Just Time pass
आसपास मुडद्यांची रास
रेल्वेलाही आग
बसेसची मोडतोड
माणसांना मारझोड
जिकडेतिकडे जाळपोळ
दगडांचे हल्ले
तलवारींनी कापले
एका तरुणीस
कोण ती माझी?
मी कोण तिचा?
तिचा विचार मी का करायचा?
मी तर आहे बाजूच्याच बगीच्यात
प्रेयसीच्या मांडीवर झोपलेला
श्वास माझा तिच्या श्वासात गुंतलेला
तेवढ्यात आला आर्त आवाज जोराने
“वाचवा हो कोणी मला वाचवा हो”
ऐकले मीही, ऐकले तिनेही
समाधी मात्र आम्ही भंगू दिली नाही
पाहून हा तमाशा वरूनी
गांधीजींनी तोंड झोडपून घेतले
अन् बाबासाहेबांनी बोट चटकन खाली घेतले
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113