‘प्रतिपश्चंद्र’ कादंबरीमध्ये चित्रित शिवाजी महाराजांचे चरित्र

‘प्रतिपश्चंद्र’ ही डॉ. प्रकाश सुर्यकांत कोयाडे यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी असून या कादंबरीची पहिली आवृत्ती १ एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झाली. गेल्या तीन वर्षात या कादंबरीच्या दहा आवृत्त्या संपलेल्या असून आता अकरावी आवृत्ती सुरू आहे. ‘प्रतिपश्चंद्र’ या शीर्षकावरूनच ही कादंबरी शिवाजी महाराजांशी संबंधित असल्याचे लक्षात येते. ही एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी असून या कादंबरीत तेरावे, सतरावे व एकविसावे शतक अशा ८०० वर्षातील कालखंडाची सांगड घालून लेखकाने कथानक रचलेले

Read More

देवी (ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)

            ‘देवी’ हा ‘चर्चबेल’मधील चौथा लेख आहे. या लेखात देवी, देवींचे पती नारायणस्वामी, दीर दीनबंधू ह्या तीन व्यक्तिरेखा आहेत. देवींचे पती नारायणस्वामी यांचा गंगा नदीच्या काठावर वाडा असून ते गंगा नदीचे निस्सीम भक्त आहेत. “ते गंगाभक्त होते. गंगेशिवाय त्यांना वेगळे आयुष्यच नव्हते. गंगास्तोत्राचे अहोरात्र पठण आणि गंगोदकाचे (गंगेच्या पाण्याचे) सिंचन याच स्वामींच्या आयुष्याच्या प्रबळ प्रेरणा होत्या”, असे त्यांचे वर्णन लेखकाने केलेले आहे. ते दररोज संध्याकाळी पोथी वाचायचे. त्यांच्या Read More

कंदील (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील एक लेख)

          ‘कंदील’ हा कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललित गद्य संग्रहातील एक लेख आहे. या लेखामध्ये मनी सुखिया व राजम्मा या दोन व्यक्तिरेखा आहेत. मनी सुखिया हे नाव ग्रेस यांना आवडलेले होते. हे नाव ऐकून ‘ज्ञानेश्वरी’च्या पसायदानातील अर्थ त्यांना जाणवला. मनी सुखिया ही दहा-बारा वर्षांची लहान मुलगी होती. ती अतिशय बारीक होती. ‘वठलेल्या

Read More

नूरजहान आणि रिल्के (कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख)

         नूरजहान आणि रिल्के हे ग्रेस यांचे अतिशय आवडते कलावंत होते. नूरजहान ही गायिका व अभिनेत्री होती. तर रिल्के हा कवी होता. या दोघांनी लेखकाला अक्षरशः झपाटून टाकलेले आहे, असे आपल्याला त्यांच्या या लेखातील वर्णनावरून दिसून येते.

        नूरजहान ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील व स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेली गायिका. तिने किमान एक हजार गाणी गायलेली आहेत. तिने ‘मिर्झासाहिबा’ व इतर चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केलेला आहे. लेखकाने तिला पहिल्यांदा Read More

पल्लवीचे पक्षी – कवी ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

          ग्रेस हे कोणत्याही लेखात एखादी व्यक्ती, प्रसंग, घटना याबद्दल सविस्तर, सलग असे काहीच सांगत नाहीत. त्या व्यक्ती, घटना, प्रसंग याबद्दल थोडे सांगून त्याचा संबंध, धागा निसर्ग, ख्रिस्त, समुद्र अशा विविध गोष्टींशी जोडून कधीकधी असंबद्ध वाटावे, असे व्यक्त होतात. एखादे गूढ असे काहीतरी अनुभव मांडतात. त्या व्यक्ती, घटनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला त्यांच्या लेखनामधून मिळत नाही. काळाचे अंतर पटकन कापून ते त्या-त्या व्यक्तीच्या खूप आधीच्या आठवणी, मधल्या काळातील काही Read More

‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

        ‘तांदूळ मोजणाऱ्या मुली’ या लेखात पी. जी. चंद्रम नावाच्या एका उच्चशिक्षित, उच्च पदावरील नोकरदार व्यक्तीच्या विक्षिप्तपणामुळे त्याच्या दोन मुली व पत्नीचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झालेले आहे, याचे चित्रण ग्रेस यांनी केलेले आहे. पी. जी. चंद्रम हा एका सरकारी कार्यालयात मोठा ऑफिसर असतो. मद्रासहून बदली होऊन तो लेखकाच्या शहरात नोकरीच्या निमित्ताने आलेला असतो व लेखकाच्या चाळीत भाड्याने राहत असतो. त्याला सात-आठ वर्षांच्या दोन जुळ्या मुली असतात. सुभद्रा व

Read More

‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ – ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’मधील लेख

         ‘नेपालीचे गॉडप्रॉमिस’ हा ग्रेस यांच्या ‘चर्चबेल’ या ललितगद्य संग्रहातील पहिला लेख आहे. नेपाली नावाच्या एका सात वर्षांच्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूवर आधारलेला हा ललित लेख आहे. ही तिची शोकांत कथा आहे. नेपाली ही एक अनाथ मुलगी होती. ती फादर ग्रीन यांना दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या एका छोट्याशा गावात ती दोन वर्षांची

Read More

नवीन वर्ष, ईश्वर, विज्ञान व असेच काहीतरी…

मित्रांनो,

अव्याहतपणे वाहत असलेल्या अमर्याद काळातून/ निसर्गाने निर्माण केलेल्या दिवस-रात्रींतून माणसाने स्वतःच्या सोयीसाठी सेकंद, मिनिटे, तास, दिनांक,

Read More

बहुजनांच्या सण-उत्सवांचे बदलते स्वरूप-

या ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल

Read More

‘घोर’- (दाही दिशा) रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कथा)

               ‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्‍याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.

          आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे Read More

समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना 

समकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना 

    समकालीन हा कालवाचक शब्द आहे. ‘सम’ म्हणजे समान, समांतर, सोबत. जे साहित्य आपल्या काळाबरोबर, काळासोबत असते, त्या काळाच्या समांतर असते. ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळातील समाजाचे

Read More

मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य

मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य

    मराठीमध्ये स्त्रियांनी तसे विपुल प्रमाणात साहित्यलेखन केलेले असले तरी ते सर्व स्त्रीवादी साहित्यात मोडत नाही. त्यापैकी बरेचसे साहित्य हे पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांवर देखील प्रभाव असल्यामुळे किंवा त्यांची एकूणच जडणघडण पुरुषप्रधान संस्कृतीतच झालेली असल्यामुळे पती किंवा प्रियकराविषयी प्रेम, पुरुषशरणता, स्वत:कडे

Read More

स्त्रीवाद, स्त्रीवादी साहित्य : संकल्पना

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क

Read More

‘बारोमास’ कादंबरीतील व्यक्तिरेखा

मराठी साहित्यात वास्तववादी अशा ग्रामीण कादंबर्‍यांची अतिशय दीर्घ अशी परंपरा आहे. ‘बारोमास’ ही या परंपरेतील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते.

        ‘बारोमास’ ही सदानंद देशमुख यांची ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. या कादंबरीला २००४ साली भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे.

 

‘बारोमास’ कादंबरीतील व्यक्तिरेखा

        ‘बारोमास’ या कादंबरीत एकनाथ, अलका, शेवंता माय, मधू या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. या व्यतिरिक्त नरूभाऊ, तेजराव खपके, समाधान चांदणे, एकनाथचे वडील सुभानराव इ. पात्र आहेत. या कादंबरीतील महत्त्वाच्या पात्रांविषयी माहिती पुढीलप्रमाणे-

 

एकनाथ-

        एकनाथ ही या कादंबरीतील महत्वाची व्यक्तिरेखा आहे. त्याचे शिक्षण एम. ए., बी.एड. इतके झालेले असून त्याने अगदी गरिबीच्या परिस्थितीत ते पूर्ण केलेले आहे. विद्यार्थीदशेत त्याच्या कविता व लेख नियतकालिकांमध्ये छापून यायचे. शिकून Read More

स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

           स्त्रियांचे शोषण करणार्‍या, त्यांना दुय्यम लेखणार्‍या, त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य प्रथा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. मात्र एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये काही प्रमाणात जागृती निर्माण होऊ लागली. पाश्चात्य शिक्षण, प्रबोधन यामुळे भारतातील

Read More

स्त्रियांच्या शोषणाची पार्श्वभूमी

    जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क 

Read More

हाल्या हाल्या दुधू दे (कादंबरी)- बाबाराव मुसळे – परिचय

          ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही बाबाराव मुसळे यांची पहिली कादंबरी. डाॅ. आनंद यादव आणि द. दि. पुंडे यांनी या कादंबरीची ‘तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी’ म्हणून निवड करून तिची योग्यता मान्य केलेली आहे. ऑगस्ट १९८५ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली.

         ग्रामीण भागातील न्यानबा या निम्नस्तरिय शेतकऱ्याची शोकांतिका या कादंबरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आनसा (पत्नी), सोबा (मुलगी), पर्कास (मुलगा), संबा (पुतण्या), वछिला (चूलत सून), शंकर पाटील,

Read More

आत्ता (कविता)- नामदेव ढसाळ

नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव आहे. त्यांनी मराठी कवितेमध्ये मोलाची भर घातलेली आहे. अस्पृश्यांचे दारिद्र्य, दैन्य, शोषण, त्यांच्यातील जाणीव-जागृती, विद्रोह, नवसमाजाच्या निर्मितीसाठीचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या सर्वच कवितांमधून मांडलेले दिसून येते. 
नामदेव ढसाळ यांची ‘आत्ता’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी लावलेल्या ‘काव्यबंध’ या कसितासंग्रहात समाविष्ट आहे. ती अशी-

Read More

कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर

कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर

(‘गिरणांगण’ या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिकांकात वर्ष २००९-२०१० मध्ये प्रकाशित झालेला लेख)

मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे दि. १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राने हे अटळ दुःख ‘माझ्या मन बन दगड…’ असे म्हणून सहन केले. त्यांच्या निधनाने मराठी काव्य क्षेत्रातील / साहित्यक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला.

 

विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांतही लेखन करून मोलाची भर घातली. आपल्या ‘बहुपेडी’ व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्यप्रकारांवर अमीट ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविण्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा – मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे ‘आजोबा’ बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ‘संन्यासी कवी’, ‘ध्रुवताऱ्यासारखा अढळ प्रकाश देणारा’, ‘मराठी Read More

‘डोह’ कथेचा परिचय

डोह

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.

‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.

Read More

‘झूल’ या कथेचा परिचय

झूल

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘झूल’ ही कथा भाऊराव मास्तरसारखी काही स्वार्थी व बेरकी लोकं ग्रामीण भागातील अडाणी, धार्मिक, देवभोळ्या लोकांच्या मानसिकतेचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेतात, यावर आधारलेली आहे.

या कथेत गौतमबुवा म्हणून एक व्यक्तिरेखा आहे. गौतमबुवाला लग्नाच्या आधीपासून देवधर्माचे वेड होते. तो फक्त जेवायला घरी यायचा. दिवस उगवला की गावाच्या बाजूला असलेल्या नागझिरीच्या टेकडीवर जाऊन मारुतीच्या देवळासमोर जाऊन दिवसभर बसून राहायचा. लग्नाआधी तो आठ-आठ दिवस घरी यायचा नाही. शेवटी त्याला संसारात/ ऐहिक जीवनात रमविण्यासाठी त्याचे आई-वडील त्याचे लग्न लावून देतात. पण तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. लग्नाला तीन वर्षे होतात तरीही तो बायकोला कोणतेही सुख देत नाही. दिवसभर मंदिरासमोर बसून राहतो. रात्री घरी आल्यावर जेवून शांतपणे झोपून जातो. ती कधी त्याच्या जवळ आली व त्याला झोपेतून जागे केले तर थंडपणे स्वतः ला तिच्यापासून सोडवून घेतो. पुढे तो दाढी-मिशा वाढवतो. भगवे कपडे घालू लागतो. पायात वाहना न वापरता अनवाणी पायांनी हिंडू लागतो. लोक त्याला गौतमबुवा म्हणू लागतात. तो देखील निस्वार्थीपणाने लोकांचे पडेल ते काम करू लागतो. दरवर्षी पायी पंढरपूरला जात राहतो. त्याला संसारात रस नसतोच. कुठल्याही बंधनात त्याला अडकायचे नसते.

Read More

‘एक हिरवे पान’ या कथेचा परिचय

एक हिरवे पान

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘एक हिरवे पान’ ही कथा प्रत्येक माणसाला जगताना कुणाच्यातरी आधाराची गरज असते, या विषयावर आधारलेली आहे. या कथेमध्ये दुल्लू मियाँ, बिसमिल्ला, वैदा या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या तिघांचेही वैवाहिक जीवन या ना त्या कारणाने उद्ध्वस्त झालेले असल्याने ते कुणाचा ना कुणाचा आधार शोधत राहतात.

दुल्लू हा साधारणतः पन्नाशीच्या पुढचा व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्याला वैदा नावाची एक मुलगी आहे. ती लग्नाच्या वयाची आहे. त्याची आई लालबी ही खूप म्हातारी असते. मुलीचे लग्न व आईचे निधन झाल्यावर आपल्यासोबत कोण राहणार?, आपल्याला कुणाचा आधार उरणार? याची चिंता त्याला सतावत राहते. आपल्याला म्हातारपणात कुणाची तरी साथ राहावी, म्हणून तो बिसमिल्ला नावाच्या मुलीशी लग्न करून घेतो. ती त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असते. तिला आई-वडील नव्हते. तिचे लग्न झालेले असते. पण नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिचे सासू-सासरे तिला घरातून बाहेर काढतात. तेव्हा दुल्लू तिच्याशी पाट लावून घेतो व तिला आश्रय देतो. त्यांच्या लग्नाला सहा महिने होत नाहीत, तेवढ्यात ती एका मुलीला जन्म देते. दुल्लूला हे माहित असते की, ती मुलगी आपल्यापासून झालेली नाहीये. तरीही तो बिसमिल्लाला एक शब्दही बोलत नाही. उलट बाळंतपणात तिची खूप काळजी घेतो. तिचे सर्व आवरतो. तिच्यासाठी मेव्याचे लाडू बांधतो व दररोज स्वतः तिला एक-एक लाडू खाऊ घालतो. दोन महिने तिला पाण्यात हातही घालू देत नाही.

Read More

‘चुंभळ’ कथेचा परिचय

चुंभळ

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘चुंभळ’ ही कथा भिकी नावाच्या एका मांग जातीच्या विधवा स्त्रीची आपल्या मुलांची काळजी व त्यांच्याकडूनची अपेक्षा व शेवटी तिचा होणारा अपेक्षाभंग यावर आधारलेली आहे.

भिकी ही मांगवाड्यात राहणारी एक विधवा स्त्री आहे. तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव वच्छी व मुलाचे नाव कोसा असे आहे. वच्छी ही लग्नाच्या वयाची असून कोसा हा साधारणतः १५-१६ वर्षांचा असावा. तिच्या नवर्‍याचे नाव बिसन असे होते. तो लग्नसराईत वाजंत्री वाजवायला जायचा. त्याला सैनी हे वाद्य खूप सुंदर वाजता यायचे, हे भिकीच्या बिसनविषयीच्या आठवणींमधून आपल्या लक्षात येते. याव्यतिरिक्त तो म्हशी भादरायचे काम करायचा. हेच काम करताना पाटलाच्या म्हशीने पोटात शिंग खूपसल्यामुळे त्याचा मृत्यू घडून आलेला होता. एकदा तो पाटलाच्या म्हशी भादरायला गेलेला होता. म्हशी भादरत असताना एका म्हशीच्या मानेजवळ वस्तरा लागून ती जखमी होते. जखमेतून रक्त येऊ लागते. त्यामुळे म्हैस बिथरते व दावं तोडून शिंग उगारून बिसनवर धावून जाते. म्हशीला बिथरलेलं बघून पाटलाची माणसं पळून जातात. बिसनही पळून जाण्याच्या बेतात असतो. पण तो भिंतीवर आढळतो. म्हैस त्याला शिंगावर उचलून पुन्हा एकदा भिंतीवर फेकते. म्हशीचे एक शिंग त्याच्या पोटात घुसते आणि तिने त्याच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या छातीच्या बरगड्या मोडतात. त्याच्या पोटातला कोथळा बाहेर निघतो. त्यातच तो मरण पावतो.

Read More

शिक्षणाची उद्दिष्टे व महत्त्व

                 मित्रांनो, आज शिक्षणाबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली आहे. प्रत्येक पालकाला असे वाटते की, आपल्या मुलाने खूप शिकावे. त्यासाठी तो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्चही करत असतो. आज खेडोपाडी सरकारी व खाजगी शाळा पोहचलेल्या आहेत. केंद्र  व राज्य सरकारेही शिक्षणावर बर्‍यापैकी खर्च करत असतात. असा शिक्षणाचा सगळीकडे उदो-उदो  सुरू असताना शिक्षणाची उद्दिष्ट्ये व मानवी जीवनातील शिक्षणाचे नेमके महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा माझा आतापर्यंतचा अनुभव, शिक्षणाचा मला झालेला लाभ, माझा थोडाफार अभ्यास व चिंतन, इतरांशी झालेल्या चर्चा या आधारे माझे पुढील विचार मी अतिशय नम्रतेने मांडत आहे.

शिक्षणाची उद्दिष्ट्ये Read More

जागतिक आदिवासी दिन : पार्श्वभूमी, महत्त्व व थोडं चिंतन…

नमस्कार मित्रांनो,

             सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या आभाळभर मन:पूर्वक शुभेच्छा!

          आजचा हा दिवस संपूर्ण जगात खूपच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात नोकरी करतो. या ठिकाणी ९ ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये जव्हार शहरात जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी आदिवासी बांधव धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांच्या पूजा-अर्चा करतात.

          असे असले तरी, Read More

इंडियातल्या भारतीयाचे विचार

इंडियातल्या भारतीयाचे विचार

       (सदर लेख १२-१३ वर्षांपूर्वी मी विद्यार्थीदशेत असताना लिहिलेला असून जसाच्या तसा टाईप करून टाकला आहे. लेख वाचताना स्वतः ला अपवाद समजून वाचावे व तसे वाटत नसल्यास आत्मपरीक्षण करावे. पण वाईट वाटून घेऊ नये.)

                 भारत सध्या तरुणांचा देश मानला जात आहे. या देशात सर्वात जास्त तरुण आहेत. पण या तरुणांच्या हाताला काम कुठे आहे? यावर तथाकथित यशस्वी, उच्चवर्गीय, श्रीमंत वर्ग असं म्हणतो की, ज्याने -त्याने मेहनत करून स्वतःचे काम स्वतः मिळवायला पाहिजे, असं म्हणणाऱ्यांना जोड्याने हाणावसं  वाटतं. कारण हे स्वतःच्या श्रीमंतीत, प्रतिष्ठेत मग्रूर आहेत. यांना फक्त मुकेश, अनिल अंबानी बंधू, सचिन तेंडुलकर, काही फिल्मस्टार यांच्या संपत्तीचे हिशेब (तेही कायदेशीर. त्यांची बेकायदेशीर संपत्ती स्वतः त्या व्यक्तींनाही माहिती नसेल) माहिती आहेत. पण या देशात किती टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे? किती टक्के लोक निरक्षर अज्ञानी आहेत?, दर दिवसात किती शेतकरी आत्महत्या करत आहेत?, किती बालके कुपोषणामुळे मरत आहेत?, या देशातल्या प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळांचा दर्जा कसा आहे? दारिद्र्यामुळे हाताला काम न मिळाल्यामुळे किती लोकांची कुचंबणा होत आहे? या प्रश्नांची उत्तरे या  महाभागांकडे आहेत का? मुंबईत बेस्टने किंवा लोकल ट्रेनने जाताना झोपडपट्ट्या, Read More

भाषेचा शोध (ज्ञानक्षेत्रातील क्रांती)

मानवजातीची आज जी प्रगती घडून आलेली आहे. ती काही अचानक व एका रात्रीत घडून आलेली नाही. गेल्या लाखो वर्षात हळूहळू एक एक टप्पा गाठत, पायर्‍या चढत माणूस आज इथवर येऊन पोहचलेला आहे. त्याच्या या विकासामध्ये अनेक शोध कारणीभूत ठरलेले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या शोधांची ओळख आपणास करून देणार आहे. आजचे हे मानवी जग कसे घडलेले आहे, तयार झालेले आहे, हे आपणास कळावे. हा उद्देश या लेखनामागे आहे.

आजच्या या लेखात मी आपणाला मानवाच्या विकासामध्ये अतिशय क्रांतिकारक ठरलेल्या भाषेच्या शोधाविषयी सांगणार आहे.

भाषेचा शोध:

भाषेच्या शोधाने मानवजातीला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले. या शोधात मानवाला कोणत्याही शरीरबाह्य भौतिक गोष्टींची मदत घ्यावी लागली नाही. मानवप्राण्याच्या बुद्धीत हळूहळू होत गेलेले विकास, त्याचवेळेत त्याच्या नाक, कान, घसा, कंठ, जीभ, दातांची रचना इ. (वागिंद्रियांमध्ये) अवयवांमध्ये झालेले बदल व हळूहळू होत गेलेल्या उत्क्रांतीमुळे भाषेची निर्मिती व्हायला मदत झाली.

निसर्गातील प्राणी, पक्षी, इतर सजीव, निर्जीव घटक यांच्या आवाज व ध्वनीच्या निरीक्षणातून व नंतर अनुकरणातून मनुष्य

Read More