Dr. Rahul Rajani

धर्मांधांची कुळे

धर्मांधांची कुळे
माजली चहुकडे
कापतात गळे
निष्पापांचे।


विचारांची मोडतोड
समरसतेची घोडदौड
जातिधर्मांमध्ये तेढ
निर्मिलेली।


पाडती पुतळे
कुणाचा खून पडे
सामान्य तो गोंधळे
करावे काय?

© copyright

Exit mobile version