स्वन, स्वनिम, स्वनांतर – दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे (२० गुणांसाठी)

प्रश्न- स्वन, स्वनिम, स्वनांतर या संकल्पना स्पष्ट करून उच्चारण स्थानावर आधारलेले स्वनांचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर –

  • प्रस्तावना – वर्णनात्मक भाषाविज्ञान व त्यातील स्वन, स्वनिम, स्वनांतर यांचे महत्त्व थोडक्यात ६ – ७ ओळीत लिहा.
  • नंतर स्वन, नंतर स्वनिम नंतर स्वनांतर या संकल्पना एक एक करून समजावून सांगा म्हणजे लिहा. हे १० गुणांसाठी पुरेसे ठरेल इतके लिहा. पाठपोट २ पाने.
  • नंतर स्वनांचे उच्चारण स्थानावर आधारित (प्रयत्नांवर आधारित नव्हे) प्रकार एका खालोखाल एक लिहून घ्या किंवा त्याची आकृती काढा.  नंतर एकेकाचे स्पष्टीकरण लिहा. हेसुद्धा १० गुणांसाठी पुरेसे ठरेल इतके लिहा. पाठपोट २ पाने.
  • स्वनांचे उच्चारण स्थानावर आधारित प्रकार १) कंठद्वारीय स्वन, २) मृदुतालव्य स्वन, ३) मूर्धन्य स्वन, ४) तालव्य स्वन, ५) दन्तमूलीय स्वन, ६) दन्त्य स्वन ७) ओष्ठ्य स्वन, ८) दन्त्यौष्ठ्य स्वन
  • समारोप (शेवटी थोडक्यात, अशा प्रकारे, सारांश, तात्पर्य अशी सुरुवात करून किंवा समारोप असा मुद्दा देऊन ५ ते ७ ओळी लिहा.)
  • एकूण उत्तर पाठपोट ४ पानांचे असावे. 

अभ्यासासाठी पुस्तकाचे नाव – सुलभ भाषाविज्ञान, दत्तात्रय पुंडे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, वरील उत्तरासाठी पृ. क्र. (क्रमाने)  ५०, ५१, ५२, ५६, ५७, ३७, ३८, ३९.

हे सर्व अशा पद्धतीने बरोबर लिहिले तर खूप जास्त गुण मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *