शिवाजी महाराज व नरेंद्र मोदी

प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून व तो डोक्यावर चढवून नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. हे काही नवीन नाही.

महाराष्ट्रातील लोकांना शिवाजी महाराजांचा अपमान सहन करायची सवय झालेली आहे. एवढेच नाही तर रामदास बसलेले आहेत व ते

Read More

नवीन शैक्षणिक धोरण : काही बदल व परिणाम


आधी पदवी ही तीन वर्षांची असायची. म्हणजे एकदा प्रवेश घेतल्यावर तीन वर्ष पूर्ण करावेच लागायचे. मध्येच सोडले तर फक्त १२ वी शिक्षण गृहीत धरले जायचे. म्हणून मुलं किमान पदवी तरी पूर्ण करायचे. आता प्रत्येक वर्षी प्रमाणपत्र

Read More

महिला दिन विशेष – भारताच्या संदर्भात

@ स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांना जिवंत जाळले जायचे. हा प्रकार थांबावा म्हणून राजा राम मोहन राय यांनी प्रयत्न केले. तेव्हा आजपासून २०० वर्षांपूर्वी सतीबंदीचा कायदा

Read More

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन 

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन

                                                                                  – डॉ. राहुल भा. पाटील

           राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित Read More

खाजगीकरण, कंत्राटीकरण का?

बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर शिकून सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरू लागला, स्वतःची व समाजाची प्रगती साधू लागला. हळूहळू तो IAS, IPS, न्यायाधीश अशा महत्त्वाच्या पदांवर जाऊन निर्णय प्रक्रियेत गेला असता. मग त्यांना या विकासाच्या मार्गापासून दूर कसे न्यायचे? तर आधी रथयात्रा, मग बाबरी मशीदपतन, मग ‘बनायेंगे मंदिर’ची चिथावणी, मग २००५नंतर पेन्शन बंद, मग पदभरती बंद, शाळांचे खाजगीकरण, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, त्यात आरक्षण नाही, नवीन शैक्षणिक धोरण, यामुळे

Read More

मनुवाद्यांचे ध्येय व त्यांच्या यशाचे रहस्य

मनुवाद्यांचे कायम एक ध्येय राहिले आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राज्यसत्ता, धर्मसत्ता, सांस्कृतिक सत्ता, अर्थव्यवस्थेच्या नाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवणे व बहुजन समाजाला आपल्या स्वार्थासाठी गुलाम बनवणे.

या गोष्टी साध्य करण्यासाठी ते
● विविध धर्मग्रंथ, पोथ्या, विविध ग्रंथांची रचना करतात.
● असंख्य जाती निर्माण करून अखंड समाजाला

Read More

आमच्या देशात आधीपासूनच सर्व होते?

आमच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. आमची संस्कृती सर्वात श्रेष्ठ होती व आहे. आम्ही सर्वांना समान समजतो. आमच्याकडे अद्वैती तत्त्वज्ञान आहे. असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न-

ही एवढी सर्व जाणीव भारताला होती मग या ज्ञानावर समाजाची रचना का झाली नाही?

भारताचा परकीयांसमोर पुन्हा पुन्हा पराभव का झाला?

Read More

आजचे युग कशाचे आहे?

आजचे युग हे तलवारींना धार लावून ‘धारकरी’ बनण्याचे नसून विविध आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करून मेंदूला धार लावून बुद्धी कमावून रक्ताचा एक थेंब न सांडता जगावर राज्य करण्याचे आहे. आज अमेरिकेतल्या २-३ कंपन्या मिळून अख्ख्या भारताचे शेअरमार्केट विकत घेऊ शकतात. हे सामर्थ्य त्यांनी

Read More

मनोहर भिडेच्या वादग्रस्त बोलण्याचा अन्वयार्थ

बंधू-भगिनींनो,

भिडेसारख्या किड्यांची ही समस्या आहे की, यांचे वैचारिक पूर्वज ना स्वातंत्र्य चळवळीत होते ना सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत. उलट वेळोवेळी यांनी याविरोधात भूमिका घेतली. स्वातंत्र्यामुळे राजकीय सत्ता यांच्या हातून गेली व समाजसुधारकांनी प्रबोधन केल्यामुळे व संविधानाची निर्मिती तसेच अंमलबजावणीमुळे उच्चवर्णीय म्हणून असलेले हजारो वर्षांपासूनचे विशेष अधिकार पण यांच्या हातून गेले.

स्वातंत्र्यानंतर ४०-४५ वर्षे त्या शहाण्या पिढ्यांनी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. हे लोकांच्या मनातून उतरून गेले होते. पण आता इतिहास

Read More

आस्तिक-नास्तिक असणे ही समस्या नाही. मग कोणती आहे?

आपण आस्तिक आहोत की नास्तिक हे महत्त्वाचे नाहीये.
● आपण एससी, एसटी, ओबीसी, मराठा आहोत व या देशातील बहुतांश आयएएस, आयपीएस, न्यायाधीश, महत्त्वाचे निर्णय घेणारे सत्ताधारी हे आपल्या जातींमधील स्त्रिया व पुरुष नाहीयेत, ही आपल्यापुढील समस्या आहे.

Read More

चित्रपट, मालिका व प्रतिक्रांती

ऐतिहासिक मालिका अथवा चित्रपटांमधील डायलॉगबाजी, नजरांचे, चेहऱ्याचे हावभाव, ती नकली जाणवणारी वेशभूषा, धार्मिक विद्वेषाची फोडणी, ऐतिहासिक घटनांची सोयीनुसार मोडतोड, भडक असे पार्श्वसंगीत, एकूणच सर्वच पातळ्यांवरील भडकपणा या सर्व गोष्टी अतिशय किळसवाण्या वाटतात. ज्यांचा थोडाफार अभ्यास

Read More

लव जिहाद व महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण

लव जिहादमध्ये अडकणाऱ्या (?) हिंदू मुलींसाठी आवाज उठवणाऱ्या, तो पिक्चर चालावा म्हणून डांग आपटणाऱ्या उपटसुंभांना साक्षी मलिक, विनेश फोगट व

Read More

संत, समाजसुधारक व बाबा, बुवा यांच्यातील फरक

महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक यांची जागा आजचे कोणतेही बाबा, बुवा व तथाकथित गुरू घेऊ शकणार नाहीत.

संत व समाजसुधारकांनी कर्मकांडांना विरोध केला. तर हे

Read More

बहुजन समाजापुढील धोके व उपाय

(गावाकडे आलो आहे. लोकांवर माझ्या लहानपणी नव्हता इतका देवाधर्माचा, बाबाबुवांचा प्रभाव पडलेला दिसतो आहे. धर्मांध राजकारणी त्यांच्या या श्रद्धेचा निवडणुका जिंकण्यासाठी उपयोग करून घेत आहेत व त्यांचेच शोषण करत आहेत. म्हणून लिहावेसे वाटले. वाचा.)

लाखो लोकांनी बलिदान दिले, हजारो समाजसुधारकांनी आयुष्यभर प्रबोधनपर कार्य व लेखन केले, लढे दिले तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य व लोकशाही मिळाली. माणूस म्हणून आपल्याला

Read More

संत, समाजसुधारक व बाबा-बुवा

दुष्काळात आपल्या सावकारी वह्या इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त करणारे संत तुकाराम कुठे व आता आपल्या अनुयायांच्या/ अंधभक्तांच्या भक्तीचा गैरफायदा घेऊन बंगले, गाड्या, पेट्रोलपंप,

Read More

मनुवाद्यांचा लोकशाहीला धोका

वाचा, समजून घ्या, निर्णय घ्या, त्यावर ठाम रहा.
अन्यथा भावी पिढ्या गुलामीत खितपत पडतील.

भारतावर
● इंग्रजांची सत्ता – १५० वर्षे,
● मुस्लिम राज्यकर्त्यांची सत्ता – ५००-६०० वर्षे,
● मनुवाद्यांची सत्ता किमान ३००० वर्षे

अस्तित्वात होती.

लक्षात घ्या-

             सगळ्यात घातक सत्ता मनुवाद्यांची असते. कारण यात

Read More

सत्यनारायण विधी करणे गरजेचे आहे का?

प्रिय मित्रांनो,

       शिवाजी महाराजांनी बांधलेल्या व डागडुजी केलेल्या १६० किल्ल्यांचा तसेच एकूण ३७०च्या आसपास किल्ल्यांचा उल्लेख आढळतो. पण त्यांच्यामध्ये प्रवेश करताना एकदाही सत्यनारायण केल्याचा उल्लेख आढळत नाही.

           शिवाजी महाराजांचे एकूण ८ विवाह झालेले होते. त्यांच्या

Read More

खाजगी कंपन्यांचा फायदा, सर्वसामान्यांचे भविष्य धोक्यात

● जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन सुरू – भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचा नवीन पेन्शनचा लाखो कोटी रुपये पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. – खाजगी कंपन्यांचा फायदा.

● खाजगी कंपन्यांचे लाखो कोटी रुपये कर्ज बुडीत खात्यात टाकले – खाजगी कंपन्यांचा फायदा.

Read More

हा संप म्हणजे सामाजिक न्यायाचा लढा आहे!

शेतकरी, कामगार, एसटी, एससी, ओबीसी, एनटी तसेच  सर्व घटकांतील सुजाण नागरिकांनो,

● सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन देणे आजही सुरू आहे व २०३०-३२ पर्यंत चालूच राहणार आहे.

● तरीही सर्व भारतात मोफत रेशन सुरू आहे. इतर वेळेस

Read More

कोरोना व आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्था

             कोरोना काळात आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णतः ठप्प झालेली होती. जवळपास सर्व विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर गेलेले दिसून आले. ऑनलाईन शिक्षण घेणे हे आदिवासी भागातील

Read More

बहुजनांची विनाशकाले विपरीत बुद्धी!

तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, पण जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंतच तुम्हाला माणूस म्हणून अधिकार मिळतील. कोणत्याही धर्मावर आधारित समाज निर्माण केला म्हणजे तुमचे माणूस म्हणून

Read More

गरिबांची मुलं प्राध्यापक कशी बनतील?

गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच

Read More

शाळा-महाविद्यालयांमधील धर्मांधता

दक्षिणेत शाळा व महाविद्यालयांमध्ये हिजाब व भगवे वस्त्र यावरून वाद निर्माण झाला होता. यावरून माझे मत-

भारतात कदाचित पुढील काही दिवसांत अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये एकमेकांविरुद्ध ‘जय श्रीराम’ व ‘अल्ला हुं अकबर’ अशा घोषणा देण्याचे

Read More

बहुजनांनी मोक्याच्या जागा का मिळवाव्यात? भविष्यात काय करावे?

गोविंदराव पानसरे यांच्या ‘जात, धर्म…’ नावाच्या एका पुस्तकात त्यांनी शेतमजूर कुटुंबातून आलेला न्यायाधीश व जमीनदाराच्या कुटुंबातून आलेला न्यायाधीश यांनी एकाच गुन्ह्यातल्या आरोपींना

Read More

‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’ मला विचारतात.

हिंदू धर्मातील अपप्रवृत्तींवर बोलायला गेलो की, आपल्याच हिंदू धर्मातील लोकं ‘तुम्ही मुस्लिम धर्मावर बोलत नाहीत’, असे बोलून मुस्लिमांना मध्ये कसे काय

Read More

मी सामाजिक, धार्मिक विषयांवर का लिहितो, बोलतो?

माझ्या तमाम प्रिय हिंदू बंधू- भगिनींनो,

मी हिंदू कुणबी आहे. मी माझ्या धर्माची विटंबना नाही तर चिकित्सा करतो. राजाराम मोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, म. फुले, शाहू महाराज, सयाजीराव

Read More

वारकऱ्यांनो, सुषमा अंधारे यांचे काय चुकले?

          सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्या संबंधीच्या विधानावरून संतप्त होणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींनो,


         थोडे वास्तव समजून घ्या. संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांचे कार्य मोठे आहे. परंतु त्यांच्या

 

कार्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील अस्पृश्य, शूद्र, स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये सुधारणा झाली Read More

धर्म, समाजसुधारक व उच्चशिक्षित

धर्म-इतिहास-समाजशास्त्राचे अभ्यासक उच्चवर्णीयांच्या धर्माचा वैदिकधर्म, ब्राह्मणधर्म, आर्यधर्म म्हणून उल्लेख करतात. बहुजनांची हिंदू

Read More

समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती : काही निरीक्षणे, काही भाकिते-


● पुढील १० वर्षांनी बहुतांश असे मतदार असतील ज्यांनी २०१४ पूर्वीचा भारत पाहिलेला नसेल.

● आजही असे उच्चशिक्षित मतदार आहेत ज्यांना

Read More

भोंगे-कुणाकुणाला त्रास होतो?

(सप्ताहात भोंगा लावतात व इतरांना त्रास होतो, या एका पोस्टवर माझी प्रतिक्रिया…)

सप्ताह तर असतोच असतो. पण अनेक गावांमध्ये दररोज पहाटे एक दीड तास भक्तिगीते वाजवायची नवीन फॅशन आली आहे. भोंगा एवढा मोठा असतो

Read More

स्वामी समर्थ आणि मी

साधारणतः आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी व माझी पत्नी, मुलं आम्ही जव्हारहून नाशिक, दिंडोरी, सप्तशृंगी गड इकडे माझ्या एका मित्र व त्याच्या कुटुंबासोबत फिरायला गेलो होतो. त्यावेळी दिंडोरी येथे आम्ही तेथील स्वामी समर्थ मंदिरात गेलो होतो. कारण माझ्यासोबत असलेल्या वहिनींची त्यांच्यावर

Read More

राज्यघटना : शांततामय सहजीवनासाठी आवश्यक

निसर्गाचा साधा व सोपा नियम आहे. जे पेराल ते उगवेल. जे उगवेल, ते वाढेल. म्हणून आनंदी, सुखी, समाधानी, शांतताप्रिय समाज निर्मितीसाठी प्रेम, सहिष्णुता, विश्वास, एकमेकांचा आदर, सहयोग, सामाजिक सौहार्द इ. गोष्टी पेरा व वाढवा. द्वेष, हिंसा, असहिष्णुता, कट्टरता इ. तण वाढण्याआधी उपटून टाका.

Read More

नवीन शैक्षणिक धोरण

माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-

भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला

Read More

गेल्या २०० वर्षातील भारतीय समाजाची वाटचाल व मानसिकता

            प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

         या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते. 

        आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.

● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण

Read More

सनातन्यांची कारस्थाने

           नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या

Read More

माझ्या हळदीचा कार्यक्रम

          २०१० साली माझे लग्न झाले. हळदीच्या वेळेस मी व माझ्या घरच्यांनी भटजींना बोलावले नव्हते. तरी ते आले व न सांगता हळदीची तयारी करू लागले. आम्ही त्यांना सांगितलं की, “आम्ही दुसऱ्या

Read More

बहुजनांचे व भारताचे खरे कल्याण केव्हा होईल?

प्रिय बंधू-भगिनींनो,

               हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला

Read More

एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?

एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?

              तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित

Read More

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

(१९६० ते ७५ या कालखंडातील)

             भारतीय समाजात पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्रियांचे स्थान हे दुय्यम दर्जाचे आहे. स्त्री ही उच्च जातीतील असो की कनिष्ठ, सुशिक्षित असो की अशिक्षित तिची अवस्था अतिशय वाईट असलेली दिसून येते. समाजामध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होताना दिसून येते. त्यांना उपभोग्य वस्तू समजले जाते. त्यांच्याकडे वासनेने, कामभावनेने पाहिले जाते. त्यांना निर्णयस्वातंत्र्य नसते. आर्थिक स्वातंत्र्य नसते. कुटुंब व्यवस्था, सामाजिक रूढी-परंपरा, प्रथा, चालीरिती, पुरुषांचा दृष्टिकोन, सामाजिक संघर्ष यामुळे त्यांच्या दु:खात अधिक भर पडलेली दिसून येते. मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये स्त्रियांचे जे चित्रण आलेले आहे, त्यात आपणास हे पहावयास मिळते.

  • नवर्‍यावर प्रचंड प्रेम, भक्तिभाव, जोडीदाराशी एकनिष्ठ स्त्रिया-

Read More

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये चित्रित जातिव्यवस्था, अस्पृश्यता व धर्मांधता : एक अभ्यास

(प्रस्तुत शोधनिबंधामध्ये मराठी व हिंदीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.)
  • प्रस्तावना :
          जात, जातीवरून श्रमविभागणी, अस्पृश्यता, विटाळ, शिवाशिव, विविध धर्मातील लोकांमध्ये परस्पर सहकार्य, प्रसंगी संघर्ष हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. भारतात काही जाती उच्च, तर काही कनिष्ठ किंवा खालच्या मानल्या जातात. त्यानुसार त्यांना कमी-जास्त प्रतिष्ठा मिळत असते. खालच्या जातींना तर प्रतिष्ठाच नसते. उच्च जातीतील लोकांकडून नियमितपणे त्यांचे शारीरिक, आर्थिक, लैंगिक शोषण चालू असते. यासंदर्भात डॉ. बन्सीधर यांचे
“कुछ पुरातन सामाजिक संदर्भ आज भी गांवो की जिंदगी के लिए नासूर बनकर वहां की यातनाओ में वृद्धि कर रहे हैं। इनमें सबसे पहले आती है वर्णभेद और जाति प्रथा कि समस्या। ब्राह्मण तथा अन्य उच्च वर्ग के लोग आज भी निचली जातियों के साथ वैसा ही क्रुरतापूर्ण – अमानुषिक व्यवहार कर रहे हैं जैसा कि वे शताब्दियों पहले किया करते थे। हमारी ग्रामव्यवस्था में आज भी जमींदार है, महाजन हैं तथा इसके साथ अन्य कई शोषक शक्तियां वहां सक्रिय हैं, जो हमेशा निचले वर्गो को दबाये रखने मे विश्वास करती हैं।”१,
हे मत महत्वपूर्ण आहे. याचे प्रत्यंतर आपल्याला मराठी व हिंदीतील जवळपास सर्वच ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळते. 
मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमधील जातिव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे, धर्मांधतेचे चित्रण :

Read More

बरं झालं आपण विज्ञान युगात जन्माला आलो!

बरं झालं, आपण विज्ञानयुगात जन्माला आलो! कोरोना कशापासून होत आहे, त्याच्यापासून संरक्षण कसे करावे, आजार झालाच तर तर काय करावे हे तरी

Read More

मराठी ग्रामीण कादंबर्‍यामधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास (१९६० ते १९७५ या कालखंडातील)

मराठी ग्रामीण कादंबर्‍यामधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास

(१९६० ते १९७५ या कालखंडातील)

        शेतमजूर हा ग्रामीण भागातील वेगळा असा वर्ग नसून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब, अल्पभूधारक, भूमिहीन, बलुतेदार वर्ग हे शेतकरी व जमीनदारांकडे सालगडी, कुळं, शेतमजूर म्हणून काम करताना दिसून येतात. शेतीशी संबंधित नांगरणी, वखरणी, कोळपणी, पेरणी, निंदणी, मशागत, कापणी, मळणी व इतर कामे हा वर्ग करत असतो. शेतमजुरांशिवाय शेतकरी व जमीनदार यांना शेती करणे शक्य झाले नसते. या वर्गाकडे शारीरिक श्रमाशिवाय उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नसते. तसेच त्या कालखंडात त्यांना त्यांच्या कष्टाचा पुरेसा मोबदला मिळत नव्हता. यामुळे या वर्गाची परिस्थिती अतिशय हलाखीची दिसून येते. त्यांच्याकडे स्थावर मालमत्तासुद्धा फार नसते, बलुतेदार व भूमिहीनांकडे तर राहत्या घराशिवाय दुसरी मालमत्ता नसते. शेतकरी व जमीनदार यांच्यावर हे शेतमजूर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतात. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाच्या आर्थिक परिस्थितीचे सविस्तर चित्रण आलेले दिसून येते.

        ‘धग’ या कादंबरीतील शेतमजूर या वर्गाचा विचार करता असे दिसून येते की, शेतमजुरी करणार्‍यांमध्ये बलुतेदार, लहान शेतकरी व अस्पृश्य जातीतील लोकं आहेत. सीता म्हालीन ही शेतकरी कुटुंबातील आहे. कौतिक, कौतिकचा नवरा व मुले, सकीना, Read More

‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानासाठी मी काढलेल्या नोट्स

          ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.

            इतिहास- पार्श्वभूमी-

            आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.

          भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More

शिवजयंतीनिमित्त

          प्रिय मित्रांनो, 
       येत्या १९ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील पहिले पराक्रमी व कर्तबगार महापुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करणार आहोत. या दिवशी आपण मोटरसायकलला झेंडा लावून रॅल्या काढतो,

Read More