प्रिय मित्रांनो,
‘ट्रॉय’ हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट आहे. तो होमरच्या ‘इलियड’ या महाकाव्यवर आधारलेला आहे. या चित्रपटाला ऑस्करसह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटातील अखिलिस या पात्राच्या तोंडी आलेली पुढील वाक्ये मला खूप आवडतात-
“एक राज बताता हुँ जो पुजारी मंदिर मे नही बताते- देवता हमसे जलते है, इसलिए जलते है के हम अमर नहीं. वहाँ कोई भी पल आखरी हो सकता है, हर चिज हमारे लिए खुबसुरत है क्योंकि हमे मरना है. अभी जितने खुबसुरत तुम फिर कभी नही लगोगे, हम फिर कभी यहाँ नही होंगे” (हिंदी अनुवाद)
या वाक्यांमधून मानवी जीवन क्षणभंगूर आहे आणि म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, व्यक्ती, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असायला हवी. आता आपण जसे आहोत, तसे आपण पुन्हा नसणार. गेलेला क्षण पुन्हा कधीच परत येत नाही तसेच कोणताही क्षण हा आयुष्यातील शेवटचा ठरू शकतो, म्हणून या क्षणभंगूर जीवनाचा आनंद पुरेपूर घ्यायला हवा. देव हे अमर असतात, म्हणून त्यांचे जगणे हे कंटाळवाणे असते. आपले तसे नसते. आपल्यासाठी प्रत्येक क्षण नवीन, आव्हानात्मक असतो, म्हणून तर जगण्यात गंमत असते, असे तत्वज्ञान त्याने सांगितलेले आहे.
(मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे असे अनेक प्रसंग व संवाद या चित्रपटामध्ये आहेत. हा चित्रपट मी किमान २५-३० वेळेस तरी पाहिलेला आहे. प्रत्येक वेळेस त्यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळते, नवीन आकलन होते, जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते).
आपला,
डॉ. राहूल रजनी
(वरील फोटोमध्ये ‘ट्रॉय’मधील अखिलिस हे पात्र आहे.)