Dr. Rahul Rajani

EVM: गोपनीयता भंग

*EVM मशीनच्या सहाय्याने मतदान हे खालील एका कारणासाठी घातक आहे.*
गोपनीयता हे जुन्या पद्धतीचे (Ballot Paper System) एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जायचे.

मतपत्रिकांच्या पद्धतीत खालील गोष्टींमुळे गोपनीयता पाळली जायची:
*मिक्सींग प्रक्रिया (Mixing of Ballot Papers)*: वेगवेगळ्या मतदान केंद्रांच्या (Booths) किंवा वार्डांच्या मतपेट्या एकत्र केल्यानंतर, त्या सर्व मतपत्रिका एका मोठ्या भांड्यात किंवा ड्रममध्ये

मिसळल्या जात. यामुळे कोणत्या विशिष्ट गल्लीतून, इमारतीतून किंवा वार्डातील लोकांनी कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, याचा कोणताही ठोस पुरावा उरत नसे.

*राजकीय दबावापासून संरक्षण*: जर एखाद्या विशिष्ट वार्डातील कल समजला, तर निवडून आलेला उमेदवार त्या भागाकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा पराभूत उमेदवार त्या भागातील लोकांवर रागावू शकतो, अशी भीती असते. *त्यामुळे बऱ्याचदा लोकं प्रस्थापित पक्षाविरुद्ध मतदान करायला तयार होत नाहीत.*
‘मिक्सींग’मुळे उमेदवाराला फक्त एकूण मताधिक्य समजायचे, ज्यामुळे मतदारांवरील राजकीय दबाव कमी व्हायला मदत व्हायची.

*EVM आल्यावर काय बदलले?*
आता EVM मुळे प्रत्येक ‘बूथ’चा डेटा स्वतंत्रपणे उपलब्ध असतो. त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, हे स्पष्टपणे समजते.

म्हणजे तुमच्या माझ्या मताची गोपनीयता राहते. परंतु आपल्या वॉर्डातील, गावातील लोकांच्या मतदानाची गोपनीयता राहत नाही.

*कोणत्या मतदान केंद्रावर कुणाला किती मते मिळतात हे EVM मध्ये कळत असल्यामुळे ज्याच्या हातात सत्ता आहे तो तिथल्या लोकांची मते मतदार यादीमधून कमी करून टाकत आहे.*

Exit mobile version