Dr. Rahul Rajani

मानवाची आधुनिक काळातील वाटचाल

मानवाचा आधुनिक काळापासूनचा सुधारणेचा इतिहास हा धर्मसत्तेविरूद्धच्या संघर्षाचा व धर्मसुधारणेचा इतिहास आहे. युरोपात या प्रक्रियेला चौदाव्या – पंधराव्या शतकापासून तर आपल्याकडे

१९व्या शतकापासून सुरुवात झाली. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह, जरठ – कुमारी विवाह, विधवाविवाहास बंदी, घटस्फोटाची सोय नाही, स्त्रिया-शूद्र यांच्या शिक्षणाला विरोध, अस्पृश्यता, समुद्र ओलांडायला बंदी, शूद्रांना मंदिरप्रवेश नाही या व यासारख्या कित्येक गोष्टींना धर्माचे पाठबळ होते. समाजसुधारकांना धर्मव्यवस्थेविरूद्ध एक प्रकारचे बंड पुकारावे लागले. तेव्हा कुठे आजचा बदल तुम्हाला व आम्हाला बघायला मिळतो आहे. हा इतिहास समजून न घेता याकडे पाठ फिरवणे म्हणजे भविष्यातील मानवजातीच्या विकासाच्या वाटा बंद करण्यासारखे आहे.

– डॉ. राहूल पाटील

Exit mobile version