Dr. Rahul Rajani

आठवणी

कुणीतरी आयुष्यात येतं

येतं आणि निघून जातं

आठवणींना का सोबत नेत नाही

त्या का मागे सोडून जातं?

 

माणसं त्रास देत नाहीत

त्यांच्या आठवणी सतावतात

डोळ्यांच्या कडा

हळूच ओलावून जातात

 

आठवणी हसवतात

आठवणी रडवतात

आठवणीत जागवतात

रात्रंदिवस

 

आठवणींची महती

सांगू तरी किती

आठवणींची भीती

वाटते आता

(१५/१०/२०१६)

 

© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

Exit mobile version