Dr. Rahul Rajani

भ्रष्टाचारामुळे निसर्गाचा ऱ्हास

रस्ते, महामार्ग, बोगदे, पूल बांधण्यासाठी खडी, सिमेंट, वाळू, लोखंड इत्यादी घटक लागतात. खडी तयार करण्यासाठी डोंगर नष्ट केले जातात. त्यासाठी झाडे, वनस्पती व तेथील प्राणीसृष्टी नष्ट होते. निसर्ग विद्रुप होतो. वाळू काढण्यासाठी नद्या उपसल्या जातात. त्यामुळे जमिनीत पाणी जिरण्याची क्षमता कमी होते. नद्यांना पूर येतात. नद्यांच्या काठावरची शेती योग्य जमीन, माती वाहून जाते. सिमेंट तयार

करण्यासाठी चुनखडी, चिकन माती व जिप्सम लागते. लोखंड तयार करण्यासाठी खाणी तयार कराव्या लागतात. त्यासाठी जंगले नष्ट केली जातात. हे सर्व जिथे काम चालते तिथे आणण्यासाठी म्हणजे वाहतुकीसाठी प्रचंड प्रमाणावर डिझेल लागते *आणि सर्वसामान्य नागरिकांनी टॅक्स स्वरूपात भरलेला पैसा या कामांसाठी वापरला जातो.*

तेव्हा अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचे मिसिंग लिंक, रस्ते, बोगदे, पूल तयार केले गेले व ते दोन-पाच वर्षात कोसळले तर वरील सर्व नैसर्गिक संसाधने मातीमोल होतात. *तेव्हा भ्रष्टाचारी हा फक्त तुमच्या माझ्या टॅक्सचा पैसा खात नाहीत. तर निसर्ग उद्ध्वस्त करत असतात. याची जाण माणसाने ठेवणे गरजेचे आहे.*

– डॉ. राहुल पाटील

Exit mobile version