Dr. Rahul Rajani

नेट/सेटच्या विद्यार्थ्यांसाठी (भाग १)

नेट-सेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही परीक्षा पास होऊन प्रमाणपत्र पदरात पाडून घ्यायला हवे.

कारण खरा संघर्ष त्यानंतर सुरू होतो. मी २००७ साली एम. ए. झाल्या-झाल्या ही परीक्षा पास झालो होतो. त्यानंतर २००८ साली जेआरएफसह नेट परीक्षा पास झालो. त्या वेळेस अभ्यास करताना आम्ही ‘अभी नही तो कभी नही’, असा विचार करून अभ्यास करायचो. भरपूर वेळ द्यायचो. अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीच करायचो नाही. हे अर्थात निकाल लागेपर्यंत. म्हणजे परीक्षा दिली की फ्री झालो, असं करायचो नाही. परीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून परत अभ्यास. हे सूत्र लक्षात ठेवून प्रयत्न केल्यामुळे आम्ही लवकर या परीक्षा उत्तीर्ण होऊन मार्केटमध्ये उतरलो. म्हणून पुढच्या संघर्षासाठी अर्थात नोकरी मिळवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांसाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळू शकला.

तात्पर्य, वेळ वाया घालवू नका. लवकरात लवकर यश मिळवा. (क्रमश:)

Dr. Rahul

Assistant Professor (Marathi)

B.A. (Gold Medalist),

M. A. (Gold Medalist),

NET (2007)

NET (2008)

Ph.D. (2018)

 

Exit mobile version