SYBA, पेपर नं. ३ भाषा आणि बोलीअभ्यास (दीर्घोत्तरी प्रश्न, त्यात अपेक्षित मुद्दे)

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न- भाषा म्हणजे काय ते सांगून मानवी भाषेची कोणतीही सहा लक्षणे सोदाहरण (म्हणजे उदाहरणासह) लिहा.

उत्तर-

  • प्रस्तावना : मानवी जीवनात भाषेचे महत्त्व, आवश्यकता याबद्दल ५-६ ओळी लिहा.
  • नंतर भाषा म्हणजे काय? – यात भाषेच्या ५-६ व्याख्या लिहा व त्या समजावून सांगा. म्हणजे एक व्याख्या लिहिली की तिच्याखाली तिचे स्पष्टीकरण, दुसरी व्याख्या व तिचे स्पष्टीकरण असे सविस्तर लिहा. (किमान दीड पाने)
  • नंतर भाषेची लक्षणे (लक्षणे व वैशिष्ट्ये एकच आहेत. लक्षणे म्हणजेच वैशिष्ट्ये)

सुरुवातीला भाषेची खालील सर्व लक्षणे खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायची. नंतर जेवढी लक्षणे विचारलेली आहेत तेवढी खालीलपैकी कोणतीही दीड पानांमध्ये सविस्तर लिहायची. एक एक लक्षण घ्यायचे व त्याच्याबद्दल लिहायचे.

१) ध्वन्यात्मकता/ चिन्हात्मकता

२) द्विस्तरीय रचना

३) यादृच्छिकता

४) अदलाबदल/ भूमिकांतर

५) प्रत्यक्षातीतता/ स्थलकालातीतता

७) सामाजिकता

८) सर्जनशीलता/ निर्मितीशीलता

९) परिवर्तनशीलता

१०) सांस्कृतिक संक्रमण

  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व लक्षणे म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक – भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

———————————————

प्रश्न : रोमान याकबसन यांनी सांगितलेली भाषेची कार्ये   

उत्तर-

  • प्रस्तावना : मानवी जीवनात भाषेचे महत्त्व, आवश्यकता याबद्दल ५-६ ओळी लिहा.
  • नंतर सुरुवातीला रोमान याकबसन यांनी सांगितलेली भाषेची कार्ये खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायची. नंतर जेवढी कार्ये विचारलेली आहेत तेवढी किंवा सर्व विचारलेली असतील तर सर्व जवळपास तीन पानांमध्ये सविस्तर लिहायची. एक एक कार्य घ्यायचे व त्याच्याबद्दल लिहायचे.

१) आविष्कारात्म कार्य

२) परिणामनिष्ठ कार्य

३) संदर्भनिष्ठ/ निर्देशात्म कार्य

४) संपर्कनिष्ठ कार्य

५) अतिभाषात्म कार्य

६) काव्यात्म/ सौंदर्यात्म कार्य

  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व कार्ये म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

(संपूर्ण उत्तर ४ पानांमध्ये असणे आवश्यक. ४ पाने लिहायला सांगितली आहेत म्हणजे उत्तरपत्रिकेच्या पानांवर पेन्सिल किंवा पेनने दोन्ही बाजूंना खूप जास्त अंतरावर रेषा मारू नका.)

————————————-

प्रश्न : समाजभाषा विज्ञान म्हणजे काय ते सांगून समाजात आढळणाऱ्या भाषेच्या विविध रूपांचा, प्रकारांचे विवेचन करा.

उत्तर-

  • प्रस्तावना : समाज भाषाविज्ञान, भाषेची विविध रूपे इ उत्तराच्या पुढील भागाबद्दल थोडक्यात ५-६ ओळी लिहा.
  • नंतर सुरुवातीला समाजभाषा विज्ञान म्हणजे काय? या पद्धतीचा उदय, त्यात कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्याचे प्रकार- सूक्ष्मलक्ष्यी, स्थूललक्ष्यी इ. सविस्तर लिहा. (दीड-दोन पानांमध्ये)
  • त्यानंतर खाली लिहिल्याप्रमाणे समाजात आढळणारी भाषेची विविध रूपे, प्रकार एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहा. नंतर एक एक मुद्दा घ्यायचा व त्याच्याबद्दल लिहायचे. (दीड-दोन पानांमध्ये)
  1. स्त्रियांची व पुरुषांची भाषा
  2. बालकांची भाषा
  3. तरुणांची भाषा
  4. वृद्धांची भाषा
  5. व्यावसायिकांची भाषा
  6. पिजिन भाषा
  7. क्रिओल भाषा
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक – भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

—————————————-

प्रश्न : समाजातील भाषावैविध्य, भाषेचा बहुजिनसीपणा व भाषिक-सांस्कृतिक विविधता या संकल्पना सोदाहरण (उदाहरणासहित) समजावून सांगा.

उत्तर-

  • प्रस्तावना : समाज भाषाविज्ञान व उत्तराच्या पुढील भागाबद्दल थोडक्यात ५-६ ओळी लिहा.
  • नंतर सुरुवातीला

समाजातील भाषावैविध्य (पान नं. ४१, ४२)

भाषेचा बहुजिनसीपणा (पान नं. ४१, ४२)

भाषिक-सांस्कृतिक विविधता (पान नं. ३८, ३९, ४५)

इ. संकल्पना सविस्तर लिहा. त्या समजावून सांगण्यासाठी उदाहरणे लिहा. (दीड-दोन पानांमध्ये)

  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक – भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

—————————————-

प्रश्न : भाषा आणि संस्कृती यांच्यातील परस्परसंबंधांबद्दल सविस्तर चर्चा करा.

उत्तर-

  • प्रस्तावना : भाषेचे मानवी जीवनातील महत्त्व, समाजाशी, संस्कृतीशी असलेला संबंध इ. उत्तराच्या पुढील भागाबद्दल थोडक्यात ५-६ ओळी लिहा.
  • नंतर सुरुवातीला

भाषा म्हणजे काय ते लिहा.

त्यानंतर संस्कृती म्हणजे काय ते लिहा.

त्यांनतर दोघांमधील परस्परसंबंधांची सविस्तर तीन पानांमध्ये चर्चा करा.

(पान नं. ३८, ३९)

  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक – भाषा, समाज आणि संस्कृती, सोनाली देशपांडे-गुजर, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

—————————————-

प्रश्न : प्रमाणभाषा म्हणजे काय ते सांगून प्रमाणभाषेची गरज का असते ते लिहा.

उत्तर-

  • प्रस्तावना – प्रमाणभाषेची निर्मिती कशी होते, महाराष्ट्रात व इतर राज्यात कोणत्या प्रमाणभाषा बोलल्या जातात व उत्तराच्या पुढील भागाबद्दल थोडक्यात लिहायचे.
  • प्रमाणभाषा म्हणजे काय ते विविध व्याख्यांसह समजावून सांगायचे. व्याख्या व तिचे स्पष्टीकरण या पद्धतीने सर्व व्याख्या लिहायच्या.
  • त्यानंतर प्रमाणभाषेची गरज का असते ते मुद्देसूदपणे लिहा.
  1. समाजातील वेगवेगळ्या गटांकडून आपापसात व्यवहार करण्यासाठी वापर
  2. अनेक बोलीक्षेत्रे एका छत्राखाली आणण्यासाठी
  3. महत्त्वाच्या सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारांसाठी वापर
  4. ज्ञानार्जनाचे व शिक्षणाचे माध्यम
  5. लेखनव्यवहारासाठी वापर
  6. समाजाचे एकसंधत्व टिकविण्यासाठी
  7. समाजातील ज्ञान, इतिहास, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी
  8. दुसऱ्या समाजापासून वेगळेपण जपण्यासाठी
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

  • अभ्यासासाठी पुस्तक – मराठीचा भाषिक अभ्यास, १९८ ते २०१. (नंतर टाकलेली पीडीएफ)

————————————–

प्रश्न – प्रमाणभाषा व बोली यांच्यातील परस्परसंबंधांचा परामर्श घ्या.  

  • प्रस्तावना- प्रमाणभाषा व बोली या संकल्पना थोडक्यात स्पष्ट करायच्या.
  • यांनतर प्रमाणभाषा व बोली यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करून सांगायचे आहेत. त्यासाठी ‘भाषा, समाज आणि संस्कृती’ या पुस्तकातील ‘प्रमाणभाषेची आवश्यकता’ (पान नं. ६१ ते ६५) या मुद्याखाली जे आहे ते पूर्ण लिहायचे. या व्यतिरिक्त नवीन टाकलेल्या पीडीएफमधील ‘प्रमाणभाषा, बोली व स्थानिक भेद’ या मुद्याखालील लिहायचे.
  • शेवटी समारोप – उत्तराचा सार

सर्व मिळून ४ पानात लिहायचे.

—————————————–

प्रश्न – बोली म्हणजे काय ते सांगून बोलींबद्दलचे गैरसमज कोणते व ते कसे चुकीचे आहेत ते समजावून सांगा.

उत्तर –

  • प्रस्तावना – बोली, महाराष्ट्रातील विविध बोली, त्यांची निर्मिती याबद्दल ५-६ ओळीत लिहा.
  • त्यानंतर बोली म्हणजे काय ते सविस्तर समजावून सांगा. त्यात बोलीच्या विविध व्याख्या, व्याख्यांचे स्पष्टीकरण, त्यांची वैशिष्ट्ये, वापरक्षेत्रे याबद्दल सविस्तर लिहा. (दीड ते दोन पाने)
  • त्यानंतर बोलींबद्दलचे एक एक गैरसमज लिहिणे व ते कसे चुकीचे आहेत ते समजावून सांगणे.

बोलींबद्दलचे गैरसमज –

  1. बोली म्हणजे गावंढळांची किंवा अप्रतिष्ठांची बोली होय.
  2. बोली म्हणजे अशुद्ध किंवा चुकीची भाषा होय.
  3. बोलींचा लेखनासाठी वापर करता येत नाही.
  4. प्रमाणभाषा प्रगत असते असते आणि बोली अप्रगत, अविकसित भाषा असते.
  5. बोलींना व्याकरणे नसतात, भाषिक संरचना नसते.

असे अनेक गैरसमज बोलींबद्दल आहेत व ते कसे चुकीचे आहेत ते नंतर टाकलेल्या पीडीएफच्या पान नं. १९५ ते १९८ या दरम्यान समजावून सांगितलेले आहे. ते वाचा व किमान दीड-दोन पानात लिहा.

  • शेवटी समारोप करा.

(संपूर्ण उत्तर ४ पानांमध्ये असणे आवश्यक. ४ पाने लिहायला सांगितली आहेत म्हणजे उत्तरपत्रिकेच्या पानांवर पेन्सिल किंवा पेनने दोन्ही बाजूंना खूप जास्त अंतरावर रेषा मारू नका.)

————————————-

प्रश्न – बोलीविज्ञान म्हणजे काय? ते सांगून बोलींच्या अभ्यासाची आवश्यकता का असते ते सविस्तर लिहा.

उत्तर-

  • प्रस्तावना –
  • बोलीविज्ञान ही संकल्पना स्पष्ट करणे.
  • बोलींच्या अभ्यासाची गरज का आहे, ते लिहिणे. पृष्ठ १२७, १२८, १२९, पृ. ४७ ते ५२ इ. पानांवरील माहिती वाचून त्यातील महत्त्वाची माहिती मुद्देसूदपणे लिहिणे.
  • समारोप

योग्य वेळी परिच्छेद करणे आवश्यक.

——————————

प्रश्न – बोलींसमोर कोणकोणती आव्हाने आहेत? ते सांगून बोलींचे जतन व संवर्धन करण्यासाठी काय करावे लागेल, त्याचा सविस्तर परामर्श घ्या.

  • प्रस्तावना
  • बोलींसमोरील आव्हाने-
  1. गेल्या १०० वर्षात भारतातील जवळपास ९००-१००० बोली मृत झालेल्या आहेत. जागतिक स्तरावरदेखील हे प्रमाण खूप मोठे आहे. १९९०नंतर जागतिकीकरणाच्या काळात हे प्रमाण खूप वाढले आहे.
  2. आधुनिक काळात बोलींच्या माध्यमातून रोजगाराची साधने उपलब्ध होत नाहीत.
  3. आधुनिक शिक्षण व प्रमाणभाषा, इंग्रजी भाषा यांचे आकर्षण यामुळे बोली बोलणाऱ्या लोकांच्या मनात त्यांच्या बोलीविषयी कमीपणाची, न्यूनगंडाची भावना निर्माण होत आहे.
  4. अशा काही कारणांमुळे बोली बोलणारे समाज, लोकं स्वतःहून भाषाबदल करत आहेत.
  5. अभ्यासकांच्या मते, हे शतक संपेल तेव्हा जगात फक्त ६०० भाषा शिल्लक राहतील.
  6. बोली नष्ट झाल्या म्हणजे त्यांच्यातील ज्ञान, मूल्ये, संस्कृती हे सर्व नष्ट होते.

बोलींचे जतन व संवर्धन करण्यासाठीचे उपाय-

  1. भाषानियोजन
  2. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेचे संक्रमण करणे.
  3. बोलींना लिपीबद्ध करणे.
  4. बोलींमधून साहित्य लिहिणे.
  5. बोलींचे व्याकरण, शब्दकोश, वाक्प्रचारकोश, म्हणींचा कोश तयार करणे.
  6. बोलींमधील साहित्य (विविध गीते, गोष्टी, उखाणे) संकलित करणे.
  7. बोलींमधील साहित्याचे ऑडीओ, व्हिडीओ रेकोर्डिंग करून ते संकलित करून ठेवणे किंवा युट्युबवर अपलोड करून ठेवणे. जेणेकरून शेकडो वर्षानंतरही तिचे उच्चार, तिच्यातील शब्द व इतर गोष्टी अभ्यासकांना, पुढील पिढ्यांना ऐकता येतील व अभ्यासता येतील.

समारोप –

अभ्यासासाठी पुस्तक- भाषा, समाज आणि संस्कृती, पृ. ४८ ते ५६

——————————————

टिपा –

  • टिपा कमीत कमी २ पानात लिहाव्यात.
  • जे विचारलेले आहे ते मुद्देसूदपणे किंवा परिच्छेद करून लिहिणे.
  • त्यात प्रस्तावना, समारोप असे मुद्दे लिहिण्याची गरज नाही. परंतु तरीही पहिला ४-५ ओळींचा परिच्छेद व शेवटी ४-५ ओळींचा समारोपदर्शक परिच्छेद असावा.

चांगले गुण मिळविण्यासाठी –

              कोणताही प्रश्न असो तो आधी व्यवस्थित वाचून समजून घेणे गरजेचे असते. त्यांनतर त्यात ज्या मुद्द्यांची, तपशिलाची आवश्यकता आहे. तेच लिहिणे आवश्यक असते. चुकीचे लिहिले तर गुण मिळत नाहीत. त्यासाठी आधीच्या प्रश्नपत्रिका तपासून आतापर्यंत कोणते प्रश्न विचारले गेले आहेत व कोणते विचारले जाऊ शकतात, त्याचा थोडा अभ्यास करायला हवा व त्यानंतर आपल्याला आपल्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्स, पुस्तके यात त्या प्रश्नांची उत्तरे कुठे आहेत ते बघून त्यांचे जोपर्यंत व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत वाचन, नोट्स काढणे, समजून घेणे, चर्चा करणे, आकृत्या काढणे, आकडेवारी, मुद्दे लिहून घेणे इ. गोष्टी करायला हव्यात. परीक्षेच्या आधी उत्तरे लिहिण्याचा सराव करायला हवा.

डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *