आमच्या देशात आधीपासूनच सर्व होते?

आमच्याकडे सर्व प्रकारचे ज्ञान होते. आमची संस्कृती सर्वात श्रेष्ठ होती व आहे. आम्ही सर्वांना समान समजतो. आमच्याकडे अद्वैती तत्त्वज्ञान आहे. असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न-

ही एवढी सर्व जाणीव भारताला होती मग या ज्ञानावर समाजाची रचना का झाली नाही?

भारताचा परकीयांसमोर पुन्हा पुन्हा पराभव का झाला?

सती प्रथा, केशवपन अशा घातक प्रथा का निर्माण झाल्या?

९०टक्के वर्गाला शिक्षणाची, वेदांच्या ज्ञानाची परवानगी का नाकारली गेली? त्यांना अज्ञानात का ठेवले गेले?

ज्या ज्या गोष्टींमुळे या इहलोकात चांगले आयुष्य जगता येते, त्या सर्व संधी त्यांना का नाकारल्या गेल्या?

एकीकडे अद्वैत मानायचे व दुसरीकडे समाज कधीही एकत्र येणार नाही अशी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था निर्माण करायची, असे का केले गेले?

हे तत्त्वज्ञान सर्व जगामध्ये का पसरले नाही?

सिंधूबंदी किंवा समुद्रगमन अशी बंधने का लादली गेली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *