२०१० साली माझे लग्न झाले. हळदीच्या वेळेस मी व माझ्या घरच्यांनी भटजींना बोलावले नव्हते. तरी ते आले व न सांगता हळदीची तयारी करू लागले. आम्ही त्यांना सांगितलं की, “आम्ही दुसऱ्या
व्यक्तीला बोलावलंय.” तर ते म्हणाले, “माझ्या हद्दीत तुम्ही कसं काय दुसऱ्याला बोलावू शकतात?” त्यांना मी शांतपणे सांगितले की, “तुम्ही हळदीला उपस्थित रहा. पण तुमच्या हस्ते हा कार्यक्रम होणार नाही.” तर तणफण करत सायकलीवर टांग मारून निघून गेले.
थोड्या वेळाने श्री. विलास पाटील आले. ते अमळनेर तालुक्यातील झाडी ह्या गावाचे असून प्राथमिक शिक्षक होते. (नंतर ते इतिहास विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पीएच.डी.ही पूर्ण केली. अलीकडे ते नंदुरबार येथे इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.) त्यांनी शिवशाही पद्धतीने हळदीचा कार्यक्रम केला.
हळदीच्या वेळेस ते उच्चारत असलेले शब्द नेहमीपेक्षा वेगळे असूनही अनेक जण म्हणाले की, “ब्राह्मण खूप हुशार दिसतोय “. म्हणजे आपल्या लोकांना असल्या कार्यक्रमांना कुणीही काहीही म्हटलं तरी फरक कळत नाही. मी श्री. विलास पाटील यांना ‘दक्षिणा’ म्हणून काही पुस्तकं भेट केली. नारळ, सुपारी, खोबरं व पैसे यापैकी काहीच दिलं नाही. तेही समाधानाने परत गेले.
- राहुल