Dr. Rahul Rajani

नेट/ सेटच्या अभ्यासासाठी मी वापरलेली काही पुस्तके व माझे काही अनुभव

             मी जून २००७ मध्ये एम. ए. झालो. त्याच महिन्यात २९ जून रोजी झालेली नेट परीक्षा मी (नोव्हेंबरमध्ये निकाल) उत्तीर्ण झालो. त्यानंतर जून २००८ मध्ये झालेली नेट परीक्षा मी JRF सह उत्तीर्ण झालो. नंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF (फेलोशिप) घेतली. 

            डिसेंबर २०११ च्या आधी ही परीक्षा फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हती. पहिला व दुसरा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा तर तिसरा पेपर लिहावा लागायचा. त्यात संकल्पना, दीर्घोत्तरी प्रश्न, ४० गुणांसाठी निबंध इ. स्वरूपाचे प्रश्न विचारले जायचे व २०० गुणांच्या पेपरसाठी फक्त अडीच तास वेळ दिलेली असायची. तेव्हा कमी वेळेत अतिशय अचूक उत्तरे लिहावी लागायची.

असंख्य मुलांकडून पेपरच कव्हर व्हायचा नाही. अनेक प्रश्नांची उत्तरे लिहायची राहून जायची. तेव्हा प्रश्नपत्रिका इंटरनेट अथवा इतर ठिकाणी उपलब्ध व्हायच्या नाहीत. तर जी मुले पेपर देऊन यायची. त्यांना कोणते प्रश्न विचारले गेले होते, ते विचारावे लागायचे. तसेच प्रश्नाच्या खालीच उत्तरासाठी जागा असल्याने प्रश्नपत्रिका मिळण्याचा प्रश्नच नसायचा. अशा अनेक गोष्टी या परीक्षेच्या संदर्भात त्या वेळी होत्या. निकालही एक टक्क्यापेक्षा कमी लागायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप कस लागायचा. अंदाजपंचे  लिहून काहीच चालायचे नाही.

           ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मी एम.ए.च्या पहिल्या वर्षापासूनच अभ्यासाला सुरुवात करून दिली होती. त्यासाठी मी खालील काही पुस्तके अभ्यासली होती. या यादीत भाषाविज्ञान, साहित्यशास्त्र, समीक्षा या विषयांशी संबंधित पुस्तकांचा समावेश केलेला नाहीये. बी.ए. व एम.ए. करत असताना मला मूळ संदर्भग्रंथांचे वाचन, संकलन, नोट्स काढून ठेवणे, इ. सवयी असल्याने व या विषयांची त्या-त्या वर्षीच चांगली तयारी करून घेतली असल्याने तीच संदर्भग्रंथ व नोट्स कामात आली. या सर्व अभ्यासाचा फायदा मला बी. ए. व एम. ए.लाही खूप झाला. मी या दोन्ही परीक्षांमध्ये मराठी विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) सर्वप्रथम आल्याने मला दोन वेळेस (बी. ए. २००५ व एम. ए. २००७) सुवर्णपदक (Gold medal) मिळाले.

           अभ्यासाच्या क्षेत्रात एका परीक्षेसाठी केलेला अभ्यास दुसरीकडे कामात येतो, हा माझा अनुभव आहे.

             या परीक्षेचा अभ्यास करताना आम्ही (मी व माझ्या काही मित्रांनी ‘अभी नही तो कभी नही’ हे तत्त्व समोर ठेवलेले होतेव त्यानुसार आम्ही अक्षरश: दिवसरात्र अभ्यास करत होतो. कारण दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललेली होती. या तत्वामुळेच आम्ही बरेच जण लवकर पास झालो. 

          असो.

 

मराठी विषयाच्या नेट/ सेट परीक्षेसाठी संदर्भग्रंथ-

1 ) साहित्यदर्शन – दिलीप भिमराव गायकवाड

2 ) साहित्यविमर्श – विद्या व्यवहारे

3 ) कादंबरी सवाद – पंडित टापरे

4 ) प्रदक्षिणा – खंड 1 आणि

      खंड 2 – कॉन्टिनेन्टल प्रकाशन

5 ) प्राचीन मराठी वाड्.मयाची रूपरेषा – ल. रा. नशिराबादकर

     व खंड 2 – भटकळ प्रकाशन , मुंबई

6 ) संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश – खंड 1

7 ) वाड्.मयीन संज्ञा – संकल्पना कोश – भटकळ प्रकाशन , मुंबई

8 ) दलित साहित्य : उद्गम आणि विकास – योगेंद्र मेश्राम

9 ) दलित साहित्याचा इतिहास – डॉ . म . सु . पगारे

10 ) दलित कवितंतील नवे प्रवाह- महेंद्र भवरे

11 ) दलिताची आत्मकथने – डॉ . वासुदेव मुलाटे

12 ) ग्रामीण कवितेचा इतिहास – डॉ . कैलास सार्वेकर

13 ) वाड्.मयीन निबंधलेखन- रा. ग. जाधव

14 ) सुगम मराठी व्याकरण लेखन – मो. रा. वाळिंबे

15 ) व्यावहारिक मराठी – ल . रा. नशिराबादकर

16 ) ग्रामीण कादंबरीची वाटचाल – डॉ. रवींद्र ठाकूर

 

य. च. म. मु. विद्यापीठाची पुस्तके –

1 ) नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य

2 ) ग्रामीण , दलित आणि स्त्रीवादी साहित्य

3 ) कविता म्हणजे काय ?

4 ) निवडक कविता

5 ) कादंबरी : वाड्.मय प्रकार

6 ) नाटक : वाङ्मय प्रकार

7 ) कथा : वाड्.मय प्रकार

 

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

 

(जर आपल्याला माझे ब्लॉगवरील लेखन आवडत असेल तर तुम्ही पोस्ट ओपन केल्यावर जो बॉक्स येतो, त्यात तुमचा Email व Name टाकून sign up for newsletter now वर क्लिक करा व subscriber व्हा. जेणेकरून माझ्या नंतरच्या पोस्ट तुम्हाला मोफत व विनाविलंब वाचायला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही खाली share चे विविध पर्याय दिलेले आहेत, त्यांचा वापर करून share ही करू शकतात. धन्यवाद!)

(माझे youtube वरील व्हिडीओ पाहण्यासाठी व माझे विविध विषयांवरील विचार ऐकण्यासाठी माझ्या youtube channel ला भेट द्या व माझ्या channel ला Subscribe करा. youtube वर मी Dr. Rahul Rajani याच नावाने आहे. धन्यवाद!)

Exit mobile version