वारकऱ्यांनो, सुषमा अंधारे यांचे काय चुकले?

          सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांच्या संबंधीच्या विधानावरून संतप्त होणाऱ्या वारकरी बंधू-भगिनींनो,


         थोडे वास्तव समजून घ्या. संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांचे कार्य मोठे आहे. परंतु त्यांच्या

 

कार्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील अस्पृश्य, शूद्र, स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये सुधारणा झाली

नाही, हे वास्तव आहे. भारतातील दलित व अस्पृश्य यांना १९४७ साली साने गुरुजी यांनी आमरण उपोषण केल्यामुळे विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेशाचा व दर्शनाचा हक्क मिळाला. ज्ञानेश्वरांचे निधन इसवी सन १२९५ साली झाले. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या निधनानंतर ६५० वर्षानंतर दलित, अस्पृश्य हे विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करू शकले. त्यांना शिक्षणाचा अधिकार हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिळाला. तेव्हा भारतातील दलितांच्या, अस्पृश्यांच्या वेदना समजून घ्या. त्या वेदनेतून सुषमा अंधारे यांनी त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. आज जर ज्ञानेश्वर व एकनाथ राहिले असते तर त्यांनी प्रेमाने सुषमा अंधारे यांना पोटाशी घेतले असते, त्यांच्या वेदना, दुःख समजून घेतले असते व आम्ही तुम्हाला माणूस म्हणून हक्क मिळवून देण्यात कमी पडलो, असे म्हटले असते. तेव्हा जरा संवेदनशील व्हा व त्या संवेदनशीलतेने त्यांच्या विधानाचा विचार करा. राजकारणाच्या दृष्टीने त्यांच्या विधानाकडे बघू नका.
             वारकरी हे अवघ्या मानवजातीचे दुःख समजून घेणारे असतात, असे मला वाटते. तेव्हा भडकू नका. शांत व्हा. सारासार विचार करा व निर्णय घ्या आणि मग व्यक्त व्हा.

आपलाच,
कधीही वारी न केलेला पण विचारांनी वारकरी असलेला एक वारकरी.

 

Copyright – डॉ. राहुल पाटील

2 thoughts to “वारकऱ्यांनो, सुषमा अंधारे यांचे काय चुकले?”

  1. ज्या पद्धतीने आपण सांगत आहात त्यानुसार मला वाटते आपला अभ्यास कमी असावा.
    १. संत रोहिदास कोण होते?
    २. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांना देखील समाजाने वाळीत टाकले ना? कारण काय होते माहीत करून घ्या.
    संतांनी तरी कधीच अस्पृश्यतेचा दुषप्रचार केला नाही हे मी खात्री ने सांगू शकतो.
    भूत आणि देव आम्हा एकसमान. मानणारे संत कसे जात पात आणि भेद भाव करू शकतात?
    त्यावेळी केवळ एकच प्रथा होती की ठराविक व्यक्तींनाच परमेश्वराचे किंवा अध्यात्माचे ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यासाठीच संतांनी साधारण समाजाला ते ज्ञान भेटावे या तळमळीने प्रयत्न केले.
    संत ज्ञानेश्वरांनी सध्या आणि स्पष्ट भाषेमध्ये भावार्थ दीपिका लिहिलं कारण संस्कृत भाषेवर एका विशिष्ट समाजाचे प्रभुत्व होते आणि त्या भाषेचा वापर आमच्या शिवाय कोणी करू शकत नाही अशी त्यांची अपेक्षा होती. अर्थात त्यावेळच्या समाजाची.
    संतांनी कधीच ब्राम्हण द्वेष, मराठा द्वेष, अथवा अस्पृश्यता द्वेष केलेले पाहिले का?
    सुषमा अंधारे नी संत ज्ञानेश्वर बद्दल वक्तव्य केले ज्यांनी सदैव साधारण समाजासाठी लढा दिला.
    केवळ पसायदान जरी अभ्यास केले तरी आपल्याला त्यांचे विचार कळून येतील.
    एकवेळ आपण समजू या सुषमा अंधारे नी चूक नाही केली मग ज्ञानेश्वरांनी चूक केली असेच म्हणायचे का? उत्तर अपेक्षित

    1. https://youtu.be/nLrnrlUsPIU?si=LaAW7bb85uvlhrOE

      अतिशय अभ्यासपूर्ण असे हे व्याख्यान असून याच्यातून तुम्हाला वारकरी संप्रदाय, संत साहित्य याबद्दल खूप सारी माहिती मिळेल. तसेच महाराष्ट्र संस्कृतीची, वारकरी संप्रदायाच्या मूल्यांची, विचारांची ओळख देखील होईल. दोन-तीन टप्प्यांमध्ये ऐका. पण नक्की ऐका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *