भाषेच्या व्याख्या व लक्षणे (दीर्घोत्तरी प्रश्न व नमुना उत्तर)

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (३-४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न- भाषा म्हणजे काय ते सांगून मानवी भाषेची कोणतीही सहा लक्षणे सोदाहरण (म्हणजे उदाहरणासह) लिहा.

  • प्रस्तावना : मानवी जीवनात भाषेचे महत्त्व, आवश्यकता याबद्दल ५-६ ओळी लिहा.
  • नंतर भाषा म्हणजे काय? – यात भाषेच्या ५-६ व्याख्या लिहा व त्या समजावून सांगा. म्हणजे एक व्याख्या लिहिली की तिच्याखाली तिचे स्पष्टीकरण, दुसरी व्याख्या व तिचे स्पष्टीकरण असे सविस्तर लिहा. (किमान दीड पाने)
  • नंतर भाषेची लक्षणे (लक्षणे व वैशिष्ट्ये एकच आहेत. लक्षणे म्हणजेच वैशिष्ट्ये)

सुरुवातीला भाषेची खालील सर्व लक्षणे खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायची. नंतर जेवढी लक्षणे विचारलेली आहेत तेवढी खालीलपैकी कोणतीही दीड पानांमध्ये सविस्तर लिहायची. एक एक लक्षण घ्यायचे व त्याच्याबद्दल लिहायचे.

  • ध्वन्यात्मकता/ चिन्हात्मकता
  • द्विस्तरीय रचना
  • यादृच्छिक 
  • अदलाबदल/ भूमिकांतर
  • प्रत्यक्षातीतता/ स्थलकालातीतता
  • सामाजिकता
  • सर्जनशीलता/ निर्मितीशीलता
  • परिवर्तनशीलता
  • सांस्कृतिक संक्रमण
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व लक्षणे म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

 

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख 

रूपिका, रूपिकांतर व रूपिम

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- रूपिका, रूपिकांतर व रूपिम या संकल्पना स्पष्ट करून रूपिमांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर – Read More

स्वन, स्वनिम, स्वनांतर – दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- स्वन, स्वनिम, स्वनांतर या संकल्पना स्पष्ट करून उच्चारण स्थानावर आधारलेले स्वनांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर –

Read More