा कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललित गद्य संग्रहातील एक लेख आहे. या लेखामध्ये मनी सुखिया व राजम्मा या दोन व्यक्तिरेखा आहेत. मनी सुखिया हे नाव ग्रेस यांना आवडलेले होते. हे नाव ऐकून ‘ज्ञानेश्वरी’च्या पसायदानातील अर्थ त्यांना जाणवला. मनी सुखिया ही दहा-बारा वर्षांची लहान मुलगी होती. ती अतिशय बारीक होती. ‘वठलेल्या

Read More

नूरजहान आणि रिल्के (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)

         नूरजहान आणि रिल्के हे ग्रेस यांचे अतिशय आवडते कलावंत होते. नूरजहान ही गायिका व अभिनेत्री होती. तर रिल्के हा कवी होता. या दोघांनी लेखकाला अक्षरशः झपाटून टाकलेले आहे, असे आपल्याला त्यांच्या या लेखातील वर्णनावरून दिसून येते.

        नूरजहान ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील व स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेली गायिका. तिने किमान एक हजार गाणी गायलेली आहेत. तिने ‘मिर्झासाहिबा’ व इतर चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केलेला आहे. लेखकाने तिला पहिल्यांदा Read More

पल्लवीचे पक्षी – कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

          ग्रेस हे कोणत्याही लेखात एखादी व्यक्ती, प्रसंग, घटना याबद्दल सविस्तर, सलग असे काहीच सांगत नाहीत. त्या व्यक्ती, घटना, प्रसंग याबद्दल थोडे सांगून त्याचा संबंध, धागा निसर्ग, ख्रिस्त, समुद्र अशा विविध गोष्टींशी जोडून कधीकधी असंबद्ध वाटावे, असे व्यक्त होतात. एखादे गूढ असे काहीतरी अनुभव मांडतात. त्या व्यक्ती, घटनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला त्यांच्या लेखनामधून मिळत नाही. काळाचे अंतर पटकन कापून ते त्या-त्या व्यक्तीच्या खूप आधीच्या आठवणी, मधल्या काळातील काही Read More

जुनी पेन्शन योजना का आवश्यक आहे?

         सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी जो संप सुरू केलेला आहे, त्याबद्दल वेगवेगळी मते मांडणाऱ्या बंधू-भगिनींनो,

सरकारी कर्मचारी हे काही आपण परदेशांतून आयात केलेले नाहीत. ते आपल्याच देशातील लोकं आहेत. शिक्षणाचा प्रचार प्रसार खेड्यापाड्यांमध्ये झाल्यानंतर 

Read More

नोकरीसाठीची मुलाखत – काही सूचना (माझे अनुभव)

मी आज ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदासाठीच्या मुलाखतीमध्ये मला ‘साधना’ नियतकालिक कोणी सुरू केले होते? सध्या ‘साधना’चे संपादक कोण आहेत?, असे प्रश्न विचारले होते. अनेक प्रश्नांसोबत मी या प्रश्नांची देखील बरोबर उत्तरे दिली होती. “तुम्ही हे नियतकालिक वाचता का? वाचलेले आहे

Read More

कोरोना व आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्था

             कोरोना काळात आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णतः ठप्प झालेली होती. जवळपास सर्व विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले दिसून आले. ऑनलाईन शिक्षण घेणे हे आदिवासी भागातील

Read More

‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

        ‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ या लेखात पी. जी. चंद्रम नावाच्या एका उच्चशिक्षित, उच्च पदावरील नोकरदार व्यक्तीच्या विक्षिप्तपणामुळे त्याच्या दोन मुली व पत्नीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झालेले आहे, याचे चित्रण ग्रेस यांनी केलेले आहे. पी. जी. चंद्रम हा एका सरकारी कार्यालयात मोठा ऑफिसर असतो. मद्रासहून बदली होऊन तो लेखकाच्या शहरात नोकरीच्या निमित्ताने आलेला असतो व लेखकाच्या चाळीत भाड्याने राहत असतो. त्याला सात-आठ वर्षांच्या दोन जुळ्या मुली असतात. सुभद्रा व

Read More

‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

         ‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ हा ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील पहिला लेख आहे. नेपाली नावाच्या एका सात वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूवर आधारलेला हा ललित लेख आहे. ही तिची शोकांत कथा आहे. नेपाली ही एक अनाथ मुलगी होती. ती फादर ग्रीन यांना दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या एका छोट्याशा गावात ती दोन वर्षांची

Read More

गरिबांची मुलं प्राध्यापक कशी बनतील?

गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच

Read More

मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान -महत्त्वाच्या app व संकेतस्थळांची माहिती (भाग १)

कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक्य होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स,

Read More

राजश्री जाधव-पाटील (गिर्यारोहक व क्लास १ अधिकारी) यांचे अनुभव-

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील (गिर्यारोहक) यांनी दि. १५/०८/२०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो हे शिखर सर केले असून त्यावर भारताचा झेंडा फडकविला आहे. त्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण असून सध्या त्या कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नियंत्रक (वर्ग-अ) या पदावर कार्यरत आहेत. या व्हिडिओतून त्यांनी त्यांचे अनुभव व जीवनप्रवास सांगितलेला आहे.

नवीन शैक्षणिक धोरण- परीक्षण

जेव्हा सरकार नावाची यंत्रणा एखादे धोरण आखत असते, तेव्हा त्या यंत्रणेचे जे कोणी लोक आहेत त्यांच्या विचारांचे, धारणांचे, समाजाबद्दलच्या त्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब त्या धोरणात पडत असते. तेव्हा ते धोरण सर्वसमावेशक आहे की नाही हे तपासून पाहण्याचे व ते तसे नसेल तर तशा शिफारशी, सूचना दुरुस्त्या पाठवण्याचे काम त्या समाजातील जागरूक, सजक, अभ्यासू वर्गाने करावे, अशी अपेक्षा असते. त्यासाठी सरकार नावाच्या यंत्रणेने तेवढा वेळ देणेदेखील गरजेचे असते.

हा मसुदा १ जून २०१९ रोजी अपलोड केला गेला. ३१ जूनपर्यंत सूचनांसाठी मुदत. नंतर ३१ जुलै पर्यंत वाढ.  Read More

वर्गात नियमित न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

विद्यार्थी मित्रांनो,
जी मुलं लेक्चरला येत नाहीयेत त्यांनी व इतरांनीही लक्षात ठेवा.
१) यावर्षी तुमची परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन होईल.
२) सर्व पेपर तुम्हाला लिहावे लागतील. ऑब्जेक्टिव्ह

Read More

नवीन शैक्षणिक धोरण

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला

Read More

 ‘रोजगारी’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

         ‘रोजगारी’ ही कथा गावगाड्यातील एका शेतमजूर कुटुंबातील एक १४ वर्षाचा मुलगा आपल्या आई व वडिलांप्रमाणे शेतमजुरी न करता व्यवसायाला सुरुवात करतो आणि आत्मविश्वास व स्वाभिमानाने जगायला लागतो, या विषयावर आधारलेली आहे.

          मारत्या ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तो १४ वर्षाचा आहे. त्याची आई पाटलाकडे शेतमजुरी करायला जाते व त्यावर तिचा व मारत्याचा उदरनिर्वाह भागवते. तिची अशी इच्छा असते की, मुलाने सुद्धा आता आपल्यासोबत पाटलाकडे Read More

 ‘मोर्चा’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

           ‘मोर्चा’ ही कथा शिवराम व त्याची आठ वर्षाची मुलगी सुशी यांच्यातील प्रेमळ नाते व सुशी मोर्च्यात हरवल्यामुळे कथेच्या शेवटी त्यांची झालेली ताटातूट, त्यामुळे शिवरामची झालेली सैरभैर अवस्था यावर आधारलेली आहे.

          शिवरामची बायको त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष नांदते. त्या दरम्यान त्यांना एक मुलगी होते. ती म्हणजे सुशी. सुशी एक वर्षाची असताना शिवरामची बायको एका ठेकेदारासोबत पळून जाते, त्याच्यापासून तिला पुढे तीन अपत्ये होतात, असे Read More

‘घोर’- (दाही दिशा) रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कथा)

               ‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्‍याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.

          आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे Read More

माझ्या महाविद्यालयाचा मराठी विभागाचा अहवाल (२०२१-२२)

मराठी विभाग अहवाल २०२१-२२

महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात १४/०६/२०२१ रोजी झाली. पहिल्या आठवड्यापासूनच महाविद्यालयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सुरू झाल्या.

                                                                   निकाल

एकूण परीक्षार्थी २९
उत्तीर्ण २४
अनुत्तीर्ण ०५
निकालाची टक्केवारी ८२.७५%

श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या

ओ श्रेणी

०१

ए + श्रेणी ०६
ए श्रेणी ०८
ब+ श्रेणी ०३
ब श्रेणी ०४
कश्रेणी ००
ड श्रेणी ०२

                                       गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी

अ. क्र. नाव गुण
कांचन परशुराम महाले

५५७+५०६=१०६३

निवृत्ती वळे ४८५+४६८=९६३
दिलीप थेतले ४२९+४७५=९०४

          विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व चांगल्या निकालासाठी मराठी विभागातील प्राध्यापक नेहमीच प्रयत्नशील असतात. या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने टाळेबंदी घोषित केल्याने महाविद्यालय नियमित सुरू होऊ शकले नाही. म्हणून या वर्षीदेखील Read More

‘वाफ’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)

          ग्रामीण भागात बर्‍याचदा माणसांतील नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे एकमेकांमध्ये चढाओढ, स्पर्धा, एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती असते. यातून मग संघर्ष निर्माण होतो. ‘वाफ’ ही कथा गावातील संघर्ष, मारामारी, खून यावर आधारलेली आहे.

          ‘वाफ’ कथेची सुरुवात वामन पैलवानाचा मृत्यू व त्याची बातमी गावभर पसरल्यानंतर गावात जी खळबळ माजते, त्यापासून होते. वामन पैलवान हा एकाच वेळी दहा माणसांना पुरून उरला असता, अशा ताकदीचा गडी होता. तो अविवाहित होता. त्याची भाऊरावशी मैत्री होती. तो अनेकदा दिवसा व रात्रीसुद्धा भाऊरावकडेच राहायचा. त्यांचे जेवणही बऱ्याचदा त्याच्याकडेच असायचे. भाऊरावच्या बायकोने त्याला धर्माचा भाऊ मानलेले होते. भाऊरावचा देखील त्याच्यावर खूप विश्वास होता. म्हणून भाऊराव घरी Read More

‘सांड’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकातील कथा)

कथानक –           

  ‘सांड’ ही ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय केंद्रस्थानी असतो आणि शेतीसाठी गाय, बैल यांची खूप आवश्यकता असते. सांड म्हणजे गायीचा गोर्‍हा. देवाच्या किंवा धर्माच्या नावाने मोकळा सोडलेला बैल किंवा गायींना गाभण करण्यासाठी एखादागोर्‍हा शेतकामासाठी वापरला न जाता, त्याला न ठेचता तसेच ठेवले जाते, त्यांला ‘सांड’ असे म्हणतात. त्यांच्यापासून शेतकर्‍यांच्या घरी गायींपासून नवीन वासरू व गोर्‍हे जन्माला येणारे असतात. ते ताकदीचे  Read More

धर्म (कथा)- रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट)

          ग्रामीण भागामध्ये राजकीय पक्ष, विविध देवदेवतांचे भक्त यामुळे गटतट निर्माण झालेले असतात. यांच्यात अनेकदा संघर्ष, मारामार्‍या, वादविवाद निर्माण होतात. त्याचा फटका गावातील इतर सामान्य लोकांनाही बसत असतो. ‘धर्म’ ही कथा एका गावातील दोन गटांमध्ये धार्मिक वादातून जो संघर्ष निर्माण होतो व त्यात तुकाराम लोहार नावाच्या व्यक्तीची लहान मुलगी बळी Read More