गेल्या २०० वर्षातील भारतीय समाजाची वाटचाल व मानसिकता

            प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

         या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते. 

        आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.

● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण

Read More

 ‘रोजगारी’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

         ‘रोजगारी’ ही कथा गावगाड्यातील एका शेतमजूर कुटुंबातील एक १४ वर्षाचा मुलगा आपल्या आई व वडिलांप्रमाणे शेतमजुरी न करता व्यवसायाला सुरुवात करतो आणि आत्मविश्वास व स्वाभिमानाने जगायला लागतो, या विषयावर आधारलेली आहे.

          मारत्या ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तो १४ वर्षाचा आहे. त्याची आई पाटलाकडे शेतमजुरी करायला जाते व त्यावर तिचा व मारत्याचा उदरनिर्वाह भागवते. तिची अशी इच्छा असते की, मुलाने सुद्धा आता आपल्यासोबत पाटलाकडे Read More

   ‘ससा आणि सर्कस’(SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

          ‘ससा आणि सर्कस’ ही कथा बाब्या नावाच्या एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या जीवनावर आधारलेली आहे. बाब्या पाच-सहा वर्षाचा असूनही त्याला ‘मा’ आणि ‘बा’ या दोन शब्दांशिवाय काहीच बोलता येत नाही. त्याच्या वेळेस त्याची आई गरोदर असताना तिच्याकडून काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी खाल्ली गेली होती. त्यामुळे बाब्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मोठा होऊनही त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला नाही.

          बाब्यासोबत नेहमी एक ससा राहायचा. तो कुठेही गेला तरी सशाची साथ सोडायचा नाही. हा ससा त्याला एका वर्षापूर्वी Read More

 ‘मोर्चा’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

           ‘मोर्चा’ ही कथा शिवराम व त्याची आठ वर्षाची मुलगी सुशी यांच्यातील प्रेमळ नाते व सुशी मोर्च्यात हरवल्यामुळे कथेच्या शेवटी त्यांची झालेली ताटातूट, त्यामुळे शिवरामची झालेली सैरभैर अवस्था यावर आधारलेली आहे.

          शिवरामची बायको त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष नांदते. त्या दरम्यान त्यांना एक मुलगी होते. ती म्हणजे सुशी. सुशी एक वर्षाची असताना शिवरामची बायको एका ठेकेदारासोबत पळून जाते, त्याच्यापासून तिला पुढे तीन अपत्ये होतात, असे Read More

‘घोर’- (दाही दिशा) रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कथा)

               ‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्‍याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.

          आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे Read More