माणसाने सुंदर असावं मनाने,
शरीरानेही सुंदर दिसावं…
माणूस निसर्गातील वस्तुंवर
प्रक्रिया करून, त्यांच्यात
सौंदर्य निर्माण करतो,
स्वत:तही ते करावं…
सौंदर्याचा ध्यास धरावा,
सौंदर्यावर प्रेम करावं,
स्वत:च्याही, दुसऱ्यांच्याही…
आपणच सुंदर नसलो तर
जग कसं सुंदर करणार?
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113