Dr. Rahul Rajani

मुलाखत लेखन – श्री. रवी बुधर यांची यांची मुलाखत (विषय : आदिवासी समाज, संस्कृती : परिचय’)

       मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.  

रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.

✴️ को.म.सा. परिषद, जव्हार तालुका शाखेचे अध्यक्ष आहेत.

✴️ सरांचे शिक्षण बी. ए., डी. एड., डी. एस. एम. इतके झालेले आहे.

✴️ सरांच्या खूप साऱ्या कविता व वैचारिक लेखन ‘हाकारा’ व इतर नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे.

✴️ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे यांनी आयोजित केलेल्या आदिवासी वारली बोलीभाषेच्या कार्यशाळेत सरांनी शब्दसंग्रह, चित्रशब्द संग्रह, संवाद लेखन इ. विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे व प्रशिक्षण दिलेले आहे.

✴️ डोंबिवली येथे पार पडलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभागी होण्याच्या बहुमान सरांना मिळालेला आहे. त्याव्यतिरिक्त विविध राज्यस्तरीय संमेलनांमध्ये सहभाग. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे २०१८ साली  अ.भा.म.सा.परिषदेने इंडोनेशियातील बाली येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात सर कवी म्हणून निमंत्रित होते.

✴️ जव्हार पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे सन २०१२ साली त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

✴️ सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती इ. कार्यात सक्रिय सहभाग दिलेला असून NSS व इतर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत.

✴️ विविध प्रासंगिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केलेले आहे.

✴️ आदिवासी व ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणप्रसाराचे कार्य, तालुका ते राज्यस्तरीय अशा विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग.

✴️ कोरोना या महामारीच्या काळात सरांनी कलापथकाची स्थापना करून जव्हार तालुक्यात पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले.

तर अशा बहुआयामी, अभ्यासू, अनुभवी व सामाजिक जाणीव असलेल्या श्री. रवी बुधर सरांकडून आपण आदिवासी समाजाबद्दल माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर! तुमचे मन:पूर्वक स्वागत!

(मुलाखतीला सुरुवात)

✴️ सर तुमचे मूळ गाव, तालुका व जिल्हा कोणता? 

✴️ तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून आपण किती वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहात? या क्षेत्राविषयीची आपले काही अनुभव थोडक्यात सांगा.

✴️ जव्हार तालुका किंवा या संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाबद्दल म्हणजे त्यांच्या विविध भाषा, जाती, जमाती इ. बदल कृपया आम्हाला सविस्तर माहिती द्या.

✴️ आदिवासी भागातील समाजव्यवस्था /कुटुंबव्यवस्था कशी आहे?

✴️ आपल्या या पालघर जिल्ह्यातील विवाहसंस्था ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे मी ऐकून आहे. म्हणजे लग्नाचे वय, लग्न जुळविण्याच्या पद्धती, त्या संदर्भातील प्रथा, प्रत्यक्ष लग्नविधी, हुंडाप्रथा, काडीमोडचे नियम, त्यात होत गेलेले बदल हे सर्व समजून घेणे प्रत्येकासाठी औत्सुक्याचे ठरेल. कृपया याबद्दल सविस्तर माहिती द्या.

✴️ आदिवासी बांधव हे मुळातच खूप मितभाषी, दु:ख, दारिद्र्य सहन करणारे असतात. तर आदिवासी समाजाची अशी अजून कोणती स्वभाववैशिष्ट्ये आहेत?

✴️ आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्था कशी आहे? आधुनिक शिक्षण प्रणालीच्या आधी कोणती शिक्षण प्रणाली प्रचलित होती?

✴️ त्यात काही सुधारणा/ बदल झाले आहेत का?

✴️ आदिवासी समाजाच्या देव देवता, श्रद्धा, अंधश्रद्धा, समजुती, धर्मविषयक मते काय आहेत? सण-उत्सव यात त्यांचे प्रतिबिंब कसे दिसून येते?

✴️ आदिवासी बांधव नद्या, डोंगर, जंगल यांच्या म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. तर या निसर्गाशी आदिवासी समाजाचे नाते नेमके कसे आहे?

✴️ आदिवासी कला व लोकसंस्कृती खूप प्राचीन व समृद्ध आहे आणि प्रदेशानुसार त्यात खूप विविधता आहे. याविषयी श्रोत्यांना आपण काय सांगाल?

✴️ आदिवासी समाजाची आर्थिक स्थिती कशी आहे? ते कोणकोणते व्यवसाय करतात? व त्यात काळानुसार कोणकोणते बदल होत गेलेले आहेत?

✴️ आदिवासी समाजाच्या इतिहासाबद्दल बहुतेक लोकांना फार माहिती नाही. कारण तो लिहून ठेवला गेलेला नाहीये. तर आपण याबद्दल काय सांगणार?

✴️ सर, तुमच्या मते आज माहिती तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आदिवासी समाजासमोर कोणती आव्हाने आहेत? आदिवासी समाजाचे नेमके भविष्य काय आहे?

✴️ एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न-तो म्हणजे आदिवासी समाजाचे नेमके तत्त्वज्ञान काय आहे? व ते कशातून व्यक्त होते? प्रतिबिंबित होते?

(वर फक्त प्रश्न दिलेले आहेत. त्यांच्या संपूर्ण मुलाखतीचा व्हिडीओ मी माझ्या YouTube Channel वर टाकलेला आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. https://youtu.be/1TNzfzva-mQ

डॉ. राहुल भालेराव पाटील 

मराठी विभागप्रमुख 

Exit mobile version