Dr. Rahul Rajani

प्राध्यापक व्हायचंय? मग हे करा-

नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय?

 नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
 पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप

आहे. तुमची काही वर्ष वाया जाऊ शकतात.
 उत्तीर्ण झालात म्हणून अभ्यास सोडू नका. अभ्यासाला पर्याय नाही. चांगल्या संस्थांमध्ये मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थी निवडले जातात. अशा ठिकाणी तुमचा कस लागतो. पास झालात व अभ्यास सोडून दिला तर तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाणार व मुलाखतीत फेल होणार. मग तुमची निवड होऊ शकत नाही.
 वस्तुस्थितीत सामोरे जा. आज सहायक प्राध्यापक पदासाठी ४०-५० लाख रुपये डोनेशन घेतले जाते. ही अतिशय घाणेरडी व दुर्दैवी व्यवस्था आपल्याकडे आहे. माझ्या मते ही परिस्थिती तुम्हीच बदलायला हवी. एकत्र या. संघटना बांधा. शेतकऱ्यांच्या आंदोलनासारखे शांततामय  मार्गाने आंदोलन करा. राज्यपाल, राष्ट्रपती, आमदार, खासदार , युजीसी, प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना यांना निवेदने द्या. भेटा. राजकारणी लोकच संस्थाचालक आहेत. प्राध्यापक भरतीतून त्यांना प्रचंड पैसा मिळतो. म्हणून ही पद्धत बदलणे सोपे नाही, पण अशक्यसुद्धा नाही.
 संशोधन करा. शोधनिबंध लिहा. पीएचडी करा. वाचन व लेखन करा. इतर कौशल्ये आत्मसात करा. सोबत परिस्थिती/ व्यवस्था बदलण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा द्या. तरच तुम्हाला भविष्य आहे.

सविस्तर मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ बघा – https://youtu.be/cH7wqqUdYpI

© डॉ. राहूल पाटील

Exit mobile version