Dr. Rahul Rajani

‘द्ध’ की ‘ध्द’?

आपल्या मराठी व हिंदी भाषेत ‘द्ध’ हे जोडाक्षर
शुद्ध,
युद्ध,
विरुद्ध,
समृद्धी,
प्रसिद्ध,
प्रसिद्धी,
प्रतिबद्ध,
वृद्धी,
बुद्ध,
रिद्धी,
सिद्धी,
सिद्ध
अशा अनेक शब्दांमध्ये येते.

मात्र बरेच जण हे शब्द


शुध्द
युध्द,
विरुध्द,
समृध्दी,
प्रसिध्दी,
प्रसिध्द
प्रतिबध्द,
वृध्दी,
बुध्द,
रिध्दी,
सिध्दी,
सिध्द
असे लिहितात.
त्यांना ‘द्ध’ व ‘ध्द’ मधील फरक कळत नसतो किंवा फरक असला तरी असा लिहिला काय किंवा तसा लिहिला काय, काय फरक पडतो, असे अनेकांना वाटते. कारण उच्चार तर सर्वजण सारखाच  करतात.
तेव्हा आपण ‘द्ध’ आणि ‘ध्द’ मधील फरक लक्षात घेऊयात.

‘द्ध’ किंवा ‘ध्द’ पैकी ‘द्ध’ हे बरोबर लिहिलेले आहे. ‘द्ध’ मध्ये ‘द्’ हा वर्ण अर्धा असतो व ‘ध’ हा पूर्ण असतो. आपण उच्चार असाच करत असतो. तर ‘ध्द’मध्ये ‘ध्’ हा वर्ण अर्धा असून ‘द’ हा पूर्ण असतो. हे मात्र चुकीचे आहे. तुम्ही याप्रमाणे उच्चार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जमणार नाही.
आपण जसा उच्चार करतो, त्याप्रमाणे लेखन व्हायला हवे, तेव्हा या नियमानुसार आपण वरील शब्दांमध्ये ‘ध्द’ ऐवजी ‘द्ध’ हे जोडाक्षर वापरायला हवे.

© copyright

Exit mobile version