आजचे युग कशाचे आहे?

आजचे युग हे तलवारींना धार लावून ‘धारकरी’ बनण्याचे नसून विविध आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करून मेंदूला धार लावून बुद्धी कमावून रक्ताचा एक थेंब न सांडता जगावर राज्य करण्याचे आहे. आज अमेरिकेतल्या २-३ कंपन्या मिळून अख्ख्या भारताचे शेअरमार्केट विकत घेऊ शकतात. हे सामर्थ्य त्यांनी

तलवारींना धार लावून कमावलेले नाही तर आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन यांच्या जोरावर कमावलेले आहे.

एक ते दीड लाख इंग्रजांनी भारतावर (आजचा भारत, पाकिस्तान व बांगलादेश एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर, त्यातील तेव्हाच्या ४० कोटी लोकांवर) दीडशे वर्ष राज्य केले. ते फक्त तलवारीच्या जोरावर किंवा आधुनिक शस्त्रांच्या जोरावर नव्हे तर आधुनिक ज्ञान, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, धर्मव्यवस्था इ. व्यवस्थांच्या जोरावर.

मनोहर भिडे सुशिक्षित लोकांना ‘गांडू’ म्हणतो. कारण या मनुवाद्यांना नेहमीच असे वाटत आलेले आहे की, स्त्रियांनी व बहुजनांनी शिक्षण घेऊ नये. हा समाजसुधारकांना ‘भडवे’ म्हणतो. कारण या मनुवाद्यांना नेहमीच असे वाटत आलेले आहे की, समाजामध्ये परिवर्तन घडवून येऊ नये व सत्ता नेहमी आपल्याच वर्गाच्या हातात राहावी. सर्व समाजावर फक्त आपणच राज्य करावे. त्यासाठी कोणीही शिकू नये.

*ज्या काळात स्त्रिया व शूद्र यांनी तलवारी हातात घ्यायला हव्या होत्या व देशाचे संरक्षण करायला हवे होते. त्या काळात यांनी बहुजनांना शस्त्रबंदी  केली. आज ज्ञान मिळवून जगावर राज्य करण्याचे युग आहे. तर आता शस्त्र घ्यायला सांगत आहेत. अशा पद्धतीने ज्या काळात जे करायला हवे ते हे करू देत नाहीत व जे नको करायला हवे ते आवर्जून करायला सांगतात.*

स्त्रिया व बहुजनांची समस्या ही आहे की, त्यांना यांचे डावपेच लक्षात येत नाहीत. म्हणून ते प्रत्येक युगात यांचे गुलाम म्हणून जीवन जगत राहतात.

आता मात्र संविधान, समाजसुधारक यांच्यामुळे बहुजन समाज, स्त्रिया यांच्यात शिक्षणाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेले आहे. तरीही हे या कपटी लोकांना का बळी पडतात व आपल्या समाजातील काही समाज, धर्म, संस्कृती, इतिहासाचे अभ्यासक ओरडून ओरडून यांची कारस्थाने लक्षात आणून देतात तरी हे त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात, तेच कळत नाही.

असो. अजूनही वेळ गेलेली नाही. जागे व्हा! डोळे उघडून बघा! थोडे वाचा, मग निर्णय घ्या. या बुद्धिभेद करणाऱ्या मनुवाद्यांना ओळखा. (राजकारणातसुद्धा हे आज मोठ्या संख्येने आहेत.) ही वेळ निघून गेली की पुढील १००-१५० वर्षे पुन्हा एकदा आपल्याला व आपल्या भावी पिढ्यांना संघर्ष करावा लागणार आहे, एवढे मात्र नक्की.

– डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *