घरभाडे करारपत्राचा नमुना

(मी माझ्या लग्नानंतर आतापर्यंत जव्हार, जळगाव व नाशिकला मिळून ९ भाड्याच्या घरांमध्ये राहिलो. त्यापैकी जव्हार व नाशिकला मी हा नमुना वापरला. जो मला माझ्या एका ज्येष्ठ सहकार्‍यांकडून मिळालेला होता. सरकारी करारनाम्यांमध्ये प्रमाण लेखनाच्या किती चुका असतात, हे आपणास ठाऊक आहे. यात मी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. हा नमुना सर्वांसाठी इथे देत आहे.)

 

लिव्ह अँड लायसेन्स करारनामा

(अकरा महिन्याच्या तत्वावर)

लिव्ह ऍन्ड लायसेन्स करारनामा आज दि………………… रोजी, ………………… या दिवशी नाशिक मुक्कामी लिहून देतो की,

श्री. घर मालकाचे नाव,

वय वर्षे ………….., धंदा-………….,                                                                          लिहून घेणार

भाड्याने द्यायच्या घराचा पत्ता                                                                             (लायसेन्सॉर)

…………………………………………….

……………………………………………

यांसी

श्री. भाडेकरुचे नाव,

उ. व. 34, धंदा – नोकरी,                                                                            लिहून देणार

भाडेकरुचा पत्ता                                                                                        (लायसेन्सी)

……………………………………………..

…………………………………………….

 

कारणे लिव्ह अँड लायसेन्स करारनामा लिहून देतो ऐसा जे की:

1) मिळकतीचे वर्णन :

……………………………………………………………………………………………….... सदर मिळकतीमधील लाईट व नळ कनेक्शनसह.

 

2) वर कलम 1 मध्ये वर्णन केलेली मिळकत ही तुमच्या नावे व मालकीची असून ती तुम्ही मला 11 महिन्यांसाठी राहण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स करारनाम्याने द्यावी, अशी मी तुम्हास विनंती केल्याने व माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही मला सदर मिळकत खालील अटी व शर्तीवर देत आहात.

 

अटी व शर्ती:

Read More

‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानासाठी मी काढलेल्या नोट्स

          ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.

            इतिहास- पार्श्वभूमी-

            आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.

          भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More

मी काँग्रेसी, अर्बन नक्षली नाहीये, मग मी कोण आहे?

               मी काँग्रेसी नाहीये. मात्र माझा CAA या कायद्यातील संविधानविरोधी गोष्टींना विरोध आहे. मी अंतर्बाह्य भारतीय बनण्याचा पूर्णत: प्रयत्न करीत आहे (जात, धर्मनिरपेक्ष, भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा इ. देशहिताविरूद्ध गोष्टींपासून मुक्त होण्याचा). यांच्या अर्बन नक्षली या व्याख्येत मी बसतो का मग? नोटाबंदीच्या वेळेसही विरोध करणाऱ्यांना असंच देशद्रोही Read More

Few words for students

खूप-खूप अभ्यास कर,
मोठा हो. आत्मविश्वासाने
स्वाभिमानी जीवनाची
पायाभरणी कर.

कठोर ज्ञानसाधना कर,
ज्ञानवंत, बुद्धिवंत हो!

संकटांतून तावून-सुलाखून निघशील Read More