साधारणतः १४-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा माझी आई जात्यावर काम करत असताना अहिराणी बोलीत काही ओव्या गुणगुणत होती. त्या मी लिहून घेतल्या व त्यांच्या खाली काही ओव्या मी जुळवल्या होत्या.
आई म्हणत असलेल्या ओव्या खालीलप्रमाणे-
माय
माय माय करू माय नदीतली शाऊ
मायनी दिधा जन्म चार बहिणी दोन भाऊ ।।१।।
माय माय करू माय सोनानी परात
मायना बिगर चित लागेना घरात ।।२।।
माय माय करू माय सोनानी डालकी
मायना बिगर कोन करे ना आलखी ।।३।।
माय माय करू माय साखरनं पोतं
मायनी आठवण येता मना हिरदे लागे ज्योत ।।४।।
माय माय करू माय जंगलनी चिडी
चिडी गयी उडी मनी आशा गई मुडी ।।५।।
येनार-जानारले विचारू माय मनी का घर व्हती
सोना-चांदीन्या हालकड्या नातू पन्तूमा येडी व्हती ।।६।।
उन्ढायानं उन तपस वन्डीवर
भागना माता-पिता नातू खेवाडतच मांडीवर ।।७।।
————-000———————–000————————
(आईच्याच ओव्यांमधील आशयाचा धागा घेऊन मी जुळवलेल्या ओळी खालीलप्रमाणे-)
धाकला नं मोठं माय-बापनी करं आमले
उन सोसं सोता सावली देत ग्यात आमले ।।१।।
माय व्हती तवधूर कामले मनं चित लागे
येता-जाता तिना आशीर्वाद माले लाभे ।।२।।
मोठा व्हवावर लग्ने लावात आमना
नातू देखिसन आनंद तेसना आकाशमा माहेना ।।३।।
रातदिन राबनात पोटे आमना भरात
सोता मातर एक टाईम भुक्या ऱ्हायनात ।।४।।
वय व्हयनं तसा शरीरे तेसना थकनात
एक दिन बिचारा देवले प्यारा व्हयनात ।।५।।