रोहित शर्मा याच्याकडे संघनायक म्हणून असलेले गुण

भारतीय संघाने या विश्वचषकात सलग १० विजय मिळवून आज न्युझीलंडला पराभूत करत अगदी थाटामाटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोणत्याही यशात कप्तानची भूमिका खूप महत्त्वाची असते. या विश्वचषकात सर्व खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण एक कप्तान म्हणून रोहित शर्मा याची भूमिका मला अतिशय महत्त्वाची वाटते. मागच्या विश्वचषकात त्याने ५ शतक केले होते. IPLमध्येही त्याने

अनेकदा विजय मिळवलेला आहे. यावेळीही तो सुरुवातीला अतिशय चांगली सुरुवात करून देत आहे. त्याच्या कप्तान म्हणून असलेल्या कारकिर्दीचे निरीक्षण केल्यावर मला त्याच्यात पुढील गुण आढळले आहेत. माझ्या मते, प्रत्येक संघप्रमुखात पुढील गुण असायला हवेत. मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो.
✓ एक ध्येय समोर ठेवणे (तो व्हिजनरी असावा), ✓ माणसांची चांगली पारख असणे व त्यांच्यातून एक चांगला संघ निवडणे (मग त्यात आपले स्पर्धक असले तरी हरकत नाही.),
✓आपल्या सहकाऱ्यांसमोर ते ध्येय ठेवणे,
✓ त्यांच्याशी सातत्याने चर्चा, सल्लामसलत करणे, ✓ त्यांचे ऐकून घेणे, ✓ आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करून एक strategy तयार करणे, प्लॅन ए, प्लॅन बी तयार ठेवणे, ✓ कोणत्याही बाबतीत आपल्या सहकाऱ्यांना अंधारात न ठेवणे,
✓त्यांच्यात भेदभाव (हा जवळचा, तो लांबचा) न करणे,
✓त्यांच्यावर विश्वास ठेवणे, संघभावना जोपासणे, ✓संघात एकी, निरोगी स्पर्धा निर्माण करणे,
✓ त्यांच्या क्षमता जोखून त्यांच्यावर योग्य वेळेस योग्य जबाबदारी सोपविणे व त्यांना प्रोत्साहन देणे,
✓ सर्वांच्या क्षमतांचा वापर करून घेणे
✓ त्यांच्यावर चिडचिड न करणे,
✓ त्यांना उघडे न पाडणे, त्यांचा अपमान न करणे,
✓ स्वतःच्या विक्रमांकडे लक्ष न देता संघाच्या विजयासाठी योगदान देणे,
✓ आपल्या सहकाऱ्यांच्या यशाचे, कामगिरीचे कौतुक करणे,
✓ आपल्या लक्ष्यावर शेवटपर्यंत लक्ष केंद्रित करणे,
✓ शेवटपर्यंत पकड सैल होऊ न देणे,
✓ विजयाची हवा डोक्यात घुसू न देणे,

अशाच संघनायकाच्या सहकाऱ्यांच्या हातून सर्वोत्तम कामगिरी घडते व तो संघ कोणतेही यश संपादित करू शकतो. मला खात्री आहे की, आपणदेखील एक चांगला संघनायक बनण्यासाठी हे गुण आपल्या अंगी बाणविण्याचा प्रयत्न करणार.

सर्वांना भारताच्या (अर्थातच इंडियाच्या, हिंदुस्तानच्या) विजयाच्या खूप खूप शुभेच्छा!

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *