‘माझं घर’ नाटक : काही दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे

‘माझं घर’ नाटक : काही दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे

(४ पाने उत्तरे लिहिणे अपेक्षित)

प्रश्न : ‘माझं घर’ या नाटकातील दिनेश व विभा यांचे नातेसंबंधांचा सविस्तर आढावा घ्या.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘माझं घर’ या नाटकाबद्दल, जयंत पवार यांच्याबद्दल ५-७ ओळींमध्ये थोडक्यात माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर

  • विभा व दिनेश यांच्या नात्याचा आढावा घ्यायचा. उच्चभ्रू- दोघेही उच्चशिक्षित – दोघेही कलेची आवड असलेले- त्याचा व्यवसाय, तिची नोकरी-लग्नाला दहा वर्ष झाली तेव्हा घटस्फोट- त्याआधी सुरुवातीची दोन वर्षे- नंतर मुलीचा जन्म- अंधेरीत घर घेणे- दोघांनी हप्ते भरणे- हळूहळू विभा संसारात  गुरफटत जाते- दिनेशला नंदिता आवडू लागते- त्याची घरात चिडचिड- विभाचा अपमान करत राहणे- घटस्फोट घेण्याबद्दल त्याचे बोलणे- विभाची प्रतिक्रिया- त्यानंतर माहेरी जाऊन परत सासरी येणे- दिनेशला घर सोडून जायला सांगणे- एकदा तो घरी आल्यावर दोघांमधील शाब्दिक वाद- इ. तपशील उत्तरात यायला हवेत. (उत्तराचा हा भाग किमान साडे तीन पानांमध्ये लिहिणे)
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

……………………………………………

प्रश्न – ‘माझं घर’ या नाटकातील तुम्हाला आवडलेले कोणतेही दोन प्रसंग तुमच्या भाषेत लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘माझं घर’ या नाटकाबद्दल, जयंत पवार यांच्याबद्दल ५-७ ओळींमध्ये थोडक्यात माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर उत्तराचा मुख्य भाग असतो. त्यात – ‘माझं घर’ या नाटकात तसे अनेक प्रसंग आहेत. पण त्यापैकी माझे आवडते दोन प्रसंग पुढीलप्रमाणे-’ अशी सुरुवात करायची व एकेक प्रसंग सविस्तर लिहायचा. या नाटकात
  • पहिल्या अंकातील पहिल्या प्रवेशातील नेहमीच्या दैनंदिन घडामोडींचा प्रसंग,
  • दुसऱ्या प्रवेशातील दिनेश विभाला घटस्फोट घेण्याविषयी सांगतो तो प्रसंग,
  • दिनेशची आई, उर्मिला व दिनेश यांच्या संवादाचा तिसऱ्या प्रवेशाचा प्रसंग
  • चौथ्या प्रवेशातील विभा माहेरी गेल्यावर मधू अंधेरीला येतो, तेव्हाच थोड्या वेळाने विभा परत सासरी येते व हे घर तिचे आहे हे ठामपणे सांगते तो प्रसंग
  • दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशातील विभा व उर्मिला या स्त्रियांबद्दल, नात्यांबद्दल जे बोलतात तो प्रसंग
  • तिसऱ्या प्रवेशातील विभा व दिनेश यांच्यातील संवाद व दिनेशची आई त्याला घर विभाच्या नावावर करायला सांगते तो प्रसंग
  • त्यांनतर दिनेशच्या आईला दिनेशला मुलगा झाला हे कळल्यावर तिची मानसिक घालमेल होते तो प्रसंग
  • शेवटच्या प्रवेशातील मधू व विभा, नंतर आई व विभा यांच्यातील विभाच्या दुसऱ्या लग्नासंबंधीचे संवाद

असे अनेक प्रसंग आहेत. नाटकातील प्रसंग, कथानक हे संवादातून साकार केलेले असते. यापैकी तुम्हाला आवडलेले कोणतेही दोन प्रसंग तुम्ही सविस्तर लिहायचे आहेत. पहिला प्रसंग दीड-पावणे दोन पानात व दुसराही तितक्याच पानात लिहिणे अपेक्षित आहे. एक प्रसंग १० गुणांसाठी समजायचा. म्हणून एक खूप लहान व एक खूप मोठा लिहिल्यास त्या पद्धतीने कमी-जास्त गुण मिळतील.

  • समारोप- यात ५-६ ओळींमध्ये उत्तराचा सार लिहायचा.

……………………………………………

प्रश्न : ‘माझं घर’ या नाटकातील आई व विभा यांच्यातील नातेसंबंधांचा सविस्तर परामर्श घ्या.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘माझं घर’ या नाटकाबद्दल, जयंत पवार यांच्याबद्दल ५-७ ओळींमध्ये थोडक्यात माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर उत्तराचा मुख्य भाग असतो. या नाटकातील विभा व तिची सासू या अतिशय महत्त्वाच्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. विभा ही सून आहे. तर दिनेशची आई ही तिची सासू आहे. असे असले तरी विभा ही सासूची पूर्ण काळजी घेते. तिचे औषधपाणी बघते. त्यामुळे दोघांमध्ये खूप चांगले संबंध असतात. दिनेश जेव्हा विभाला घटस्फोट घेण्यासंदर्भात सांगतो. त्यानंतर तिची सासू दिनेशला जाब विचारते. विभाने घर उभे करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी किती कष्ट घेतलेले असतात, याची जाणीव सासूला असते, हे तिच्या बोलण्यातून पदोपदी जाणवते. (प्रवेश तिसरा) तिच्या बोलण्याचा सार इथे लिहायचा. माहेरी गेल्यावर तिला खूप दु:ख होते. (पृ. ४२) पुढे विभा सासरी राहण्याचा निर्णय घेते, तेव्हा सासू तिच्या बाजूने उभी राहते व दिनेशला घर सोडायला सांगते. त्यांनतर तीच घर विभाच्या नावावर करायला सांगते. दिनेशला दुसऱ्या बायकोपासून मुलगा झाल्यावर ती नंदिता व बाळाची शुश्रुषा करण्यासाठी तिकडे जाते, तेव्हा विभाला असुरक्षितता जाणवते की आई आता तिकडच्याच होऊन जातात की काय. परंतु ती परत आल्यावर विभाला तिच्यासोबतच राहण्याबाबत आश्वस्त करते.

असे या दोघांच्या नात्याचे चित्रण पूर्ण नाटकभर आहे. त्याचे सविस्तर वर्णन तुम्हाला उत्तरात करायचे आहे. (पूर्ण उत्तर ४ पानी असावे.)

  • समारोप- शेवटी नेहमीप्रमाणे समारोप. यात उत्तराचा सार असावा.

……………………………………………

प्रश्न- ‘माझं घर’ या नाटकाचा आशय लिहा.

उत्तर-

  • प्रस्तावना – ५-७ ओळींमध्ये लेखक व नाटकाबद्दल माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर उत्तराचा महत्त्वाचा भाग असतो. यानंतर ‘माझं घर’ या नाटकाचा आशय साडे तीन पानांमध्ये लिहिणे आवश्यक आहे. आशय म्हणजे हे नाटक वाचल्यावर त्याचा तुमच्या मनावर जो समग्र व संकलित परिणाम झालेला आहे ते लिहिणे. म्हणजे नाटकातील महत्त्वाच्या घटना, पात्रांचे परस्परांशी असलेले संबंध, नाटकातील स्त्रियांचे सुख-दु:ख, त्यांचा संघर्ष, हे नाटक कोणत्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकते, इ. गोष्टी सविस्तर लिहाव्यात.

प्रत्येक मुद्दा लिहून झाल्यावर स्वतंत्र परिच्छेद करावा. प्रत्येक परिच्छेदाला मुद्द्याचे नाव देण्याची आवश्यकता नाही. फक्त परिच्छेद स्वतंत्र असावा.

  • समारोप – उत्तराचा सार ५-६ ओळींमध्ये.

……………………………………………

प्रश्न – ‘माझं घर’ या नाटकातील स्त्री व्यक्तिरेखांचा सविस्तर परिचय करून द्या.

उत्तर –

  • प्रस्तावना – ५-७ ओळींमध्ये लेखक व नाटकाबद्दल माहिती लिहायची.
  • प्रस्तावनेनंतर या नाटकात ज्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत त्यांची नावे आधी लिहायची. या नाटकात विभा, तिची सासू, उर्मिला, राणी, नंदिता मुर्डेश्वर, मालती साळवी (विभाची आई) इ. स्त्री व्यक्तिरेखा आहेत. एकेक व्यक्तिरेखा घेऊन त्यांच्याबद्दल सविस्तर लिहायचे. (साडे तीन पाने)
  • समारोप- उत्तराचा सार

……………………………………………

टिपांमध्ये या नाटकातील 

  • उर्मिला,
  • या नाटकातील संघर्ष 
  • दिनेश 
  • मधू
  • दिनेशची आई 
  • विभा 
  • या नाटकाची भाषाशैली 

इ. प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांचे उत्तर किमान दोन पानांमध्ये लिहिणे अपेक्षित आहे. 

 

मित्रांनो,

              चांगले गुण मिळविण्यासाठी ‘जसा प्रश्न तसे उत्तर’ हे सूत्र लक्षात ठेवा. प्रश्नाला अनुसरून उत्तर लिहा. म्हणजे चांगले गुण मिळतात. चुकीचे लिहिल्यावर गुण मिळत नाहीत. तुम्हाला एखादी नोकरी मिळाल्यावर तुम्हाला एखाद्या गावातील ‘बेरोजगार तरुणांचे सर्वेक्षण’ करायला सांगितले व तुम्ही जर ”कुपोषणग्रस्त महिला व बालके यांचे सर्वेक्षण करून आलात तर चालेल का? ते सर्वेक्षण तुम्ही कितीही चांगले केलेले असले तरी ते चालणार नाही. तुम्हाला पुन्हा त्याच विषयावरील सर्वेक्षणासाठी पाठवले जाईल. तसे हे आहे. म्हणून आधी प्रश्न समजून घ्या व त्यात जे मुद्दे, तपशील आवश्यक आहेत तेच लिहा. 

 

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *