Dr. Rahul Rajani

माणूसपण

माणूसपण

 

माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. उदा. धर्म, जात, पंथ, संप्रदाय, पक्ष, लिंग, वय, वर्ण, रंग, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, देश, प्रांत, वंश, भाषा, वेशभूषा, संस्कृती, प्रथा-परंपरा, दैवते, विचारधारा, प्रस्थापित-विस्थापित इ. इ.

      याउलट प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, संवेदनशीलता, अंत:करणातील ओलावा या गोष्टी वरील कृत्रिम व मानवनिर्मित (तर काही निसर्गनिर्मित) भेदांवर मात करून माणसांना एकमेकांच्या जवळ आणतात. या गुणांमुळे माणसाचे अस्तित्व व माणूसपण टिकून आहे. 

तेव्हा चला, आपल्या मनात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, संवेदनशीलता, अंत:करणातील ओलावा इ. गुणांची वृद्धी करूयात. वरील भेद विसरून, बाजूला ठेवून माणूस म्हणून जगूयात. 

Exit mobile version