मराठी व्याकरण – नमुना स्वरुपात १२० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

मराठी व्याकरण – नमुना स्वरुपात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न

विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मराठी व्याकरणावर नमुना स्वरुपात १२० प्रश्न खाली दिलेले आहेत. प्रश्न व पर्याय काळजीपूर्वक वाचा. मग योग्य  उत्तरे निवडा. तरीही लक्षात येत नसेल तर संकल्पना नीट समजून घ्या. मदतीसाठी पुढील लिंकवर क्लिक करून व्याकरणावरील व्हिडीओ बघा.

– मराठी व्याकरण: https://www.youtube.com/playlist?list=PLkOQhRd-rhyNZdTRkdMwGRR4n1jsKKUJL

१. पुढीलपैकी कोणते स्वर मराठीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत?
क) अं, अ: ख) ओ, औ
ग) ऋ, ऌ घ) ॲ, ऑ
२. पुढीलपैकी अविकारी शब्दजाती कोणती?
क) नाम ख) सर्वनाम
ग) क्रियापद घ) क्रियाविशेषण
३. ‘परंतु’ हा शब्द ………………. आहे.
क) विकारी ख) अविकारी
ग) धर्मवाचक घ) धर्मिवाचक
४. पुढीलपैकी कोणत्या शब्दाला तद्धितप्रत्यय लागून त्याचे भाववाचक नाम तयार होऊ शकते?
क) पशू ख) झाड
ग) कागद घ) रस्ता
५. खालीलपैकी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते?
क) मी ख) तू
ग) तो घ) आम्ही
६. ‘तोड’ हा धातू कोणत्या प्रकारचा आहे?
क) सिद्ध ख) अकर्तृक
ग) अकर्मक घ) प्रयोजक
७. च, ही, ना, फक्त, सुद्धा यांना शुद्ध शब्दयोगी अव्यये असे कुणी म्हटलेले आहे?
क) मो. के. दामले ख) प्र. ना. दीक्षित
ग) दादोबा पांडुरंग घ) अरविंद मंगरुळकर
८. मूल, अपत्य, वासरू हे शब्द कोणत्या लिंगी आहेत?
क) पुल्लिंगी ख) स्त्रीलिंगी
ग) नपुंसकलिंगी घ) वरीलपैकी नाही
९. ‘लाडू खाल्ले’ या वाक्यातील ‘लाडू’ हा शब्द कोणत्या वचनी आहे?
क) एकवचनी ख) अनेकवचनी
ग) वरील दोन्ही घ) वरीलपैकी नाही
१०. नी, ही, ई, शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
क) प्रथमा ख) द्वितीया
ग) तृतीया घ) चतुर्थी
११. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला एकवचनी प्रत्यय नाही?
क) पंचमी ख) षष्टी
ग) सप्तमी घ) संबोधन
१२. आख्यातविचार हा ……………….विचार आहे.
क) विशेषण ख) क्रियापद
ग) क्रियाविशेषण घ) केवलप्रयोगी
१३. क्रियावाचक मूळ शब्दाला काय म्हणतात?
क) क्रियापद ख) क्रियाविशेषण
ग) धातू घ) आख्यात
१४. ‘त्याने एम. ए. किंवा बीएड करावे’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
क) समुच्चयबोधक ख) विकल्पबोधक
ग) न्यूनत्वबोधक घ) परिणामबोधक
१५. ‘सचिन क्रिकेट खेळतो’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
क) कर्तरी प्रयोग ख) कर्मणी प्रयोग
ग) भावे प्रयोग घ) संकीर्ण प्रयोग
१६. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना कोणते चिन्ह वापरतात?
क) स्वल्पविराम ख) अर्धविराम
ग) पूर्णविराम घ) अपूर्ण विराम
१७. पुढीलपैकी शुद्धलेखनाच्या नियमानुसार योग्य असलेला शब्द ओळखा.
क) परिचित ख) परिचीत
ग) परीचीत घ) परीचित
१८. ‘उदक’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
क) आकाश ख) नदी
ग) पाणी घ) मेघ
१९. ‘क्षुद्र मनसे क्षुद्र वस्तूंना भाळतात’, हा अर्थ कोणत्या म्हणीचा आहे?
क) करावे तसे भरावे ख) कोल्हा काकडीला राजी
ग) अति तेथे माती घ) खाण तशी माती
२०. ‘घी’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
क) गुजराती ख) तमिळ
ग) कानडी घ) हिंदी
२१. प्रयोग ओळखा- सचिनने कादंबरी वाचली
क) कर्तरी प्रयोग ख) कर्मणी प्रयोग
ग) भावे प्रयोग घ) संकीर्ण प्रयोग
२२. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?
क) बाजरी ख) भूगोल
ग) फणस घ) बटाटा
२३. ‘अचाट खाणे मसणात जाणे’ ह्या म्हणीचा अर्थ काय आहे?
क) खाण्यापिण्यात अतिरेक झाला तर वाईट परिणाम होतात. ख) अति खाणे चांगले असते
ग) अति खाऊ नये घ) अचाट पदार्थ वाईट असतो
२४. ‘उपसंहार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
क) विपत्ती ख) शेवट
ग) पवित्र घ) कपटी
२५. ‘क्षती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
क) नुकसान ख) तोटा
ग) लाभ घ) माती
२६. खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
क) गळा ख) शाळा
ग) मळा घ) विळा
२७. ‘भवानी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे?
क) हुशार स्त्री ख) भांडखोर स्त्री
ग) शिकलेली स्त्री घ) मठ्ठ स्त्री
२८. ‘निरंतर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
क) क्वचित ख) नेहमी
ग) हमेशा घ) सदैव
२९. ‘तो अभ्यास करीत राहील’, या वाक्याचा काळ ओळखा.
क) साधा वर्तमानकाळ ख) साधा भविष्यकाळ
ग) रीती भविष्यकाळ घ) पूर्ण भविष्यकाळ
३०. दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतात?
क) शब्दयोगी अव्यय ख) उभयान्वयी अव्यय
ग) केवलप्रयोगी अव्यय घ) क्रियाविशेषण
३१. ‘सकाळ’ या शब्दाला सप्तमीचे प्रत्यय लागल्यावर कोणते पद तयार होईल?
क) सकाळचे ख) सकाळून
ग) सकाळी घ) सकाळ
३२. आकाशाला भिडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
क) उंची वाढणे ख) सर्वोच्च बिंदू गाठणे
ग) उंच उडणे घ) आभाळात जाणे
३३. ‘यमक’ हा शब्द कशाशी संबंधित आहे?
क) अलंकार ख) श्लोक
ग) कीर्तन घ) प्रवचन
३४. पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
क) मनुष्य ख) माणूस
ग) मनुष्यत्व घ) गोड
३५. समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द …………….
क) वेगळे होतात ख) एकत्रित येतात
ग) काढले जातात घ) यापैकी नाही
३६. पुढीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते?
क) ख)
ग) ; घ) !
३७. ‘विदुषी’ हा शब्द कोणत्या लिंगी आहे?
क) पुल्लिंगी ख) स्त्रीलिंगी
ग) नपुंसकलिंगी घ) सामान्यलिंगी
३८. आपण ज्या वस्तूची इच्छा करतो, ती देणाऱ्या (काल्पनिक) झाडाला काय म्हणतात?
क) कामधेनू ख) वटवृक्ष
ग) चिंतामणी घ) कल्पवृक्ष
३९. मराठीतील अनुनासिके कोणती?
क) ङ, ञ, ण, न, म ख) क, च, ट, त, प
ग) ख, छ, ठ, थ, फ घ) ग, ज, ड, द, ब
४०. प्रथमा विभक्तीचा अर्थ सांगा.
क) कर्म ख) करण
ग) अपादान घ) कर्ता
४१ मराठीमध्ये किती लिंग मानली जातात.
क) दोन ख) तीन
ग) चार घ) पाच
४२. नामाच्या वाक्यातील प्रयोगावरून त्याच्या अर्थाच्या ठिकाणी असलेल्या वास्तविक किंवा काल्पनिक पुरूषत्वाचा बोध होतो ते………… लिंग होय
क) पुल्लिंग ख) स्त्रीलिंग
ग) नपुंसकलिंग घ) सामान्य लिंग
४३. ’विधुर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
क) विदुषी ख) विधुरीण
ग) विधवा घ) सधावा
४४. गटात न बसणारा शब्द ओळखा.
क) जल ख) पाणी
ग) नीर घ) आकाश
४५. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?
क) नदी ख) वेली
ग) गाडी घ) वाडी
४६. मराठीत विभक्तीची संख्या किती आहे?
क) पाच ख) सहा
ग) सात घ) आठ
४७. …………. विभक्तीचा प्रमुख कारकार्थ कर्ता आहे.
क) प्रथमा ख) द्वितीया
ग) तृतीया घ) चतुर्थी
४८. धातूपासून क्रियापद बनताना धातूला जे प्रत्यय लागतात, त्यांना ……….. म्हटले जाते.
क) तद्धितप्रत्यय ख) विभक्तिप्रत्यय
ग) आख्यातप्रत्यय घ) कृतप्रत्यय
४९. मराठीत तीन मुख्य काळांचे एकूण किती प्रकार मानले जातात?
क) सहा ख) आठ
ग) बारा घ) चौदा
५०. ‘त्याने काम केले’ या वाक्याचा काळ ओळखा.
क) वर्तमानकाळ ख) भूतकाळ
ग) भविष्यकाळ घ) अपूर्ण वर्तमानकाळ
५१. नामाचे वचन बदलले की नामाच्या मूळ रूपात बदल होतो. त्यालाच ………. होणे असे म्हणतात.
क) अकार ख) उकार
ग) विकार घ) अनुस्वार
५२. खालीलपैकी अर्धविराम ओळखा.
क) . ख) ,
ग) घ) ;
५३. ‘ही वस्तू मी इंग्लंडहून आणली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
क) द्वितीया ख) पंचमी
ग) सप्तमी घ) संबोधन
५४. खालीलपैकी संयुक्त वर्ण कोणता?
क) ख)
ग) क्ष घ)
५५. खालीलपैकी महाप्राण ध्वनी कोणता?
क) ख)
ग) घ)
५६. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण किंवा धर्म यांचा बोध होतो, त्याला काय म्हणतात?
क) विशेष नाम ख) सामान्य नाम
ग) भाववाचक नाम घ) सर्वनाम
५७. खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय लागून तयार झालेला आहे?
क) गरिबी ख) आत्या
ग) मावशी घ) आनंद
५८. ‘गोखले’ या शब्दास ‘चा’ हा प्रत्यय लागल्यावर त्याचे सामान्यरूप कसे होईल?
क) गोखले यांचा ख) गोखलींचा
ग) गोखलेंचा घ) गोखल्यांचा
५९. मराठीतील आत्मवाचक सर्वनामे कोणती?
क) कोण, काय ख) आपण, स्वतः
ग) तो, हा घ) जो, जे
६०. पुढीलपैकी स्त्रीलिंगी सर्वनाम कोणते?
क) तो ख) ही
ग) जो घ) कोण
६१. ‘पिकलेला आंबा’ यातील ‘पिकलेला’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
क) धातुसाधित ख) सार्वनामिक
ग) नामसाधित घ) संख्याविशेषण
६२. कर्त्यापासून निघालेली क्रिया ही कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल, तर ते क्रियापद …………………… असते.
क) सकर्मक ख) अकर्तृक
ग) अकर्मक घ) भावकर्तृक
६३. ‘क्रीडांगणावर मुले खेळू लागली’, या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणते?
क) क्रीडांगण ख) मुले
ग) खेळू घ) लागली
६४. ‘टेबलाखाली पुस्तक पडले आहे. ते वर ठेव’, या वाक्यांमधील शब्दयोगी अव्यय ओळखा.
क) वर ख) खाली
ग) ठेव घ) पुस्तक
६५. ‘तू लवकर घरी आलास, म्हणजे आपण खेळायला जाऊ’, या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते आहे?
क) लवकर ख) आपण
ग) घरी घ) म्हणजे
६६. शब्दाला आधी जे प्रत्यय लागते त्याला काय म्हणतात?
क) उपसर्ग ख) तद्धितप्रत्यय
ग) कृतप्रत्यय घ) विभक्तिप्रत्यय
६७. ‘किडूकमिडूक’ हा कोणता शब्द आहे?
क) अंशाभ्यस्त ख) पूर्णाभ्यस्त
ग) अनुकरणवाचक घ) सामाजिक
६८. आपल्या स्वाभाविक बोलण्याला (म्हणजे आपल्या मनात जसे विचार येतात, ते तसेच्या तसे बोलून दाखविणे) काय म्हणतात?
क) काव्य ख) स्वगत
ग) पद्य घ) गद्य
६९. भाषेला ज्या-ज्या गोष्टींमुळे शोभा येते, त्याला ………… असे म्हणतात.
क) वृत्त ख) अभिधा
ग) अलंकार घ) व्यंजना
७०. ‘ज्याने वाईट केले नाही, त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही’, या अर्थाची म्हण कोणती?
क) कर नाही त्याला डर कशाला? ख) करावे तसे भरावे
ग) ऐकावे जनाचे, करावे मनाचे घ) दाम करी काम
७१. पुढीलपैकी शुद्धलेखनाच्या नियमानुसार योग्य असलेला शब्द ओळखा.
क) भीति ख) भिती
ग) भिति घ) भीती
७२. ‘राजाची स्तुती करणारा’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
क) गायक ख) शाहीर
ग) गंधर्व घ) भाट
७३. ‘पड खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
क) भूक लागल्यावर खाणे ख) उपाशी राहणे
ग) संपविणे घ) माघार घेणे
७४. सापाचा खेळ करणारा?
क) गारुडी ख) मदारी
ग) डोंबारी घ) दरवेशी
७५. प्रयोग ओळखा – ‘ती अभ्यास करते.’
क) कर्तरी प्रयोग ख) कर्मणी प्रयोग
ग) भावे प्रयोग घ) संकीर्ण प्रयोग
७६. खालीलपैकी देशी शब्द कोणता?
क) बाजरी ख) भूगोल
ग) फणस घ) बटाटा
७७. खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते?
क) मी गावी जात आहे ख) मी गावी जाणार
ग) मी गावी गेलो होतो घ) मी गावी जाऊन आलो
७८. आडवाट, पडछाया, प्रतिदिन हे शब्द मराठी व्याकरणात ……….. म्हणून ओळखले जातात.
क) उपसर्गसाधित शब्द ख) तद्धित शब्द
ग) प्रत्ययघटित शब्द घ) अनुकरणवाचक शब्द
७९. ‘हकालपट्टी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
क) आपदा ख) विपत्ती
ग) उचलबांगडी घ) वादंग
८०. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
क) गळा ख) शाळा
ग) मळा घ) विळा
८१. शब्दांच्या आठ जातींपैकी विकारी नसलेली जात ओळखा.
क) नाम ख) विशेषण
ग) क्रियापद घ) केवलप्रयोगी
८२. शब्दांच्या अविकारी जातीत लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे……………
क) बदल होतो ख) बदल होत नाही
ग) सतत बदल होतो घ) समानता येते
८३. वाक्यात येणार्‍या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या गुणांची नावे असतात, त्यांना …………………….. म्हणतात.
क) भाववाचक नामे ख) विशेष नामे
ग) सामान्य नामे घ) समुदायवाचक नामे
८४. नामांचा पुनःपुन्हा वापर होऊ नये, म्हणून त्यांच्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना काय म्हणतात?
क) भाववाचक नामे ख) विशेष नामे
ग) सामान्य नामे घ) सर्वनामे
८५. क्रियापदाच्या मूळ रूपाला ………… असे म्हणतात.
क) क्रियाविशेषण ख) धातू
ग) काळ घ) अर्थ
८६. खालील शब्दांमधील शब्दयोगी अव्यय ओळखा.
क) मध्ये ख) पतंग
ग) तोड घ) वाह!
८७. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती?
क) ती, मी ख) आपण, स्वतः
ग) तू, जे, आम्ही घ) तो, हा, जो
८८. गटात न बसणारा शब्द ओळखा.
क) खा ख) पी
ग) कर घ) वर
८९. नामापूर्वी येणार्‍या विशेषणाला ………………….. म्हणतात.
क) क्रियाविशेषण ख) अधिविशेषण
ग) वर्गविशेषण घ) पूर्वविशेषण
९०. मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत?
क) दोन ख) तीन
ग) चार घ) पाच
९१. दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो एक स्वतंत्र शब्द तयार होतो, त्या शब्दाला ……………….. असे म्हणतात.
क) सिद्ध शब्द ख) उपसर्गघटित शब्द
ग) प्रत्ययघटित शब्द घ) सामासिक शब्द       
९२. अव्ययीभाव समासात ………………………….
क) पहिला शब्द प्रधान असतो ख) दुसरा शब्द प्रधान असतो
ग) दोन्ही शब्द प्रधान असतात घ) दोन्ही शब्द प्रधान नसतात
९३. खालील गटातील तद्भव शब्द ओळखा.
क) कवी ख) गुरु
ग) पुत्र घ) कान
९४. संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना …………….. असे म्हणतात.
क) तत्सम शब्द ख) तद्भव शब्द
ग) देशी शब्द घ) स्वदेशी शब्द
९५. वांगे, लुगडे, खुळा, ढेकूण हे कोणते शब्द आहेत?
क) तत्सम शब्द ख) तद्भव शब्द
ग) देशी शब्द घ) स्वदेशी शब्द
९६. शब्दाच्या मागे (आधी) प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात, त्यांना ……………………. असे म्हणतात.
क) प्रत्ययघटित शब्द ख) उपसर्गघटित शब्द
ग) तत्सम शब्द घ) तद्भव शब्द
९७. खालील शब्दातील अनुकरणवाचक शब्द ओळखा.
क) किरकिर ख) रीतीरिवाज
ग) मागोमाग घ) लाललाल
९८. खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे?
क) मालक ख) हकीकत
ग) झाड घ) बटाटा
९९. पुढीलपैकी सामान्यलिंगी शब्द कोणता?
क) सासू ख) मित्र
ग) पतंग घ) डोंगर
१००. ‘रस्ता’ या आकारान्त नामाचे अनेकवचन ……………… होते.
क) एकारान्त ख) ओकारान्त
ग) अकारान्त घ) इकारान्त
१०१. ‘चे, च्या, ची’ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
क) चतुर्थी ख) पंचमी
ग) षष्टी घ) सप्तमी
१०२. ‘अधिकरण’ हा अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे?
क) चतुर्थी ख) पंचमी
ग) षष्टी घ) सप्तमी
१०३. द्वितीया व चतुर्थी या विभक्तींचे प्रत्यय …………… आहेत.
क) सारखे ख) विरुद्ध
ग) असमान घ) गुंतागुंतीचे
१०४. दोन प्रयोगांचा संकर होऊन होणाऱ्या प्रयोगास ……………… असे म्हणतात.
क) कर्तरी प्रयोग ख) कर्मणी प्रयोग
ग) भावे प्रयोग घ) संकीर्ण प्रयोग
१०५. वाक्यातील कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बनत असते, याला काय म्हणतात?
क) प्रयोग ख) विभक्ती
ग) उपसर्ग घ) धातू
१०६. धातूने दाखविली जाणारी क्रिया कर्त्यापासून निघून ज्या दुसऱ्या कुणावर किंवा कशावर तिचा परिणाम घडतो, त्यास त्या क्रियेचे ………… म्हणतात.
क) कर्ता ख) कर्म
ग) करण घ) अधिकरण
१०७. ‘मला घरी यायला सांजावले’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
क) कर्तरी प्रयोग ख) कर्मणी प्रयोग
ग) भावे प्रयोग घ) संकीर्ण प्रयोग
१०८. शब्दसमूहाबद्दल एक शब्द – शंकराची उपासना करणारा
क) शैव ख) शिव
ग) शिवैक घ) शिवक
१०९. ‘घृणा’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
क) तिरस्कार ख) राग
ग) मत्सर घ) लोभ
११०. ‘खसखस पिकणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ –
क) हळुवार हसणे ख) एकट्याने हसणे
ग) स्मितहास्य करणे घ) मोठ्याने हसणे
१११. पुढीलपैकी आकारान्त शब्द ओळखा.
क) विसावा ख) आसू
ग) नदी घ) वर्दी
११२. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
क) सर्व घरांमध्ये मातीच्या चुली असतात ख) काही घरांमध्ये मातीच्या चुली असतात
ग) आता कोणत्याच घरात मातीच्या चुली असतात घ) यापैकी नाही
११३. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात?
क) विभक्ती ख) वाक्प्रचार
ग) सामासिक शब्द घ) उपसर्गघटित शब्द
११४. योग्य शब्द निवडा.
क) विषद ख) वीषद
ग) विशद घ) वीशद
११५. भाषेला शोभा येण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
क) अलंकारांचा ख) विभक्तींचा
ग) नामांचा घ) प्रयोगांचा
११६. कोणत्या ध्वनींचा उच्चार करताना ओठांचा वापर केला जातो?
क) क, ख, ग, घ ख) ट, ठ, ड, ढ
ग) त, थ, द, ध घ) प, फ, ब, भ
११७. जगत ̖ + जीवन या शब्दाची योग्य संधी कशी होईल?
क) जगत्जीवन ख) जगज्जीवन
ग) जगतजीवन घ) जगजीवन
११८. ‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
क) माजी ख) पाजी
ग) भाजी घ) ताजी
११९. वाक्यातील क्रिया करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
क) कर्मा ख) कर्ता
ग) कर्ताधर्ता घ) कर्तार
१२०. ‘घाऊक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
क) भावूक ख) किरकोळ
ग) स्वस्त घ) सुपीक

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *