बाबासाहेबांना बुद्धी देवाने दिली!
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चांगल्या संपर्कातील एक व्यक्ती मला बऱ्याचदा अमुक तमुक बाबांबद्दलचे मेसेज पाठवायची. ती व्यक्ती आरक्षण घेऊन नोकरीला लागलेली होती. त्या व्यक्तीच्या घरात अनेक जण नोकरीला होते. त्या व्यक्तीला मी हक्काने बोलू शकत असल्याने एकदा मी त्या व्यक्तीला विचारले की,
“तुला नोकरी या बाबांमुळे मिळाली की दुसऱ्या कुणामुळे? तुझे जीवनमान कुणामुळे सुधारले? तुझी, तुझ्या कुटुंबाची एवढी प्रगती कुणामुळे घडून आली?”
मग ती व्यक्ती मला गंमतीने म्हणाली की, “मला माहित होतं की तू असे मेसेज पाठविल्याने उत्तर देशील.”
मी म्हटलं, ” विषयानंतर करू नको. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे”.
तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की, “तूच सांग”.
मी- “बाबासाहेबांमुळे तुझ्या समाजाला आरक्षण मिळाले, त्यामुळे तुम्ही शिक्षण घेऊ शकलात व त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या. असे असूनदेखील तुम्ही त्यांच्या विचारांचा जागर न करता या बाबाबुवांच्या नादी कसे काय लागू शकतात!”
ती व्यक्ती देवाधर्माच्या व बाबाबुवांच्या एवढ्या आहारी गेलेली होती की, त्या नादात तिने जे उत्तर दिले ते मी कधीही विसरू शकणार नाही.
ती व्यक्ती म्हणाली की, “बाबासाहेबांना बुद्धी शेवटी देवानेच दिलेली होती ना!”
मी इकडे घायाळ!!!
फक्त एवढंच बोललो, “फोन ठेव”.
व मीच फोन कट केला.
(एक अनुभव असाही…)
– डॉ. राहुल रजनी