मनोहर भिडेच्या वादग्रस्त बोलण्याचा अन्वयार्थ

बंधू-भगिनींनो,

भिडेसारख्या किड्यांची ही समस्या आहे की, यांचे वैचारिक पूर्वज ना स्वातंत्र्य चळवळीत होते ना सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत. उलट वेळोवेळी यांनी याविरोधात भूमिका घेतली. स्वातंत्र्यामुळे राजकीय सत्ता यांच्या हातून गेली व समाजसुधारकांनी प्रबोधन केल्यामुळे व संविधानाची निर्मिती तसेच अंमलबजावणीमुळे उच्चवर्णीय म्हणून असलेले हजारो वर्षांपासूनचे विशेष अधिकार पण यांच्या हातून गेले.

स्वातंत्र्यानंतर ४०-४५ वर्षे त्या शहाण्या पिढ्यांनी यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. हे लोकांच्या मनातून उतरून गेले होते. पण आता इतिहास

बदलणे तर शक्य नाही. म्हणून हे खोटा इतिहास सांगून समाजसुधारक व स्वातंत्र्याच्या चळवळीतील पुढाऱ्यांना बदनाम करत आहेत व अशा पद्धतीने त्यांच्यावर सूड उगवत आहेत.

त्यात आपले, आपल्या समाजाचे, देशाचे दुर्दैव असे की, पहिल्या दोन पिढ्या मागे पडल्यावर स्वातंत्र्याचा व समाजसुधारणेचा इतिहास हा फक्त पुस्तकांमध्ये राहिला. पहिल्या पिढ्यांनी तो इतिहास स्वतः घडताना पाहिलेला होता किंवा आपले वडील अथवा आजोबा यांच्याकडून ऐकलेला होता.

१९९० नंतर मात्र फक्त नोकरी व व्यवसाय एवढ्यापुरता शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढायला लागले. त्यात यांनी रथयात्रा, बाबरी मशीदपतन, स्वतःच हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले करून परधर्मीय लोकांवर आरोप करणे असे धंदे सुरू केले. त्यामुळे यांना केंद्रात तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता मिळत गेली. मग यांचा आत्मविश्वास वाढला व हे सुनाट कुत्र्यांसारखे तोंडाला येईल ते बरळू लागले व तरुणांची माथी भडकवू लागले. दुर्दैवाने अनेक तरुणांना आपला सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास माहीत नसल्याने व या किड्यांनी त्यांना खोट्या आदर्श धर्मराष्ट्राचे स्वप्न दाखवलेले असल्याने ते या किड्यांच्या वळवळीला बळी पडले व यांचे अनुयायी बनले. सरकार पण यांच्याच विचारांचे असल्याने हे तोंडाने कुठेही, काहीही बरळले तरीही यांच्यावर काहीही कारवाई होत नाही.

याचा फटका या किड्यांना व ते ज्यांच्यासाठी काम करत आहेत त्यांना बसणार नाही. त्यांची मुले उच्चशिक्षण घेऊन विदेशात जात आहेत. देशात अधिकाराची पदे मिळवत आहेत. (शरद पोंक्षेची मुलगी विदेशात शिकून पायलट झाली.) पण याचा फटका SC, ST, OBC, मराठा व स्त्रिया यांना जबरदस्त बसणार आहे. आता कुठे स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे फायदे समाजाच्या उपेक्षित, वंचित घटकांपर्यंत पोहचू लागले होते, शिक्षण, आरक्षण यामुळे बहुजन समाजाची थोडीफार प्रगती व्हायला लागली होती, तिला खीळ बसणार आहे. पण आजच्या पिढीला ते कळत नाहीये. जेव्हा सर्व गमावून बसतील ना तेव्हा यांचे डोळे उघडणार आहेत.

आम्ही थोडेफार वाचतो, म्हणून आम्हाला वस्तुस्थिती कळते व म्हणून आम्ही समाजाला सावध करत आहोत. खरं तर याचे आम्हाला फायदे होण्यापेक्षा तोटेच होत आहेत. पण आपल्या बहुजन समाजाचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही हा धोका पत्करून लिहीत आहोत.

आमचे एवढेच म्हणणे आहे की, लोकशाही, संविधान तसेच आपल्या समाजाच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक प्रगतीच्या आड येणाऱ्या या किडीला ओळखा व ही कधीही सत्तेत येणार नाही, तोंडातून काहीही बकणार नाही, असा लोकशाही मार्गानेच यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा.

जय हिंद, जय भारत, जय संविधान!

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *