*मला हा कोर्स जॉईन करून एक वर्ष पूर्ण झाले.* फिटनेसच्या बाबतीत माझ्या आयुष्याचे टप्पे करायला गेलो तर दोन टप्पे करता येऊ शकतात. एक म्हणजे हा कोर्स जॉईन करायच्या आधीचा व त्यानंतरचा.
✓ गेल्या १ वर्षांपासून मी सातत्याने व्यायाम करत आहे.
✓ डाएट अगदी सहजपणे पाळत आहे. एक वर्ष झाला added साखर, तेलकट पदार्थ खाणे
जवळपास पूर्ण बंद केले आहे.
✓ माझ्या शरीराला किती कॅलरींची गरज आहे व त्या कशा ट्रॅक करायच्या ते लक्षात आले.
✓ वजन ७५ वरून आता ६९ च्या आसपास स्थिर झाले आहे.
✓ इंचलॉस झाला आहे.
✓ शरीर सुडौल झाले आहे.
✓ हृदयाची क्षमता, शरीराची लवचिकता वाढली आहे.
✓ व्यायामाचे अनेक प्रकार माहीत झालेले असून ते केव्हा व कसे करायचे ते चांगल्या पद्धतीने समजलेले आहे.
✓ या वर्षाच्या क्रीडा महोत्सवात मी पदवीच्या विद्यार्थ्यांसोबत १००, २००, ४००, ८००, १६०० मीटरच्या स्पर्धेत १२०० मीटर धावलो.
✓ *मला २००५ पासून मार्च २०२५ पर्यंत म्हणजे २० वर्षे ॲसिडिटी होती. आता १ वर्षांपासून १००% थांबली आहे.*
✓ *त्या आधी दीड दोन वर्षांपासून कमरेचे दुखणे सुरू होऊन ते वाढले होते. पण ते पूर्णपणे बंद झाले आहे.*
हे सर्व सुशील सरांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेतल्यामुळे शक्य झाले. माझ्या आजूबाजूला काही लोकांनी इतर कोणते तरी कोर्स जॉईन केले. वेगवेगळे प्रोडक्ट विकत घेतले. जोपर्यंत घेत होते तोपर्यंत थोडे बारीक झाले व पुन्हा तसेच जाड होऊन गेले. माझ्या बाबतीत मात्र असे झाले नाही. त्याला कारण सरांनी डिझाईन केलेला हा कोर्स. त्यात व्यायाम, त्याचे अनेक प्रकार, डाएट, मेडिटेशन, affirmation, motivation, वैयक्तिक लक्ष, सल्ला, प्रश्न विचारण्याची मुभा अशा अनेक गोष्टी आहेत.
सर फक्त फिटनेस कोच नाहीयेत तर लाईफ कोच आहेत. आपल्याला बदल हवा असेल तर आपण फक्त त्यांना follow करायला हवे. तुम्ही असं करू शकलात तर तुमची आयुष्य बदललेच म्हणून समजा.
धन्यवाद सुशील सर व ग्रुप मधील अनेक प्रेरणादायी मित्र- मैत्रिणींनो!
राहुल पाटील,
नाशिक