Dr. Rahul Rajani

खरा आत्मनिर्भर भारत कसा बनेल?

आपल्याला एकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ घडवायचा आहे आणि दुसरीकडे ८० कोटी लोकांना फुकट धान्य कोट्यवधी लाडक्या बहिणींना दरमहा रोख पैसा इत्यादी देऊन ‘सरकारवर निर्भर’ (अवलंबून) करणे चालू आहे. कला, क्रीडा, विज्ञान, वाणिज्य, विधी,

व्यापार, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन यातूनच भारत आत्मनिर्भर होऊ शकतो. प्रत्येक माणूस आत्मनिर्भर होऊ शकला तर आणि तरच भारत आत्मनिर्भर होऊ शकतो. त्यासाठी त्या दर्जाच्या शिक्षकांची विनावशिला व विनाडोनेशन भरती करणे गरजेचे आहे. त्यांचे एकही पद रिक्त राहता कामा नये. देशातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या लोकांना शिक्षकी पेशात यावेसे वाटायला पाहिजे. शाळा, महाविद्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांची तत्काळ उभारणी केली गेली पाहिजे. या क्षेत्रात धोरण धरसोड वृत्ती उपयोगाची नाही. तरच देशात काहीतरी सकारात्मक घडण्याची  शक्यता आहे. अन्यथा मोठमोठ्या घोषणा करण्यात व स्वप्ने पाहण्यात – दाखवण्यात काही अर्थ नाही.

डॉ. राहुल पाटील

Exit mobile version