मनुवाद्यांचे ध्येय व त्यांच्या यशाचे रहस्य

मनुवाद्यांचे कायम एक ध्येय राहिले आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राज्यसत्ता, धर्मसत्ता, सांस्कृतिक सत्ता, अर्थव्यवस्थेच्या नाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवणे व बहुजन समाजाला आपल्या स्वार्थासाठी गुलाम बनवणे.

या गोष्टी साध्य करण्यासाठी ते
● विविध धर्मग्रंथ, पोथ्या, विविध ग्रंथांची रचना करतात.
● असंख्य जाती निर्माण करून अखंड समाजाला

विभाजित करतात.
● बाबा-बुवा यांचे पीक आणतात. त्यांना प्रचंड महत्त्व प्राप्त करून देतात.
● बैठका, स्वाध्याय, बालसंस्कार केंद्र, RSS व इतर शेकडो संस्था, संघटनांच्या माध्यमातून लोकांची बुद्धी नासवतात. त्यांना पुराणमतवादी, अंधश्रद्ध बनवितात.
● आधीच कोट्यवधी मंदिरे असताना पुन्हा लोकवर्गणीतून मंदिरे बांधतात व त्या मंदिरांना कायमस्वरूपी स्वतःच्या उत्पन्नाचे तसेच सर्वसामान्य लोकांना अनावश्यक धार्मिक करण्याचे साधन बनवितात.
● सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळू नये, यासाठी प्रचंड झटतात व द्यावेच लागले तर अभ्यासक्रमात स्वतःला अनुकूल बदल घडवून आणतात.
● शिकत असलेले बहुजन रात्रंदिवस अभ्यास करू नयेत म्हणून अनेक धार्मिक सण-उत्सवांचे प्रचंड स्तोम माजवितात.
● महापुरुषांची बदनामी करतात, त्यांना प्रचंड त्रास देतात. एवढे करूनही ते कार्य करत राहिले तर त्यांचा खून घडवून आणतात. (चक्रधर स्वामी, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, कुलबुर्गी, गौरी लंकेश अशा अनेक महापुरुषांचा खून यांनी घडवून आणला आहे. तर म. फुल्यांना मारायला मारेकरी धाडले होते.)
● महापुरुषांचे समाजाच्या भल्यासाठी असलेले विचार दडपून त्यांच्या विचारांचे विकृतीकरण करतात व त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा स्वतःच्या वर्णाच्या फायद्यासाठी करून घेतात.
● परकीय सत्ता स्थापन झाल्यास त्यात महत्त्वाची पदे भूषवितात, त्यांना सर्व प्रकारची मदत करतात. उदा. मुस्लिम व इंग्रज राज्यकर्त्यांच्या काळात सर्व महत्त्वाच्या पदांवर मनुवादी व सनातनीच होते.
● आता लोकशाही, राज्यघटना यामुळे आरक्षण, सर्वांना शिक्षण व नोकरी-व्यवसायाची-सन्मानाने जगण्याची समान संधी, मानवी अधिकार, न्याय मिळवण्याचा अधिकार असल्याने बहुजन समाज प्रगतीच्या प्रवाहात आलेला आहे. हे मनुवाद्यांना यत्किंचितही सहन होण्यासारखे नाही. म्हणून लोकशाही व राज्यघटनाच नष्ट करणे, विविध जाती व धर्म यांच्यात संघर्ष, फाटाफूट निर्माण करणे इ. गोष्टी करत आहेत.
● लोकांचे त्यांच्या या कट कारस्थानांकडे लक्ष जाऊ नये म्हणून परधर्मांना शत्रू, दुष्मन म्हणून समाजासमोर प्रस्थापित करणे.

ही सर्व कारस्थाने प्रचंड घातक आहेत, विषारी आहेत, लोकशाही व माणुसकीविरोधी आहेत. यामुळे समाजात हिंसा, परस्पर अविश्वास, अवैज्ञानिक दृष्टिकोन, गुलामगिरी, हुकूमशाही निर्माण होते.
परंतु बहुजन समाज हे समजून घेऊ शकत नाही.
त्याची काही कारणे-

● बहुजन समाजासमोर एक समाज म्हणून कोणतेही ध्येय नाही.
● बहुजन समाज हा जातींमध्ये विभागलेला आहे.
● शिक्षण कमी, अज्ञान जास्त.
● वैचारिक साहित्याच्या वाचनाबद्दल, महापुरुषांचे खरेखुरे विचार जाणून घेण्याबद्दल प्रचंड अनास्था,
● मनुवादी, पुरोहित यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवतो व त्यांच्या हितासाठी अभ्यासू, प्रामाणिक, तळमळीने बोलणाऱ्या व लिहिणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वादग्रस्त समजतात.
● बहुजन समाजाला स्वतःचे हित-अहित, मित्र-शत्रू कळत नाही.
● समाजातील, धर्मग्रंथातील, धर्मातील, इतिहासातील स्वतःच्या स्थानाचा शोध घेत नाहीत. म्हणून त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात.

© डॉ. राहुल पाटील (नाशिक)
*प्रचंड शेयर करा.*

(प्रस्तुत लेखक बुद्ध, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, सर्व जातींचे संत, राजाराम मोहन रॉय, म.फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर,  लोकहितवादी,  न्या. रानडे, गोपाळ गणेश आगरकर, स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, जेधे-जवळकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, दाभोळकर, पानसरे व तत्सम महापुरुषांचे विचार व कार्य बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आदर्श मानणारा आहे व मनुवादी हे मानवताविरोधी, वर्चस्ववादी असल्याने त्यांचा कट्टर विरोधक आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *