Dr. Rahul Rajani

काय वाचावे?

बरेच जण म्हणतात की, वाचन करणे चांगले असते. वाचनाचे अमुक-तमुक फायदे असतात. बरोबरच आहे. वाचनाचे खरंच खूप फायदे आहेत. परंतु, त्याच्यासोबत काय वाचायचे, कोणती पुस्तके वाचायची हेही कळायला पाहिजे. आमच्या ‘साहित्य आणि समाज’ या TYBA च्या विषयाच्या एका पुस्तकात ‘हजारो वर्षे समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते’, असे एक वाक्य आहे. अगदी खरं आहे ते. कारण बहुतांश

लोकं बुद्धीचा विकास करणारे साहित्य न वाचता बुद्धीला स्थिरत्व, मंदत्व आणणारी अद्भुत, चमत्कार, जादूटोणा, फलप्राप्ती इ. विषयांवरील पुस्तकं वाचतात. आपल्या भारतात सर्वात जास्त कोणती पुस्तके विकली जातात, ती पुस्तके कोणत्या हेतूने व कशा पद्धतीने वाचली जातात, यावर फार सर्व्हे करायची गरज नाही (केला तर चांगलंच आहे, संख्याशात्रीयदृष्ट्या कळेल.), थोडं समाजात फिरलं, निरीक्षण केल्यावर दिसतं की, आपल्याकडे धार्मिक पुस्तकं जास्त वाचली व विकली जातात. असो.

खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींची चरित्रे, श्रेष्ठ दर्जाचे वाङ्मय, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान इ. सामाजिक शास्त्रांवरील अभ्यासू व्यक्तींची पुस्तके, धर्म- संस्कृती इ. विषयांवरील चिकित्सात्मक, समीक्षात्मक, तुलनात्मक, परिचयात्मक पुस्तके, विविध कोश वाचले गेले पाहिजेत किंवा अशा व्यक्तींची online किंवा समोरासमोर व्याख्याने ऐकली पाहिजेत. तरच बुद्धिमत्तेचा विकास होऊ शकतो.


म्हणून काय वाचावे, कशासाठी वाचावे, कसे वाचावे, हे सांगणे, या बाबतीत प्रबोधन करणे, हे प्रत्येक डोळस वाचक, शिक्षक, लेखक व समीक्षकाचे काम आहे. कारण चुकीच्या पुस्तकांच्या वाचनाने बुद्धीचा विकास न होता उलट बुद्धीला बधिरता येते आणि ते त्या व्यक्तीसह एकूणच समाजाच्या, राष्ट्राच्या विकासाला, स्वास्थ्याला घातक ठरत असते.

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

(आपणास माझे लेखन आवडत असेल तर पोस्ट वाचताना आलेल्या बॉक्समध्ये आपला मेल आयडी व नाव टाकून माझ्या ब्लॉगला Subscribe करा. जेणेकरून माझे नंतरचे लेख मी पोस्ट केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या मेल आयडीवर लगेच वाचायला मिळतील. धन्यवाद!🙏🙏)

Exit mobile version