देवबाभळी नाटक- काही प्रश्न व उत्तरे

प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील स्त्रियांची व्यक्तिचित्रे तुमच्या भाषेत सविस्तर लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकातील आवली व लखुबाई यांची व्यक्तिचित्रे लिहायची आहेत. पहिल्या दोन ओळींमध्ये ‘या नाटकात दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी एक आवली व दुसरी लखुबाई. त्यांच्याबद्दल आपण आता या ठिकाणी बघणार आहोत’, असे लिहून आधी पहिली व तिच्याबद्दल सविस्तर लिहून झाल्यावर दुसऱ्याबद्दल लिहायचे. प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल किमान दीड-दीड पाने लिहायला हवीत.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

अभ्यासासाठी पुस्तक –

या घटकाच्या अभ्यासासाठी मूळ नाटक, त्याच्यानंतरचे लेख किमान दोन वेळेस बारकाईने वाचा. मी दिलेली PDFसुद्धा वाचा. वाचन करून महत्त्वाचे घटनाप्रसंग, पात्रांचे स्वभावविशेष इ. गोष्टी लिहून ठेवा.

……………………………………………

प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकाचा आशय लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकाचा आशय साडे तीन पानांमध्ये लिहिणे आवश्यक आहे. आशय म्हणजे हे नाटक वाचल्यावर त्याचा तुमच्या मनावर जो समग्र व संकलित परिणाम झालेला आहे ते लिहिणे. म्हणजे नाटकातील महत्त्वाच्या घटना, पात्रांचे परस्परांशी असलेले संबंध, नाटकातील स्त्रियांचे सुख-दु:ख, हे नाटक मानवी जीवनातील कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकते, इ. गोष्टी लिहाव्यात.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

……………………………………………

प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील आवलीचे व्यक्तिचित्र तुमच्या भाषेत सविस्तर लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकातील आवलीचे व्यक्तिचित्र लिहायचे आहे. पहिल्या दोन ओळींमध्ये ‘या नाटकात दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी एक आवली व दुसरी लखुबाई. त्यापैकी आवलीबद्दल आपण आता या ठिकाणी बघणार आहोत’, असे लिहून मग तिच्याबद्दल लिहायचे. तिचा स्वभाव, तसा स्वभाव घडण्यामागील कारणे, तिचा स्वाभिमानीपणा, तिच्या वाट्याला आलेले आयुष्य, नवऱ्यावर असलेले तिचे प्रेम, लखुबाई आल्यानंतर दोघांचे नाते, घडणारे प्रसंग, शेवटी संसाराबद्दल तिचे मत इ. तपशील सविस्तरपणे या उत्तरात लिहायला हवा. किमान साडे तीन पाने लिहायला हवीत.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

……………………………………………

प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील लखुबाईचे व्यक्तिचित्र तुमच्या भाषेत सविस्तर लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकातील लखुबाईचे व्यक्तिचित्र लिहायचे आहे. पहिल्या दोन ओळींमध्ये ‘या नाटकात दोन स्त्री व्यक्तिरेखा आहेत. त्यापैकी एक आवली व दुसरी लखुबाई. त्यापैकी लखुबाईबद्दल आपण आता या ठिकाणी बघणार आहोत’, असे लिहून मग तिच्याबद्दल लिहायचे. तिचा स्वभाव, तसा स्वभाव घडण्यामागील कारणे, देवी असूनही नवऱ्यावर असलेला तिचा राग, आवलीच्या संपर्कात आल्यानंतर दोघांचे नाते, घडणारे प्रसंग, तिच्यात होत गेलेला बदल, शेवटी तिला संसाराबद्दल झालेले ज्ञान इ. तपशील सविस्तरपणे या उत्तरात लिहायला हवा. किमान साडे तीन पाने लिहायला हवीत.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

……………………………………………

 प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील तुम्हाला आवडलेले कोणतेही दोन प्रसंग सविस्तर लिहा.

उत्तर :

  • प्रस्तावना : ‘देवबाभळी’ या नाटकाबद्दल, लेखकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर ‘देवबाभळी’ या नाटकातील तुम्हाला आवडलेले कोणतेही दोन प्रसंग साडे तीन पानांमध्ये लिहिणे आवश्यक आहे. या नाटकात छोटे छोटे अनेक प्रसंग आहेत. पण ते जास्तकरून संवाद स्वरूपातले आहेत. उदा. आवली डोंगरावर जाताना तिच्या पायात काटा रुततो व ती पडते, त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत घरी येते, त्यानंतर लखुबाई व आवली यांच्यातील सुरुवातीचे संवाद, दुसऱ्या अंकातील पावसात भिजण्याचा प्रसंग व दोघांमधील संवाद, शेवटचा प्रवेश- पान नं. ३६ ते ४०. यापैकी तुम्हाला आवडणारे दोन प्रसंग प्रत्येकी दीड पानांमध्ये लिहायचे आहेत.
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

……………………………………………

या व्यतिरिक्त टीपांमध्ये या नाटकाचे कथानक, घटनाप्रसंग, भाषाशैली, पुरुष पात्रे त्यात तुकाराम, विठ्ठल इ. प्रश्न विचारले जाऊ शकतात.

टिपा –

  • टिपा कमीत कमी २ पानात लिहाव्यात.
  • जे विचारलेले आहे ते मुद्देसूदपणे किंवा परिच्छेद करून लिहिणे.
  • त्यात प्रस्तावना, समारोप असे मुद्दे लिहिण्याची गरज नाही. परंतु तरीही पहिला ४-५ ओळींचा परिच्छेद व शेवटी ४-५ ओळींचा समारोपदर्शक परिच्छेद असावा.

चांगले गुण मिळविण्यासाठी – कोणताही प्रश्न असो तो आधी व्यवस्थित वाचून समजून घेणे गरजेचे असते. त्यांनतर त्यात ज्या मुद्द्यांची, तपशिलाची आवश्यकता आहे. तेच लिहिणे आवश्यक असते. चुकीचे लिहिले तर गुण मिळत नाहीत. त्यासाठी आधीच्या प्रश्नपत्रिका तपासून आतापर्यंत कोणते प्रश्न विचारले गेले आहेत व कोणते विचारले जाऊ शकतात, त्याचा थोडा अभ्यास करायला हवा व त्यानंतर आपल्याला आपल्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्स, पुस्तके यात त्या प्रश्नांची उत्तरे कुठे आहेत ते बघून त्यांचे जोपर्यंत व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत वाचन, नोट्स काढणे, समजून घेणे, चर्चा करणे, आकृत्या काढणे, आकडेवारी, मुद्दे लिहून घेणे इ. गोष्टी करायला हव्यात. परीक्षेच्या आधी उत्तरे लिहिण्याचा सराव करायला हवा.

डॉ. राहुल पाटील

मराठी विभाग प्रमुख 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *