महिला दिन विशेष – भारताच्या संदर्भात

@ स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांना जिवंत जाळले जायचे. हा प्रकार थांबावा म्हणून राजा राम मोहन राय यांनी प्रयत्न केले. तेव्हा आजपासून २०० वर्षांपूर्वी सतीबंदीचा कायदा

इंग्रजांनी केला.

@ स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांचे केशवपन म्हणजे टकली केली जायची. ही प्रथा बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता.

@ भारतात विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळावा यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. त्यामुळे १८५६मध्ये इंग्रज सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला.

@ स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केली. म्हणून आज स्त्रिया शिकलेल्या आहेत व नोकरी व्यवसाय करत आहेत.

@ १८९१मध्ये महाराष्ट्रात ० ते ४ या वयाच्या १३८७८ मुली विधवा होत्या. १२ वर्षापर्यंत लाखो मुली विधवा असतील. भारतात ही संख्या भयानक असू शकते. विवाहप्रसंगी संमती वयाचा कायदा करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सुरुवातीला लग्नाचे वय १२ वर्ष केले गेले. आज ते १८ आहे.

@ बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिल’ लिहिले व ते लागू होत नाही म्हणून राजीनामा दिला. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी ते १९५४मध्ये लागू केले. यामुळे आज भारतातील स्त्री सन्मानाने जगू शकत आहे.

@ बाबासाहेब व नेहरू यांचे उपकार विसरता कामा नये. कारण आरएसएस, गोळवलकर, खुद्द राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा व अनेक पुढाऱ्यांचा या बिलाला विरोध होता.

@ आज ज्या विचारांचे सरकार केंद्रात आहे ते तेव्हा सत्तेत राहिले असते तर हिंदू कोड बिल कधीही लागू केले नसते व स्त्रिया आजही गुलामीत राहिल्या असत्या.

@ भारतातील स्त्रियांची आज जी स्थिती सुधारलेली आहे ती कोणत्याही बाबा, बुवा, देव, धर्म, उपास-तापास यांच्यामुळे नाही तर असंख्य समाज सुधारकांनी केलेल्या प्रबोधनामुळे, प्रयत्नांमुळे व संघर्षांमुळे.

@ कोणत्याही समाजात, धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न हे त्या समाजानेच करायचे असतात. दुसरा स्वतःहून ते करत नाही. जे काळानुरूप बदल, परिवर्तन घडवून आणत नाहीत ते मागासलेले राहून जातात.

@ भारतात जोपर्यंत संविधानानुसार कारभार सुरू आहे तोपर्यंत स्त्रिया सन्मानाने जगू शकतील. धर्माचे पुनरुज्जीवन झाले की स्त्रिया पुन्हा गुलाम झाल्याच म्हणून समजा. (दुर्दैवाने इतिहास माहीत नसल्याने स्त्रिया हेच कार्य मोठ्या आनंदाने व उत्साहाने करत आहेत.)

@ हा इतिहास विसराल तर जुने दिवस परत यायला वेळ लागणार नाही.

-डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *