भवितव्य काहीच नव्हतं
नात्याला आमचं
तरी तिने मला
तिच्या मनात जपलं।
उधळून दिले तिने
सर्वकाही माझ्यावर
रित्या हाती जाताना
डोळ्यात पाणी दाटलं।
दोन फुलं चुंबून मग
मी तिच्या हाती दिली
ओंजळीत घेऊन तिने
ती छातीशी धरली।
मोल त्या भेटीचे
तिला आज कळणार नाही
जेव्हा माझे स्मरण होईल
ती फुलं ती पाहिल।
दोन दिसांची संगत
अशी संस्मरणीय झाली
जगायचे कसे?
आम्हाला शिकवून गेली।
(१२ मे २०१६)
©Copyright