Dr. Rahul Rajani

‘संतसूर्य तुकाराम’ –  आनंद यादव (थोडक्यात परिचय)

                  
‘संतसूर्य तुकाराम’ ही  आनंद यादव यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर आघात करणारी, परंतु तुकारामांचे अवघे आयुष्य अगदी वास्तववादी व मानसशास्त्रीय, सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारी एक उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीत त्यांच्या बालपणापासून ते वैकुंठगमनापर्यंतच्या

आयुष्याचे सविस्तर व यथार्थ वर्णन सहज, सोप्या भाषेत यादवांनी केलेले आहे.

तुकारामांचे बालपण, बालपणातील मौजमजा, दंगामस्ती, गुरं हाकणे, नंतरचा दुकानदारीचा, महाजनकीचा व्यवसाय, तारुण्यावस्थेतील त्यांचे स्वाभाविक तारुण्यसुलभ वागणे (आक्षेपार्ह्य ?), विवाह, वैवाहिक जीवन, दुष्काळ, त्याचा सामना, घरातील ४-५ जणांचा मृत्यू, तुकोबांची विरक्तावस्थेकडे झुकत चाललेली मानसिकता त्यांना लागलेले परमेश्वर भक्तीचे- कीर्तनाचे वेड, समाजातील उच्चवर्णियांकडून झालेला त्रास, त्यांचे जलदिव्य, त्यांचा समाजात वाढत चाललेला प्रभाव व शेवटी वैकुंठगमन या साऱ्या घटनाप्रसंगांंचे सूक्ष्म वर्णन यादवांनी या कादंबरीत केलेले आहे.
मात्र या कादंबरीत भाष्य खूपच आलेली आहेत.  संवाद लहान-लहान नसून लांबलचक आहेत. म्हणजे एक जण बोलतो, तर दुसरा ते नुसतं ऐकतो व दुसरा बोलतो, तेव्हा पहिला ऐकण्याचेच काम करतो. ही गोष्ट खूप खटकते. तुकारामांच्या तारुणसुलभ वर्तनाचे थोडक्यात व संयमाने वर्णन आलेले आहे.  परंतु तरीही ते नंतर आक्षेपार्ह्य ठरलेले आहे. तुकारामांना एक माणूस म्हणून वाचकांनी (म्हणण्यापेक्षा वारकऱ्यांनी) स्वीकारलेले दिसत नाही. वास्तविक तुकारामांची एका सामान्य माणसापासून संतत्वापर्यंत वाटचाल झालेली आहे. मात्र ते स्वीकारायला आपली सनातन मानसिकता तयार दिसत नाही.  असो.

आनंद यादव – संतसूर्य तुकाराम, मेहता पब्लिशिंग हाऊस, प्र.आ. ऑगस्ट २००८. 
किंमत – २२० रु.
दि :- २८/०७/०९ ( मंगळवार)

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा.  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

Exit mobile version