गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,
जव्हार, जि. पालघर – ४०१ ६०३
मराठी विभाग
विविध उपक्रमांची यादी
- अतिथी व्याख्याने-
- दि. २१/०३/२०१८ रोजी प्रा. डॉ. शत्रुघ्न फड (वर्तक महाविद्यालय, वसई) यांचे ‘मध्ययुगीन मराठी साहित्य’ (अभ्यासपत्रिका क्रमांक ५) या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
- दि. २१/०३/२०१८ रोजी प्रा. सखाराम डाखोरे (वर्तक महाविद्यालय, वसई) यांचे ‘साहित्य आणि समाज’ (अभ्यासपत्रिका क्रमांक ६) या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
- दि. १७/०३/२०१८ रोजी प्रा. राजू शनवार (महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, सध्या शहापूर येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत) यांचे ‘आधुनिक भाषाविज्ञान आणि पारंपारिक मराठी व्याकरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
- ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२०’च्या निमित्ताने दि. १३/०१/२०२० रोजी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने पटकथा लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जव्हार तालुक्यातील सुप्रसिद्ध Yutuber व अभिनय, पटकथेचे प्रशिक्षक श्री. इमरान खान (अभिनेते व निर्मिती व्यवस्थापक), श्री. संतोष बांबरे (अभिनेते व दिग्दर्शक) यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘पटकथालेखन कसे करावे?’ या विषयावर मार्गदर्शन केले.
- दि. २७/०२/२०२० रोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला गेला. या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच डॉ. विजया धनेश्वर यांचे ‘पत्रकारिता या क्षेत्रातील संधी’ व डॉ. शरद नागरे यांचे ‘सूत्रसंचालन कसे करावे?’ या दोन विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आलेली होती.
- दि. २७/११/२०२० रोजी चिंचणी महाविद्यालयातील प्रा. वनश्री फाळके यांचे तृतीय वर्ष मराठी या वर्गातील पेपर क्रमांक ०९ मधील अभ्यासक्रमावर आधारित ‘भाषांतर’ या घटकावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
- दि. १०/०१/२०२२ रोजी मराठी विभागाच्या वतीने मुलुंड, मुंबई येथील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका प्रा. प्रज्वली नाईक यांचे ‘पत्रलेखन : स्वरूप, प्रकार व पद्धती’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने झुम appच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित केले होते.
- दि. २७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दि. २६/०२/२०२२ रोजी श्री. रवि बुधर यांचे ‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
- दि. १९/१२/२०२२ रोजी श्री. रवि बुधर यांचे ‘कविता कशी निर्माण होते?’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
- दि. ०१/०३/२०२३ रोजी डॉ. रमाकांत कराड (विभागप्रमुख, HPT महाविद्यालय, नाशिक) व प्रा. प्रशांत अहिरे यांनी महाविद्यालयाच्या मराठी विभागाला भेट दिली व TYBAच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊन भविष्यात कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करता येते, त्यासाठी कोणते शिक्षण घेणे गरजेचे असते, या संदर्भात मार्गदर्शन केले.
- दि. १४/०२/२०२३ रोजी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. राजेंद्र घाटाळ (मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण असून सध्या मोखाडा येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत) यांचे ‘मराठी विषयातील करिअरच्या विविध संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
- दि. १५/०२/२०२३ रोजी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व आता भारतीय सैन्यात नोकरीला असलेल्या श्री. हरेश अवतार यांनी ‘भारतीय लष्करातील नोकरीच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
- दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त श्री. रवि बुधर यांचे ‘मराठी माध्यमातून शिक्षणाचे फायदे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
- दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी भाषा दिनानिमित्त श्री. किशोर मौळे यांचे ‘मराठी विषयातील नोकरी व व्यवसायाच्या संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
- शैक्षणिक सहली –
- दि. ०५ व ०६ जानेवारी, २०१९ रोजी मराठी विभागाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल ही वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या, अतिशय दुर्गम व अजिंक्य असा दौलताबाद किल्ला, औरंगाबादमधील बीबी का मकबरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, रामकृष्ण मिशनचे मंदिर/ मठ इ. पैठण येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठे जायकवाडी धरण, महाराष्ट्रातील थोर संत एकनाथ यांचा वाडा, ४०० वर्ष जुने राहते घर, वारकरी संप्रदायाचे एक मुख्य केंद्र पैठण येथील मंदिर, शनिशिंगणापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या सहलीत ऐतिहासिक, शैक्षणिक, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची स्थळे दाखविली. या सहलीत एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
- दि. १० व ११ फेब्रुवारी २०२० रोजी मराठी, अर्थशास्त्र, गणित या विषयांची तसेच वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्गाची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आलेली होती. या सहलीत मराठी विषयाचे ३०, अर्थशास्त्राचे ३०, गणिताचे १० तर वाणिज्यचे ११ विद्यार्थी सहभागी झालेले होते. या दोन दिवसीय सहलीत पहिल्या दिवशी प्रतिबालाजी मंदिर, वाई येथील किसनवीर सहकारी साखर कारखाना, मॅप्रो उत्पादन व विक्री केंद्र तर दुसऱ्या दिवशी पाचगणी, महाबळेश्वर ही निसर्गरम्य ठिकाणे, तेथील विविध स्थळे (Spots), धरणे, प्रतापगड हा ऐतिहासिक किल्ला, भारताच्या सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेले महाडचे चवदार तळे इ. ठिकाणी पाहिली.
- दि. २५/०१/२०२४ रोजी मराठी व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही विषयांची सहल ही नाशिकमधील नाणी संशोधन केंद्र, अंजनेरी, ओझर (नाशिक) येथील ‘आजीचं पुस्तकांचं हॉटेल’, सह्याद्री फार्म मोहाडी, नाशिक या ठिकाणी नेण्यात आली होती. सदर सहलीमध्ये ४१ विद्यार्थी, ५ प्राध्यापक सहभागी झाले होते.
- दि. ०१ व ०२ मार्च, २०२४ रोजी मराठी विभागाची दोन दिवसीय शैक्षणिक सहल ही वेरूळ येथील लेण्या, दौलताबाद किल्ला, औरंगाबादमधील बीबी का मकबरा, पाणचक्की, पैठण येथील जायकवाडी धरण, संत एकनाथ यांचा वाडा, ४०० वर्ष जुने राहते घर, वारकरी संप्रदायाचे एक मुख्य केंद्र पैठण येथील मंदिर, शनिशिंगणापूर, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ तसेच आजीचं पुस्तकाचं हॉटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या सहलीत ऐतिहासिक, शैक्षणिक, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची स्थळे दाखविली. या सहलीत एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
- विविध स्पर्धा/ परीक्षा –
- काव्यवाचन स्पर्धा – १४/०१/२०२० रोजी महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
- कथावाचन स्पर्धा – १५/०१/२०२० रोजी महाविद्यालयात कथावाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
- काव्यवाचन स्पर्धा – दिनांक १४/०१/२०२२ रोजी मराठी विभागाच्या वतीने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही कवीची कविता सादर करायची होती. या स्पर्धेमध्ये एकूण १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
- कथा अभिवाचन स्पर्धा – दि. १५/०१/२०२२ रोजी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही एका कथेचे कमीत कमी ०५ मिनिटं अभिवाचन करायचे होते. या स्पर्धेसाठी एकूण ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
- पोस्टर स्पर्धा – १६/०१/२०२२ रोजी पोस्टर स्पर्धेचे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही मराठी लेखकाची माहिती लिहिलेले पोस्टर तयार करून त्याचे सादरीकरण करणारा व्हिडिओ बनवायला सांगितला होता. या स्पर्धेमध्ये ०९ विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला.
- पत्रलेखन स्पर्धा – दि. १७/०१/२०२२ रोजी आभासी पद्धतीने पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, शिक्षक असे कुणालाही पत्र लिहायचे होते व त्याची PDF करून ग्रुपवर पाठवायचे होते. या स्पर्धेमध्ये एकूण १५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
- शुद्धलेखन स्पर्धा -दिनांक २०/०१/२०२३ रोजी मराठी विभागाच्या वतीने शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
- मराठी साहित्य, भाषा व व्याकरण या विषयावर परीक्षा – दि.२८/०१/२०२३ रोजी वरील विषयावर २५ वस्तुनिष्ठ प्रश्न असलेली बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसवून व आभासी अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात आली. प्रत्यक्ष स्वरुपात १२५ विद्यार्थी तर आभासी पद्धतीने ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यातील मुले सहभागी झाली.
- सुंदर हस्ताक्षर स्पर्धा -२०/०१/२०२४ रोजी महाविद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
- काव्यवाचन स्पर्धा- दिनांक २३/०१/२०२४ रोजी काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या वेळी महाविद्यालयातील ५४ विद्यार्थी उपस्थित होते. त्या पैकी १६ विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, विंदा करंदीकर, नामदेव ढसाळ, केशवसुत यांच्या वेगवेगळ्या कविता सादर केल्या.
- निबंध स्पर्धा – दि. २५/०१/२०२४ रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी १) प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व, २) राज्यघटना आणि आधुनिक भारत, ३) लोकशाहीपुढील आव्हाने हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
- वक्तृत्व स्पर्धा – दि. २९/०१/२०२४ रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी १) मराठी असे माझी मायबोली, २) कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचे साहित्य, ३) तुमच्या आवडत्या पुस्तकाचा परिचय हे तसेच निबंध स्पर्धेसाठी असलेल्या विषयांवर देखील बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. या स्पर्धेत ११ विद्यार्थी सहभागी झाले होते.
- विविध प्रशिक्षण –
- पीपीटी बनविण्याचे प्रशिक्षण (Training making a PPT) – शैक्षणिक, व्यावसायिक, मार्केटिंग इ अनेक कारणांसाठी आजच्या काळात PPTची मदत घेतली जाते. PPTमुळे कोणत्याही विषयाचे सादरीकरण हे अतिशय आकर्षक, प्रभावी व परिणामकारकपणे करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना PPT तयार करता याव्यात यासाठी दि. २१/०३/२०२२ रोजी तृतीय वर्ष कला या वर्गातील मराठीच्या विद्यार्थ्यांना PPT बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
- टंकलेखन प्रशिक्षण (Typing Training) (११/०८/२०२२) – युनिकोडमध्ये टंकलेखन ही आजच्या काळातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. आज प्रत्येक क्षेत्रात नोकरी करायची असेल तर टंकलेखन करावेच लागते. ब्लॉगलेखन, विकिपिडीयावर लेखन, ईमेललेखन, सोशल मिडीयावर लेखन, प्रबंध, शोधनिबंध लेखन अशा सर्व गोष्टींमध्ये टंकलेखन महत्त्वाचे असते. त्यात पुन्हा युनिकोड हा font सार्वत्रिक (universal) आहे. तो मोबाईल व कॉम्प्युटर, laptop अशा सर्व ठिकाणी वापरता येतो. तेव्हा या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना करता याव्यात म्हणून तृतीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांना युनिकोडमध्ये टंकलेखनाचे प्रशिक्षण दिले.
- दि. १९/१२/२०१९ रोजी मराठी विषयाच्या तृतीय कला वर्गातील विद्यार्थ्यांना चित्रपट कसा पाहावा, चांगल्या चित्रपटाची वैशिष्ट्ये, त्याची पटकथा कशी असते, अभिनय, दिग्दर्शन कसे केले जाते, चित्रपटाचे परीक्षण कसे करावे इ. गोष्टी कळाव्यात म्हणून मराठीतील अतिशय उत्कृष्ट कथानक, संगीत, दिग्दर्शन व अभिनय असलेला ‘पिंजरा’ हा चित्रपट दाखविला.
- विभागाचे यश-
नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी
अ. क्र. | विद्यार्थ्याचे नाव | सेट/ नेट | विषय | वर्ष |
१. | राजेंद्र घाटाळ | सेट | मराठी | २०२२ |
२. | ललिता अर्जुन पटारा | सेट | मराठी | २०२२ |
३. | राजाराम तराळ | नेट | मराठी | २०२४ |