भाजप कशामुळे जिंकू शकते?

एक लक्षात घ्या, लोकांच्या गरजा आणि अपेक्षा खेड्यापाड्यांमध्ये फार नाहीयेत. सरकारकडून जे मोफत धान्य, साड्या, अकाउंटवर वेगवेगळ्या निमित्ताने जमा होणारे पैसे या सर्व गोष्टींमुळे ते

अतिशय खुश आहेत आणि आता तर निवडणुकांच्या तोंडावर डायरेक्ट अकाउंटमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने पंधरा-वीस हजार रुपये जमा होत आहेत, होणार आहेत. तेव्हा मला तरी असे वाटते की, ही लोकं यांनाच मतदान करतील. त्यांना लोकशाही, राज्यघटना, त्यावर आधारित समाज निर्मिती, देशावरचे वाढते कर्ज, ढासळत चाललेली न्यायव्यवस्था, वाढती भांडवलशाही यासारख्या गोष्टी तेवढ्या समजत नाहीत. (मोफत शिक्षण सोडून) सर्व मोफत मिळत आहे, यातच त्यांना आनंद आहे. पुढे जाऊन यांचे राज्यघटनेने बहाल केलेले अधिकार काढून घेतले तरी त्यांना फार फरक पडणार नाही. आज मिळत आहे ना बस.

याचाच फायदा सत्ताधारी पक्ष घेत आहेत. निवडून येण्यासाठी त्यांनी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. काँग्रेसनेदेखील यासारख्या कित्येक गोष्टींची सुरुवात केलेली असली तरी लोकांच्या स्मृती कमकुवत असतात. त्यांना जुन्या गोष्टी जास्त आठवत नाहीत. या सर्व गोष्टींचा फायदा सत्ताधारी पक्षांना निवडणुकीमध्ये नक्की होणार आहे.

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *