‘डोह’ कथेचा परिचय

डोह

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.

‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.

Read More

‘झूल’ या कथेचा परिचय

झूल

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘झूल’ ही कथा भाऊराव मास्तरसारखी काही स्वार्थी व बेरकी लोकं ग्रामीण भागातील अडाणी, धार्मिक, देवभोळ्या लोकांच्या मानसिकतेचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेतात, यावर आधारलेली आहे.

या कथेत गौतमबुवा म्हणून एक व्यक्तिरेखा आहे. गौतमबुवाला लग्नाच्या आधीपासून देवधर्माचे वेड होते. तो फक्त जेवायला घरी यायचा. दिवस उगवला की गावाच्या बाजूला असलेल्या नागझिरीच्या टेकडीवर जाऊन मारुतीच्या देवळासमोर जाऊन दिवसभर बसून राहायचा. लग्नाआधी तो आठ-आठ दिवस घरी यायचा नाही. शेवटी त्याला संसारात/ ऐहिक जीवनात रमविण्यासाठी त्याचे आई-वडील त्याचे लग्न लावून देतात. पण तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. लग्नाला तीन वर्षे होतात तरीही तो बायकोला कोणतेही सुख देत नाही. दिवसभर मंदिरासमोर बसून राहतो. रात्री घरी आल्यावर जेवून शांतपणे झोपून जातो. ती कधी त्याच्या जवळ आली व त्याला झोपेतून जागे केले तर थंडपणे स्वतः ला तिच्यापासून सोडवून घेतो. पुढे तो दाढी-मिशा वाढवतो. भगवे कपडे घालू लागतो. पायात वाहना न वापरता अनवाणी पायांनी हिंडू लागतो. लोक त्याला गौतमबुवा म्हणू लागतात. तो देखील निस्वार्थीपणाने लोकांचे पडेल ते काम करू लागतो. दरवर्षी पायी पंढरपूरला जात राहतो. त्याला संसारात रस नसतोच. कुठल्याही बंधनात त्याला अडकायचे नसते.

Read More

‘एक हिरवे पान’ या कथेचा परिचय

एक हिरवे पान

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘एक हिरवे पान’ ही कथा प्रत्येक माणसाला जगताना कुणाच्यातरी आधाराची गरज असते, या विषयावर आधारलेली आहे. या कथेमध्ये दुल्लू मियाँ, बिसमिल्ला, वैदा या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या तिघांचेही वैवाहिक जीवन या ना त्या कारणाने उद्ध्वस्त झालेले असल्याने ते कुणाचा ना कुणाचा आधार शोधत राहतात.

दुल्लू हा साधारणतः पन्नाशीच्या पुढचा व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्याला वैदा नावाची एक मुलगी आहे. ती लग्नाच्या वयाची आहे. त्याची आई लालबी ही खूप म्हातारी असते. मुलीचे लग्न व आईचे निधन झाल्यावर आपल्यासोबत कोण राहणार?, आपल्याला कुणाचा आधार उरणार? याची चिंता त्याला सतावत राहते. आपल्याला म्हातारपणात कुणाची तरी साथ राहावी, म्हणून तो बिसमिल्ला नावाच्या मुलीशी लग्न करून घेतो. ती त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असते. तिला आई-वडील नव्हते. तिचे लग्न झालेले असते. पण नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिचे सासू-सासरे तिला घरातून बाहेर काढतात. तेव्हा दुल्लू तिच्याशी पाट लावून घेतो व तिला आश्रय देतो. त्यांच्या लग्नाला सहा महिने होत नाहीत, तेवढ्यात ती एका मुलीला जन्म देते. दुल्लूला हे माहित असते की, ती मुलगी आपल्यापासून झालेली नाहीये. तरीही तो बिसमिल्लाला एक शब्दही बोलत नाही. उलट बाळंतपणात तिची खूप काळजी घेतो. तिचे सर्व आवरतो. तिच्यासाठी मेव्याचे लाडू बांधतो व दररोज स्वतः तिला एक-एक लाडू खाऊ घालतो. दोन महिने तिला पाण्यात हातही घालू देत नाही.

Read More

‘चुंभळ’ कथेचा परिचय

चुंभळ

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘चुंभळ’ ही कथा भिकी नावाच्या एका मांग जातीच्या विधवा स्त्रीची आपल्या मुलांची काळजी व त्यांच्याकडूनची अपेक्षा व शेवटी तिचा होणारा अपेक्षाभंग यावर आधारलेली आहे.

भिकी ही मांगवाड्यात राहणारी एक विधवा स्त्री आहे. तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव वच्छी व मुलाचे नाव कोसा असे आहे. वच्छी ही लग्नाच्या वयाची असून कोसा हा साधारणतः १५-१६ वर्षांचा असावा. तिच्या नवर्‍याचे नाव बिसन असे होते. तो लग्नसराईत वाजंत्री वाजवायला जायचा. त्याला सैनी हे वाद्य खूप सुंदर वाजता यायचे, हे भिकीच्या बिसनविषयीच्या आठवणींमधून आपल्या लक्षात येते. याव्यतिरिक्त तो म्हशी भादरायचे काम करायचा. हेच काम करताना पाटलाच्या म्हशीने पोटात शिंग खूपसल्यामुळे त्याचा मृत्यू घडून आलेला होता. एकदा तो पाटलाच्या म्हशी भादरायला गेलेला होता. म्हशी भादरत असताना एका म्हशीच्या मानेजवळ वस्तरा लागून ती जखमी होते. जखमेतून रक्त येऊ लागते. त्यामुळे म्हैस बिथरते व दावं तोडून शिंग उगारून बिसनवर धावून जाते. म्हशीला बिथरलेलं बघून पाटलाची माणसं पळून जातात. बिसनही पळून जाण्याच्या बेतात असतो. पण तो भिंतीवर आढळतो. म्हैस त्याला शिंगावर उचलून पुन्हा एकदा भिंतीवर फेकते. म्हशीचे एक शिंग त्याच्या पोटात घुसते आणि तिने त्याच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या छातीच्या बरगड्या मोडतात. त्याच्या पोटातला कोथळा बाहेर निघतो. त्यातच तो मरण पावतो.

Read More

एकाग्रता कशी वाढवावी?

              मित्रांनो, एकाग्रता म्हणजे काय? ती कशी वाढवावी? याबद्दल मला अनेक जण विचारतात. त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो, एकाच विषयावर, वस्तूवर किंवा कामावर आपले मन, चित्त, लक्ष किंवा अंतःकरण केंद्रित करण्याची किंवा स्थिर करण्याची जी क्षमता/ शक्ती असते, तिला एकाग्रता असे म्हणतात.

             ही जी क्षमता असते ती काहींची अतिशय कमी असते, तर काहींची जास्त. काही जण तासनतास एकाच विषयावर, कामावर मन एकाग्र करू शकतात. तर बरेच जण काही मिनिटही करू शकत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाचे चित्रपट, क्रिकेट यावर लक्ष केंद्रित होते, पण अभ्यासावर होत नाही.  

            तुम्हाला जर एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर त्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होते. वाचलेले, ऐकलेले समजत नाही. समजले तर लक्षात राहत नाही किंवा नंतर आठवत नाही. अभ्यासात, प्रगतीत अडथळे निर्माण होतात. योजलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.

               तेव्हा ही एकाग्रता कशी वाढवायची? याचे काही उपाय किंवा मी केलेले काही प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. 

Read More

आदिवासी समाज, संस्कृती, तत्त्वज्ञान : परिचय (मुलाखत)

खाली लिंक दिलेल्या व्हिडिओत ज्यांची मुलाखत घेतलेली आहे ते मा. श्री.रवी बुधर हे कवी व साहित्याचे अभ्यासक असून जव्हार तालुक्यात (जि. पालघर) गेल्या २३ वर्षांपासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ‘विचारलढा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध असून ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व मराठी साहित्य संमेलनात

Read More

अभ्यास किती वेळ करावा?

मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास, १५ मिनिटे, एक मिनिट असं मुलांना विचारत जातो. माझ्या अनेकदा असे लक्षात आलेले आहे की, अनेक मुलं दिवसात एक मिनिटही अभ्यास करत नाहीत. अशी मुलं PSI/ STI यासारख्या परीक्षांमध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. PSI/ STI कशाला परंतु साधे पोलीस, तलाठीही होऊ शकत नाहीत. कारण आज प्रत्येक परीक्षांमध्ये स्पर्धां एवढी वाढलेली आहे की, आपल्याला दररोज न चुकता किमान ५-६ तास अभ्यास Read More