‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन 

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन

                                                                                  – डॉ. राहुल भा. पाटील

           राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित Read More

‘प्रतिपश्चंद्र’ कादंबरीमध्ये चित्रित शिवाजी महाराजांचे चरित्र

‘प्रतिपश्चंद्र’ ही डॉ. प्रकाश सुर्यकांत कोयाडे यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी असून या कादंबरीची पहिली आवृत्ती १ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झाली. गेल्या तीन वर्षात या कादंबरीच्या दहा आवृत्त्या संपलेल्या असून आता अकरावी आवृत्ती सुरू आहे. ‘प्रतिपश्चंद्र’ या शीर्षकावरूनच ही कादंबरी शिवाजी महाराजांशी संबंधित असल्याचे लक्षात येते. ही एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी असून या कादंबरीत तेरावे, सतरावे व एकविसावे शतक अशा ८०० वर्षातील कालखंडाची सांगड घालून लेखकाने कथानक रचलेले

Read More

दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप

दलित साहित्य : संकल्पना व स्वरूप

                दलित साहित्याच्या निर्मितीच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार व तत्त्वज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध लढे दिले, ज्यात महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, धर्मांतराची घोषणा व प्रत्यक्ष धर्मांतर, ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’मधील लिखाण, राज्यघटनेचे लेखन, गोलमेज परिषदेतील सहभाग व राखीव जागांची तरतूद यामुळे दलित समाजामध्ये आत्मभान, नवचैतन्य, लढवय्येपणा निर्माण झाला. त्यांच्या जीवनविषयक जाणिवा बदलल्या. ते आपल्या

हक्कांप्रती जागृत झाले. आपल्यावर हजारो वर्ष होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव झाली. या अन्यायाविरुद्ध स्वाभाविक चीड, संताप त्यांच्यात निर्माण होऊ लागला. आधी तो व्यक्त करणे शक्य नव्हते, आता ते प्रत्यक्ष जगण्यातून व साहित्याच्या माध्यमातून ते व्यक्त करू लागले. म्हणून दलित साहित्यात आपल्याला चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना, इ. गोष्टी दिसून येतात. दुसर्‍या कोणत्याही साहित्यप्रवाहात आपल्याला या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत.

Read More

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

(१९६० ते ७५ या कालखंडातील)

             भारतीय समाजात पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्रियांचे स्थान हे दुय्यम दर्जाचे आहे. स्त्री ही उच्च जातीतील असो की कनिष्ठ, सुशिक्षित असो की अशिक्षित तिची अवस्था अतिशय वाईट असलेली दिसून येते. समाजामध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होताना दिसून येते. त्यांना उपभोग्य वस्तू समजले जाते. त्यांच्याकडे वासनेने, कामभावनेने पाहिले जाते. त्यांना निर्णयस्वातंत्र्य नसते. आर्थिक स्वातंत्र्य नसते. कुटुंब व्यवस्था, सामाजिक रूढी-परंपरा, प्रथा, चालीरिती, पुरुषांचा दृष्टिकोन, सामाजिक संघर्ष यामुळे त्यांच्या दु:खात अधिक भर पडलेली दिसून येते. मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये स्त्रियांचे जे चित्रण आलेले आहे, त्यात आपणास हे पहावयास मिळते.

  • नवर्‍यावर प्रचंड प्रेम, भक्तिभाव, जोडीदाराशी एकनिष्ठ स्त्रिया-

Read More

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये चित्रित जातिव्यवस्था, अस्पृश्यता व धर्मांधता : एक अभ्यास

(प्रस्तुत शोधनिबंधामध्ये मराठी व हिंदीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.)
  • प्रस्तावना :
          जात, जातीवरून श्रमविभागणी, अस्पृश्यता, विटाळ, शिवाशिव, विविध धर्मातील लोकांमध्ये परस्पर सहकार्य, प्रसंगी संघर्ष हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. भारतात काही जाती उच्च, तर काही कनिष्ठ किंवा खालच्या मानल्या जातात. त्यानुसार त्यांना कमी-जास्त प्रतिष्ठा मिळत असते. खालच्या जातींना तर प्रतिष्ठाच नसते. उच्च जातीतील लोकांकडून नियमितपणे त्यांचे शारीरिक, आर्थिक, लैंगिक शोषण चालू असते. यासंदर्भात डॉ. बन्सीधर यांचे
“कुछ पुरातन सामाजिक संदर्भ आज भी गांवो की जिंदगी के लिए नासूर बनकर वहां की यातनाओ में वृद्धि कर रहे हैं। इनमें सबसे पहले आती है वर्णभेद और जाति प्रथा कि समस्या। ब्राह्मण तथा अन्य उच्च वर्ग के लोग आज भी निचली जातियों के साथ वैसा ही क्रुरतापूर्ण – अमानुषिक व्यवहार कर रहे हैं जैसा कि वे शताब्दियों पहले किया करते थे। हमारी ग्रामव्यवस्था में आज भी जमींदार है, महाजन हैं तथा इसके साथ अन्य कई शोषक शक्तियां वहां सक्रिय हैं, जो हमेशा निचले वर्गो को दबाये रखने मे विश्वास करती हैं।”१,
हे मत महत्वपूर्ण आहे. याचे प्रत्यंतर आपल्याला मराठी व हिंदीतील जवळपास सर्वच ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळते. 
मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमधील जातिव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे, धर्मांधतेचे चित्रण :

Read More

मराठी ग्रामीण कादंबर्‍यामधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास (१९६० ते १९७५ या कालखंडातील)

मराठी ग्रामीण कादंबर्‍यामधील शेतमजुरांची आर्थिक स्थिती: एक अभ्यास

(१९६० ते १९७५ या कालखंडातील)

        शेतमजूर हा ग्रामीण भागातील वेगळा असा वर्ग नसून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब, अल्पभूधारक, भूमिहीन, बलुतेदार वर्ग हे शेतकरी व जमीनदारांकडे सालगडी, कुळं, शेतमजूर म्हणून काम करताना दिसून येतात. शेतीशी संबंधित नांगरणी, वखरणी, कोळपणी, पेरणी, निंदणी, मशागत, कापणी, मळणी व इतर कामे हा वर्ग करत असतो. शेतमजुरांशिवाय शेतकरी व जमीनदार यांना शेती करणे शक्य झाले नसते. या वर्गाकडे शारीरिक श्रमाशिवाय उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नसते. तसेच त्या कालखंडात त्यांना त्यांच्या कष्टाचा पुरेसा मोबदला मिळत नव्हता. यामुळे या वर्गाची परिस्थिती अतिशय हलाखीची दिसून येते. त्यांच्याकडे स्थावर मालमत्तासुद्धा फार नसते, बलुतेदार व भूमिहीनांकडे तर राहत्या घराशिवाय दुसरी मालमत्ता नसते. शेतकरी व जमीनदार यांच्यावर हे शेतमजूर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असतात. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाच्या आर्थिक परिस्थितीचे सविस्तर चित्रण आलेले दिसून येते.

        ‘धग’ या कादंबरीतील शेतमजूर या वर्गाचा विचार करता असे दिसून येते की, शेतमजुरी करणार्‍यांमध्ये बलुतेदार, लहान शेतकरी व अस्पृश्य जातीतील लोकं आहेत. सीता म्हालीन ही शेतकरी कुटुंबातील आहे. कौतिक, कौतिकचा नवरा व मुले, सकीना, Read More

ग्रामीण साहित्याचे स्वरूप

ग्रामीण साहित्याचे स्वरूप

        माझ्या ब्लॉगवरील या आधीच्या ‘ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा’ या लेखामध्ये ग्रामीण साहित्याच्या विविध प्रेरणांचे विवेचन केलेले आहे, त्या प्रेरणांमधून ग्रामीण साहित्य निर्माण झालेले आहे. ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाचा विचार करता, कालखंडानुसार ग्रामीण साहित्याच्या स्वरूपात फरक दिसून येतो. 

        १९२० च्या आधीच्या ग्रामीण साहित्यावर आपल्याला महात्मा फुले व त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे वैचारिक ग्रंथ व ‘अखंडा’मधून (कविता) ग्रामीण भागातील शेतकरी व इतर शूद्र वर्गाच्या शोषणाची मीमांसा केली. खेड्यापाड्यातील काबाडकष्ट करणाऱ्या Read More

आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन

आदिवासी लोकगीतांमधील स्त्रीदर्शन

 

प्रस्तावना-

          भारत हा बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असा देश आहे. भारतात आजही काही मोजक्या भाषांमधूनच लेखन केले जाते. तर १६०० पेक्षा जास्त बोली या फक्त बोलल्या जातात. म्हणजे त्या लिपीबद्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्यात लिखित साहित्य हे खूप कमी आहे किंवा जे आहे ते अगदी अलीकडे म्हणजे २५-३० वर्षांत या समूहातील नवशिक्षित वर्गाकडून लिहिले गेलेले आहे. परंतु आज त्या बोलींमध्ये जे मौखिक साहित्य उपलब्ध होते ते अतिशय मुबलक असे आहे. हे मौखिक साहित्य नेमके केव्हा निर्माण झाले हे आज कुणीही सांगू शकत नाही. परंतु पिढ्यानपिढ्यांपासून ते चालत आलेले आहे. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत.

          महाराष्ट्रातील आधीच्या ठाणे व आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका आहे. या तालुक्यात ‘क’ ठाकूर, ‘म’ ठाकूर, Read More

ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा

          कोणत्याही प्रकारच्या साहित्याच्या निर्मितीमागे काही ना काही प्रेरणा या असतातच. त्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही. मम्मटाने सांगितलेल्या प्रेरणा आपल्याला सर्वांनाच माहित आहेत. तशाच ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागेही काही प्रेरणा आहेत. त्या पुढील प्रमाणे –

१) ‘ग्रामीणते’चा शोध घेणे –

          ग्रामीण साहित्याचे वेगळेपण हे त्याच्या ‘ग्रामीणते’त आहे. ग्रामीणतेची ही जी जाणीव आहे, तिचा शोध घेणे व ती व्यक्त करणे ही ग्रामीण साहित्याच्या निर्मितीमागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रचार प्रसारामुळे  शिकलेली पहिली पिढी निर्माण झाली.  या पिढीच्या असे लक्षात आले की, आतापर्यंत ग्रामीण म्हणून जे साहित्य लिहिले गेलेले आहे किंवा एकूणच जे मराठी साहित्य आहे, यात ग्रामीण भागाचे, तेथील लोकांच्या जगण्याचे त्यांच्या सुख-दुखांचे वास्तव चित्रण आलेले नाही. ग्रामीण Read More

‘बारोमास’ कादंबरीतील शेवंतामाय

            शेवंतामाय ही ‘बारोमास’ या कादंबरीतील एक महत्वाची स्त्री  व्यक्तिरेखा आहे. ती एक अशिक्षित ग्रामीण स्त्री आहे. शेतात काम करणे, नवर्‍यासोबत गरिबीच्या संसाराचा गाडा हाकणे, यातच तिचे आयुष्य जात राहते. ती मोठ्या आशेने कष्ट करून दोन्ही मुलांना शिकवते. एकनाथ एम. ए., बी. एड. तर मधू शेतकी होतो.  आपली मुले शिकून नोकरीला लागतील, या आशेने ती शिकणार्‍या मुलांचे वेळेवर डबे करून देणे, कपडे व्यवस्थित धुणे इ. कामे कित्येक वर्षे करत राहते. परंतु, एकही मुलगा नोकरीला न लागल्यामुळे शेवटी तिला अपयश येते.

            गरिबीमुळे तिला अंगावर नवीन साडीही मिळत नाही. म्हणून ती जुन्या साड्या एकमेकांना जोडून (त्यांचे दांडे भरून) ते वापरते. संसार चालवण्यासाठी, घरखर्च किंवा शेतीत खर्चासाठी तिच्या सोन्याचा पुतळ्या, पाटल्या विकले गेलेले असते. तरीही ती कधीही कुणाकडे तक्रार करत नाही. शेवंता माय ही जरी कष्टाळू व काही प्रमाणात समजूतदार, परिस्थितीशी जुळवून घेणारी असली तरी ती तोंडाळ आहे. सुनेला, एकनाथला ती नेहमी घालून-पाडून बोलते. एकनाथ एवढा शिकलेला व आज्ञाधारक असला तरी त्याचा बायकोबाबतचा काळजीपूर्ण व्यवहार पाहून ती एकनाथला ‘बाईलबुग्या, बायकोचा भाड्या’ असे शब्द अनेकदा वापरते. मधूपुढे मात्र तिचे काही चालत नाही. मधू नोकरीसाठी शेती कराराने लिहून देतो व तिच्याकडे एक लाख रुपये ठेवायला देतो. तेव्हा तिला रात्र रात्रभर झोप येत नाही. ते पैसे ती एका पेटीत ठेवते. त्या पेटीला कुलूप लावते व अतिशय काळजी घेते. घराबाहेरही कधी जात नाही. त्यानंतर ते पैसे घरात खड्डा खोदून त्यात पुरून टाकते. Read More

ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे

(तौलनिक भाषा व वाङ्मय विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. ०४ व ०५ मार्च २००९ रोजी झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात सादर केलेला शोधनिबंध…)

(१)

ग्रामीण आणि दलित साहित्यलेखनाला सुरुवात होऊन आता बराच काळ लोटला आहे. या साहित्यप्रकारांवर आतापर्यंत खूप चर्चा व लेखनही झालेले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात साहित्याच्या प्रवाहाबाहेरील, दुर्लक्षित, उपेक्षित अशा जीवनाविषयीचे दलित व ग्रामीण साहित्य आज मराठी साहित्याचा मध्यवर्ती प्रवाह बनलेलेले आहे, ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे.

दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्याने भारतीय साहित्याला दिलेली मोठी देणगी आहे. खास मराठी मातीतून उगवलेलं, अस्सल देशीवादी साहित्य म्हणून या साहित्याचा उल्लेख करता येईल. प्रस्थापित मराठी साहित्य हे मध्यमवर्गीय जीवनाभोवती रुंजी घालत असताना, रंजनवादी, कलावादी विचारांचा मराठी साहित्यावर जबरदस्त प्रभाव असताना ग्रामीण व दलित साहित्याने मराठी साहित्याला वास्तवाभिमुख, समाजाभिमुख करण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे.

ग्रामीण आणि दलित साहित्यात पुष्कळ साम्य आहे. त्यातील एक म्हणजे या दोन्ही प्रकारच्या साहित्यात गावातील व गावकुसाबाहेरील लोकांच्या जीवनाचे चित्रण आलेले आहे. मात्र ग्रामीण साहित्यात गावकुसाच्या आतील लोक केंद्रभागी असतात; तर दलित साहित्यात गावकुसाबाहेरील. उपेक्षित विश्वाचे, खऱ्या-खुऱ्या दुःखांचे, मानवी भावभावनांचे, ग्रामीण भागात, गावकुसाबाहेर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दुर्लक्षित, अज्ञान, दारिद्र्य, भूक, शोषण, वेदना यांनी पिचलेल्या समाजाचे, इथल्या मूळ मातीचे, लोकपरंपरांचे, लोकसंस्कृतीचे, शिक्षणाने, महापुरुषांच्या विचारांनी, कार्याने जागृत झालेल्या, परिवर्तनाच्या टप्प्यावर, उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या, आत्मभान प्राप्त झालेल्या, आपल्या हक्कांसाठी, साध्या माणूसपणाच्या अधिकारासाठी विद्रोहास सज्ज असलेल्या मानव समुहांचे, त्यांच्या बदलत चाललेल्या जीवनाचे, येथल्या कृषिसंस्कृतीचे, आदिम जीवनाचे अशा या मध्यमवर्गीयांना अपरिचित असलेल्या विश्वाचे दर्शन ग्रामीण व दलित साहित्याने मराठी वाचकाला घडविले.

(२)

Read More

1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में पाकिस्तान निर्मिती की घटनाएँ और परिणाम : एक अध्ययन

1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में

पाकिस्तान निर्मिती की घटनाएँ और परिणाम : एक अध्ययन

प्रस्तावना:

            साहित्य को सामाजिक जीवन का दर्पण कहा जाता है। हर एक काल के महान साहित्यकृतीओ मे समसामयिक घटनाओं, विचारधारा, जनता के मन पर इसके प्रभाव को काल्पनिक पात्रों और घटनाओं के माध्यम से वास्तविक रूप में चित्रित किया जाता है। साहित्य में उस समय के समाज का दर्शन होता है। इसलिए साहित्य को सामाजिक जीवन के अध्ययन करने का एक महत्वपूर्ण साधन माना जाता है।

            भारत के इतिहास में पाकिस्तान की निर्मिती एक महत्वपूर्ण राजनीतिक घटना है। इसका भारत के सामाजिक, राजनीतिक और सांस्कृतिक जीवन पर तात्कालिक और दूरगामी परिणाम हुआ हैं। 1945 के आसपास, पाकिस्तान बनाने का विचार गति पकड़ रहा था। अंग्रेजों ने इन विचारों को खाद देने का काम किया। मुस्लिम लीग मुसलमानों का प्रतिनिधित्व करने वाली पार्टी थी। इस पार्टी ने स्वतंत्र पाकिस्तान के निर्माण की पुरजोर वकालत करनी शुरू कर दी। इस मुद्दे पर मोहम्मद अली जिन्ना का नेतृत्व आगे आया। ये विचार मुस्लिम बहुल गांवों और कस्बों में व्यापक रूप से प्रचारित किए गए थे। स्वतंत्र पाकिस्तान के निर्माण के पीछे के कारण, विचारधारा, इसके लिए चुना गया रास्ता, आम लोगों की प्रतिक्रिया और इस घटना के परिणाम इन सब का चित्रण 1960 से 1975 इस काल के उपन्यासों मे आया  हैं।

अनुसंधान कार्य का महत्व:

            प्रस्तुत शोध पत्र मे 1960 से लेकर 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में चित्रित  स्वतंत्र पाकिस्तान के निर्माण के कारण, इसके पीछे की विचारधारा, इसके लिए चुना गया रास्ता, आम लोगों की प्रतिक्रिया और इस घटना के परिणाम आदि बातों का अध्ययन किया गया है। ग्रामीण क्षेत्रों में तत्कालीन हिंदू और मुसलमान, उनके आपसी संबंध, उनका इन घटनाक्रमों की तरफ देखने का दृष्टिकोण, इस घटना का भारत के ग्रामीण क्षेत्रों पर, वहां के लोगों पर, सामाजिक, राजनीतिक, आर्थिक जीवन इनके उपर पडा हुआ प्रभाव, उस समय की वास्तविकता आदि बातें इस शोध पत्र से सामने आती है।

उद्देश्य:

1) 1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में चित्रित पाकिस्तान के निर्माण की घटनाए, इस घटना के पीछे के कारण आदि का अध्ययन करना।

2) इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासो में आए हुए चित्रण से ग्रामीण क्षेत्रों के सामाजिक, राजनीतिक और आर्थिक जीवन पर इस घटना के प्रभावों का अध्ययन करना।

3) इस संबंध में, उस समय के ग्रामीण क्षेत्रों के आम लोगों की मानसिकता, इस घटना के प्रति उनका दृष्टिकोण, आदि बातों को खोजना।

4) 1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में चित्रित इस घटना के संदर्भ में समानता और अंतर का अध्ययन करना।

परिकल्पना (Hypothesis) :

1) 1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी के ‘इंधन’, ‘आधा गांव’, ‘अलग-अलग वैतरणी’ इन ग्रामीण उपन्यासों मे पाकिस्तान के निर्माण की घटना, इस घटना के पीछे के कारण आदि बातों का विस्तृत वर्णन आया हुआ है।

2) भले ही पाकिस्तान के गठन के समय भारत में कई स्थानों पर दंगे हुए थे, लेकिन ग्रामीण इलाकों में हिंदुओं और मुसलमानों के बीच शांति और सद्भाव बना हुआ था।

3) पाकिस्तान के गठन से ग्रामीण क्षेत्रों के सामाजिक, राजनीतिक, सांस्कृतिक और आर्थिक जीवन पर कई तात्कालिक और दूरगामी प्रभाव हुए हैं।

4) दोनों भाषाओं के ग्रामीण उपन्यासों में पाकिस्तान के निर्माण का यथार्थ चित्रण आया हुआ है, उसमें कुछ समानताएँ और कुछ अंतर हैं।

संशोधन कार्यप्रणाली Research Methodology:

‘1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में पाकिस्तान निर्मिती की घटनाएँ और परिणाम : एक अध्ययन’ इस शोध पत्र के लिए वर्णनात्मक, विश्लेषणात्मक (Analytical) आदि अनुसंधान विधियों का उपयोग किया गया है। दो भाषाओं के उपन्यासों के अध्ययन होने के कारण तुलनात्मक समीक्षा पद्धति का उपयोग किया है। साथ ही Primary Data और जहाँ आवश्यक हो वहा पे Secondary Data का इस्तेमाल किया गया है।

—————————————————————————————————————-

स्वतंत्र पाकिस्तान के निर्माण के पीछे के कारण, विचारधारा, इसके लिए चुना गया रास्ता, आम लोगों की प्रतिक्रिया और इस घटना के परिणाम इन सब का चित्रण 1960 से 1975 तक के उपन्यासों मे निम्नलिखित स्वरूप मे आया  हैं।

Read More

१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये चित्रित पाकिस्तान निर्मितीची घटना व परिणाम

प्रस्तावना :

साहित्याला समाजजीवनाचा आरसा असे म्हणतात. त्या-त्या कालखंडातील श्रेष्ठ अशा साहित्यकृतींमधून समकालीन घडामोडी, विचारप्रणाली, त्याचा जनमानसावर होणारा परिणाम याचे काल्पनिक पात्रे व घटनाप्रसंगांच्या माध्यमातून वास्तव असे चित्रण केलेले असते. म्हणूनच आपल्याला तत्कालीन समाजाचे दर्शन घडत असते. म्हणून साहित्य हे समाजजीवन अभ्यासण्याचे एक महत्वाचे साधन मानले जाते.

पाकिस्तान निर्मितीची घटना ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची राजकीय घटना आहे. भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर या घटनेचे तात्कालिक व दूरगामी असे अनेक परिणाम घडून आलेले आहेत. १९४५ च्या आसपास पाकिस्तान निर्मितीचा विचार जोर पकडू लागला होता. इंग्रजांनी या विचारांना खतपाणी घालण्याचे काम केले. मुस्लीम लीग हा मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता. या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा जोरदार पुरस्कार करायला सुरुवात केली. मोहम्मद अली जिनांचे नेतृत्त्व याच मुद्द्यावरून पुढे आले. मुस्लिमबहुल गाव व शहरांमध्ये या विचारांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीमागची कारणे, त्यामागची विचारधारा, त्यासाठी निवडलेले मार्ग, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आणि या घटनेचे परिणाम यांचे चित्रण १९६० ते १९७५ या कालखंडातील या कादंबर्‍यांमधून पुढीलप्रमाणे आलेले आहे.

मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमधील चित्रण :

मराठीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांपैकी हमीद दलवाई लिखित ‘इंधन’ (१९६८) ही अतिशय वास्तववादी स्वरूपाची कादंबरी आहे. या कादंबरीत पाकिस्तान निर्मिती, त्या दरम्यान झालेले दंगे, मोहम्मद अली जीना इ. गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. या कादंबरीत कोकणातील एका मुस्लीमबहुल खेड्याचे जीवनचित्रण आलेले आहे. या गावातील मुसलमानांचा पाकिस्तान निर्मितीसाठी जीनांना पाठिंबा होता. ते मुस्लीम लीग या पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी तिथल्या मापारी मशिदीजवळ दंगाही घडवून आणलेला होता. नायकाच्या वडिलांना आणि इतर मुसलमानांना असे वाटायचे की, “पाकिस्तान मिळालं की, सब कुछ ठीक होईल. इकडे मुसलमान, तिकडे हिंदू राहिले की कुणी कुणाच्या केसाला धक्का लावणार नाही.” १ परंतु, स्वातंत्र्य मिळून पंधरा वर्षे झालीत तरी हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लीम संबंधांत आणि भारत-पाकिस्तानात प्रचंड तणाव राहिला. हे बघून नायकाच्या वडिलांना असे वाटते की, पाकिस्तान निर्मिती ही जीना साहेबांकडून झालेली मोठी चूक आहे. एकदम स्वतंत्र पाकिस्तान मागण्याऐवजी भारताशी कुठे तरी बांधून घ्यायला हवे होते. म्हणजे अशी वाईट अवस्था झाली नसती. जीनासाहेब एवढे हुशार होते. परंतु, ही चूक त्यांच्या हातून झाली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. परंतु, आम्ही अडाणी, अशिक्षित प्रजा होतो. ते पुढारी होते. त्यांनी आम्हाला सुधारायचे काम होते.

यावरून, भारत-पाक फाळणीला पंधरा वर्षे उलटल्यावर पाकिस्तान निर्मिती ही जीनांकडून झालेली एक मोठी चूक आहे, असे या कादंबरीतील मुसलमानांना वाटत असल्याचे दिसून येते. कारण ज्या हेतूसाठी पाकिस्तानची मागणी केली होती. तो पूर्ण होऊ शकला नाही. हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाक यांच्यातील संबंध नंतरच्या काळातही तणावग्रस्त राहिले.

या कालखंडातील इतर मराठी कादंबर्‍यांमध्ये या संदर्भातील चित्रण आढळले नाही.

हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील चित्रण :

Read More

‘बारोमास’ कादंबरी- २

             एकनाथला आता आभाळात ढग येऊ लागल्याने पावसाळा सुरू होईल असे वाटते. त्यासोबतच आता पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंता त्याला सतावू लागते. त्याच्या कुटुंबात तोच आता कर्ता आहे. व्यवहार त्याच्याच हातात आहे. लहान भाऊ मधू याचे शेतकीचे शिक्षण झालेले असूनही त्याला शेतीत बिलकूल रस नाही. तो गावातील त्याच्या काही सुशिक्षित परंतु बेरोजगार व रिकामटेकड्या मित्रांबरोबर गावाबाहेरच्या माळरानावर जुन्या ऐतिहासिक खुणा असलेल्या ठिकाणी खोदकाम करून सोने, जुन्या काळातील दागिने शोधण्यासाठी दररोज रात्र-रात्रभर जातो.  त्याला त्याबद्दल घरातल्यांनी काही बोलले तर तो सांगतो की, “मले सोनं उकरायले जाऊ देत नाई, त नाई जात. मंग मले जीप देऊन द्या एक. सन्नान चिखली-खामगाव आशा सवार्‍या वाह्यतो. अन् दणकावून पैसे कमावून आणतो.” (पृ. ६) पण जीप घेण्यासाठी घरात कुणाकडेच पैसे नसल्याने त्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. Read More

‘बारोमास’ कादंबरी- १

             ‘बारोमास’ ही सदानंद देशमुख यांची ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. या कादंबरीला २००४ साली भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. या कादंबरीमधून ग्रामीण भागातील तीन पिढ्यांमधील बदलत्या ग्रामवास्तवाचे, कृषीजीवनाचे चित्रण आलेले आहे.

           बारोमास म्हणजे बारा महिने. बारा महिने शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना पेरणीपासून ते कापणीपर्यंत व शेतमाल मार्केटमध्ये नेऊन तो विकून पैसे मिळेपर्यंत; तर पुढील वर्षांच्या पेरणीपूर्वी मशागतीपर्यंत शेतकर्‍यांना ज्या काही हालअपेष्टाना सामोरे जावे लागते, त्याचे चित्रण या कादंबरीत सदानंद देशमुख यांनी अतिशय वास्तवदर्शी शैलीतून साकारलेले आहे.

            ही कादंबरी विदर्भातील मोहाडी तालुक्यातील सांजोळ गाव व त्या भोवतालच्या ग्रामीण परिवेश यावर आधारलेली आहे. या कादंबरीत तीन पिढ्यांचे चित्रण आलेले आहे. नानूआजा, वडील सुभानराव-आई शेवंता, त्यांची मुलं एकनाथ, मधू, सून अलका अशा

Read More

१९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारवर्गाची आर्थिक परिस्थिती

प्रस्तावना :

स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीनदार हा अतिशय सधन असा वर्ग होता. ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या मानाने या जमीनदारांची लोकसंख्या अतिशय कमी होती. म्हणजे एका गावात एक किंवा दोन घरे असायची. या वर्गाकडे मुबलक प्रमाणात शेती होती. शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन होते. याव्यतिरिक्त काही जमीनदारांकडे शेतसारा वसुलीचे अधिकार होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण गाव, गावातील लोकं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अवलंबून असायचे. त्यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे असायचे. मोठमोठी घरे, वाडे, दागदागिने, महाग, किमती कपडे, दळणवळणासाठी घोडे, बैलांची सारवट गाडी यांचा वापर ते करत. जमीनदार हा वर्ग ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणाच होता. कारण गावातील बहुतांश लोकं जमीनदारांच्या शेतावर राबून, प्रसंगी त्यांच्याचकडून कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह भागवित.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने जमीनदारी निर्मूलनाचा (कुळकायदा) केला. या कायद्याचा जमीनदारांच्या उत्पन्नाच्या साधनांवर, आर्थिक स्थितीवर, त्यांच्या राहणीमानावर खूप मोठा व दूरगामी परिणाम घडून आला. जमीनदारांची शेतजमीन जे शेतकरी, कुळं कसायचे, कुळकायद्याने ती शेती त्यांच्या मालकीची झाली. तसेच जमीनदारांकडची अतिरिक्त शेतजमीन काढून घेण्यात आली आणि ती भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली. शेती हेच या जमीनदारांचे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे व प्रभावी साधन असल्याने नंतरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली. अनेक जमीनदारांकडे त्या-त्या भागातील शेतसारा वसुलीचा अधिकार होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा तयार करण्यात आल्याने त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे आणखी एक साधन कमी झाले. या अशा अनेक कारणांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जमीनदार कर्जबाजारी आणि आर्थिकदृष्ट्या बेजार झाले. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये या वर्गाचे, त्यांच्या आर्थिक स्थितीचे, राहणीमानाचे, पडझडीचे चित्रण पुढीलप्रमाणे आलेले आहे.

  • मराठी ग्रामीण कादंबर्‍यांमधील जमीनदारांची आर्थिक परिस्थिती :

Read More

तौलनिक साहित्याभ्यास – १ (माझ्या पीएचडीच्या प्रबंधातून)

तुलना करणे ही मानवाची स्वाभाविक अशी प्रवृत्ती आहे. आपण नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रकट वा अप्रकट तुलना करीत असतो. तुलना करताना एकापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. अशा एकापेक्षा अधिक गोष्टींमधून एकाची निवड करावयाची असेल तर तुलना ही आपोआपच आपल्याकडून होत असते. तर कधी-कधी ती आपण जाणिवपूर्वक करत असतो. आपण आपले विचार, मूल्य ठरवितानाही तुलना करूनच आपल्या स्वभावानुरूप ठरवित असतो.

साहित्याचा विचार करताना तुलनेला अत्यंत

Read More

ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा

ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा

              १९६० नंतर मराठी साहित्यात जे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या अतिशय मोलाची भर घातलेली आहे. एक नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र मराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले. या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्याने केले आहे.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

  • ‘ग्रामीण साहित्य’ संकल्पना- 

           ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना समजून घेत असताना आधी ‘ग्रामीण’ ही संकल्पना समजून घ्यावी लागते. ‘ग्रामीण’ या शब्दातून ग्राम-गाव-खेडे इत्यादी गोष्टी लक्षात येतात. ग्राम-गाव किंवा खेडे याची रचना, त्याचे स्वरूप-वैशिष्ट्ये समजून घेतल्यास ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट होऊ शकते.

        अलीकडे ग्रामीण जीवनात अनेक परिवर्तने घडून आलेली आहेत. त्याआधी गाव हे गावगाड्यावर आधारलेले होते. या गावगाड्यात शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, दलित, फिरस्ते इत्यादींचा समावेश होता. हे सर्व घटक गावपातळीवर एकमेकांशी निगडित व परस्परांवर अवलंबून होते. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय, उत्पन्नाचे मुख्य साधन. शेती करणारा शेतकरी. त्याला शेती व गृहोपयोगी वस्तू व अवजारे करून देणारे सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, सोनार इ. जाती किंवा व्यावसायिक; सेवा पुरवणारे न्हावी, रामोशी, धोबी, कोळी; ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगळा इत्यादी जाती. या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेतकर्‍याकडे शेतीतून उत्पन्न आल्यावर तो त्यातून विशिष्ट हिस्सा किंवा वाटा या सर्व घटकांना द्यायचा, त्याला ‘बलुते’ असे म्हणायचे. ते त्यांच्या कामाचा व श्रमाचा मोबदला म्हणून दिले जायचे. या बलुत्यावर या जाती-व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालायचा. याचा अर्थ शेती ही केंद्रस्थानी होती व इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना परिवर्तनपूर्व काळात अस्तित्वात होती.

Read More