नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल (दीर्घोत्तरी प्रश्न व त्यांची उत्तरे)

वर्ग – प्रथम वर्ष कला

अभ्यासक्रम – नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल

नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे

दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)

प्रश्न – नाटकाच्या घटकांचा सविस्तर परामर्श घ्या.

उत्तर –

  • प्रस्तावना : नाटकाबद्दल प्रास्ताविकेत ५-६ ओळी लिहा.
  • नंतर नाटकाचे घटक

सुरुवातीला नाटकाचे सर्व घटक खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायचे. नंतर जेवढे घटक विचारलेले आहेत तेवढे साडे तीन पानांमध्ये सविस्तर लिहायचे. एक एक घटक घ्यायचे व

त्याच्याबद्दल लिहायचे.

संहितेच्या/ साहित्याच्या अंगाने असलेले घटक (जेव्हा नाटक लिहिले जाते, तेव्हा हे घटक विचारात घेतले जातात.)

  • शीर्षक
  • कथानक
  • व्यक्तिचित्रण/ पात्रचित्रण
  • घटनाप्रसंग
  • संवाद
  • संघर्ष

प्रयोगाच्या/ सादरीकरणाच्या अंगाने असेलेले घटक – (जेव्हा नाटक रंगभूमीवर सादर केले जाते, म्हणजे नाटकाचा प्रयोग केला जातो, तेव्हा हे घटक विचारात घेतले जातात.)

  • नेपथ्य
  • प्रकाश योजना
  • संगीत
  • रंगभूषा
  • दिग्दर्शन
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व लक्षणे म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या. (याची PDF मी तुम्हाला टाकली आहे.)

———————————

प्रश्न : नाटक ही संकल्पना स्पष्ट करून सुखात्मिका हा प्रकार सविस्तर समजावून सांगा.

उत्तर –

  • प्रस्तावना : प्रास्ताविकेत नाटकाबद्दल थोडक्यात ५-६ ओळी लिहा.
  • नंतर सुरुवातीला नाटक ही संकल्पना स्पष्ट करून सांगायची. त्यात नाटकाच्या व्याख्या लिहायच्या. एकेक व्याख्या लिहून ती थोडक्यात समजावून सांगायची. नंतर दुसरी व्याख्या व तिचे थोडक्यात स्पष्टीकरण असे लिहायचे. (हे किमान दीड ते दोन पानांमध्ये लिहायचे.)
  • त्यानंतर सुखात्मिका हा प्रकार म्हणजे काय?, त्याची वैशिष्ट्ये, स्वरूप, उदाहरणे इ. सविस्तर लिहायचे. या ठिकाणी शोकात्मिका विचारली असेल तर तिच्याबद्दल लिहायचे. (हे सुद्धा किमान दीड ते दोन पानांमध्ये लिहायचे.)
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

असे मुद्देसूद व बरोबर लिहिले तर तुम्हाला खूप गुण मिळतील. चुकीचे लिहिले तर मात्र गुण कमी होतात. वरील सर्व कार्ये म्हणजे नेमके काय ते पुन्हा पुन्हा वाचून समजून घ्या.

(संपूर्ण उत्तर ४ पानांमध्ये असणे आवश्यक. ४ पाने लिहायला सांगितली आहेत म्हणजे उत्तरपत्रिकेच्या पानांवर पेन्सिल किंवा पेनने दोन्ही बाजूंना खूप जास्त अंतरावर रेषा मारू नका.)

————————————-

प्रश्न : मराठीतील नाटकाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे लिहा. (या ठिकाणी तुम्हाला मराठी नाटकांचा इतिहास लिहायचा आहे, हे लक्षात ठेवा.)

उत्तर :

  • प्रस्तावना : नाटकाबद्दल ५-७ ओळींमध्ये लिहा.
  • यानंतर मराठी नाटकाचा इतिहास, त्यातील महत्त्वाचे टप्पे या ठिकाणी सविस्तर लिहा. (‘सीता स्वयंवर’ या नाटकापासून तर अलीकडच्या नाटकांपर्यंतची नोट्स पीडीएफ स्वरुपात मी तुम्हाला दिलेली आहे. ते वाचून थोडक्यात तुम्हाला ४ पानांमध्ये उत्तर लिहायचे आहे. अगदी सुरुवातीला तंजावर येथे सापडलेल्या नाटकांबद्दलसुद्धा इथे थोडक्यात लिहायचे आहे.) – साडे तीन पानांमध्ये
  • समारोप – यात उत्तराचा थोडक्यात सार ५-६ ओळींमध्ये लिहायचा.

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभाग प्रमुख 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *