Dr. Rahul Rajani

आदिवासी मूळ कोण आहेत?

जे आदिवासी नाहीत, ज्यांचा काही अभ्यास नाही तेसुद्धा ‘आदिवासी हे हिंदू आहेत’ असे म्हणत आहेत. कायदा काय म्हणतो, न्यायालय काय म्हणते,

इतिहास काय म्हणतो ते तर बघा. आदिवासी हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कोणत्या वर्णात होते? हिंदू विवाह कायदा त्यांना लागू होत नाही. यावरून हेच सिद्ध होते की ते हिंदू नाहीत. त्यांच्या दाखल्यावर ‘हिंदू धर्म’ असे खोडसाळपणे लिहिले जाऊ लागले. ते अशिक्षित होते म्हणून त्यांना ते लक्षात आले नाही व नवीन पिढीला त्यात बदल करावासा वाटत नाही. कारण आदिवासींपैकी बरेच जण अजूनही शिक्षण व्यवस्थेत पहिल्या पिढीतील आहेत. कागदोपत्री बदल करणे, त्यासाठी करावयाची प्रक्रिया या गोष्टी भल्याभल्यांना माहिती नसतात. म्हणून ते या भानगडीत पडत नाहीत. तसेच आदिवासी भागामध्ये वनवासी आश्रम, हिंदू धर्म संघटना, समर्थ बैठका, इत्यादींच्या माध्यमातून सातत्याने आदिवासींचे हिंदूकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन लोकांकडून ख्रिश्चनायझेशनदेखील जोरात सुरू आहे. मुळात आदिवासी हे निसर्गपूजकच आहेत.

ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यापैकी कोणत्याही धर्मात बसत नाहीत. तेव्हा त्यांची संस्कृती नष्ट न करता त्यातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा या गोष्टी काढून त्यांच्या संस्कृतीतील चांगल्या नैतिक, निसर्गाधारित मूल्यांनुसार त्यांना जगू दिले पाहिजे व आदिवासींनीही हे पण माझं, ते पण माझं असे न म्हणता फरक करायला शिकले पाहिजे. अन्यथा याचे भविष्यात इतर सामाजिक, आर्थिक, राजकीय दुष्परिणाम संभवू शकतात.

‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावरील माझे बेधडक व बिनधास्त भाषण नक्की ऐका. https://youtu.be/4aTkwpQFqXE

डॉ. राहुल पाटील

Exit mobile version