दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)
प्रश्न- रूपिका, रूपिकांतर व रूपिम या संकल्पना स्पष्ट करून रूपिमांचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर –
- प्रस्तावना – वर्णनात्मक भाषाविज्ञान व त्यातील रूपिका, रूपिकांतर व रूपिम यांचे महत्त्व थोडक्यात ६ – ७ ओळीत लिहा.
- नंतर रूपिका, रूपिकांतर व रूपिम या संकल्पना एक एक करून समजावून सांगा. म्हणजे लिहा. हे १० गुणांसाठी पुरेसे ठरेल इतके लिहा. पाठपोट २ पाने.
- नंतर रूपिमांचे प्रकार एका खालोखाल एक लिहून घ्या किंवा त्याची आकृती काढा. नंतर एकेकाचे स्पष्टीकरण लिहा. हेसुद्धा १० गुणांसाठी पुरेसे ठरेल इतके लिहा. पाठपोट २ पाने.
- रूपिमांचे प्रकार – १) आशयबोधक/ आशयसूचक रूपिम २) कार्यकर/ कार्यसूचक रूपिम ३) मिलन/ संमिश्र रूपिम ४) अनन्यसाधारण रूपिम
- समारोप (शेवटी थोडक्यात, अशा प्रकारे, सारांश, तात्पर्य अशी सुरुवात करून किंवा समारोप असा मुद्दा देऊन ५ ते ७ ओळी लिहा.)
- एकूण उत्तर पाठपोट ४ पानांचे असावे.
अभ्यासासाठी पुस्तकाचे नाव – सुलभ भाषाविज्ञान, दत्तात्रय पुंडे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, वरील उत्तरासाठी पृ. क्र. (क्रमाने) ८०,८१, ८२, ८४, ८५, ८८, ८९.
हे सर्व अशा पद्धतीने बरोबर लिहिले तर खूप जास्त गुण मिळतील.
भाषाविज्ञान हा विषय गणितासारखा आहे. यात जर आपण संकल्पना, प्रकार त्यांचे अर्थ, उदाहरणे अगदी बरोबर लिहिले तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.
डॉ. राहुल पाटील,
मराठी विभाग प्रमुख